Asia Cup 2023, India vs Pakistan Super 4 Score Updates: भारतीय संघाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने २००८ च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये १४० धावांनी त्यांचा पराभव केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळीमुळे दोन गडी गमावून ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ विकेट्सवर केवळ १२८ धावा करू शकला आणि सामना २२८ धावांनी गमावला. पाकिस्तान संघाला ३२ षटकात केवळ १२८ धावा करता आल्या. दुखापतग्रस्त हरिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीला आले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७७ शतके झळकावण्यात यश मिळवले आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ५९४ डावात ७७ शतके पूर्ण केली होती, तर कोहलीने ५६१ डावात हा पराक्रम केला आहे. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ४७ शतके करणारा फलंदाज ठरला. त्याने सचिनचा विक्रमही मोडला. सचिनने आपल्या ४३५ व्या डावात ४७ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले होते, तर कोहलीने २६७ व्या डावात हा पराक्रम केला.

कोहलीने केएल राहुलसोबत २०० हून अधिक धावांची केली भागीदारी –

या सामन्यात विराट कोहलीने केएल राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १९४ चेंडूत २३३ धावांची नाबाद भागीदारी केली. आशिया चषकात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी ठरली. या सामन्यात विराट कोहलीने ९४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद १२२ धावांची खेळी केली. विराट कोहलीने कोलंबोमध्ये चौथे शतक झळकावले. या सामन्यात केएल राहुलने ११ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानविरुद्ध ५० षटकात २ बाद ३५६ धावा केल्या.

Live Updates

Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023 Highlights Updates: आशिया चषक २०२३ भारत वि पाकिस्तान सुपर ४ अपडेट्स

17:51 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: जर सामना नाही झाला तर टीम इंडिया फायनलला पोहचेल का? जाणून घ्या समीकरण

पाकिस्तान संघाने सुपर-४ फेरीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला आहे. अशा स्थितीत भारताविरुद्ध केवळ विजय मिळवल्यास संघाचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल. यानंतर टीम इंडियाला १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि १५ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने हा सामना गमावल्यास अंतिम फेरी गाठण्यासाठी पुढील दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्याचबरोबर हा सामना जिंकल्याने टीम इंडियाची स्थिती मजबूत होईल. तेव्हा पाकिस्तानला अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका असेल. त्याला श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवावाच लागेल. जर हा सामना झाला नाही तर भारताला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील.

17:46 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: सामन्याचा निकाल लागण्यासाठी २० षटकांचा खेळ होणे आवश्यक

सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी एका डावात किमान २० षटके खेळणे आवश्यक आहे.
अंपायर्स आजच सामन्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही डावात २० षटके खेळली गेली तर सामन्याचा निकाल देखील डकवर्थ लुईस नियमावर आधारित असू शकतो. पहिल्या डावात पूर्ण षटके टाकली आणि दुसऱ्या डावात जर पाऊस पडला तर उद्या राखीव दिवशी दुसरा डाव खेळला जाईल. पावसामुळे उद्याही खेळ झाला नाही तर सामना अनिर्णित राहील. उद्या २० षटकांचा खेळ झाला तरी निकाल लागेल. या सामन्यात डकवर्थ लुईस नियमही वापरता येईल.

17:43 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: पाकिस्तान हे लक्ष्य गाठू शकतो

सामना अधिकारी आजच सामना संपवण्याचा प्रयत्न करतील. जर आज अजिबातचं सामना होऊ शकला नाही, तर जिथ थांबला होता तिथंपासून उद्या राखीव दिवशी सामना सुरू होईल. आज जर डकवर्थ लुईस नियम नुसार जर भारतीय संघ पुन्हा फलंदाजी करू शकला नाही, तर पाकिस्तानला काय लक्ष्य असेल जाणून घ्या. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला २० षटकांत १८१ धावा, २१ षटकांत १८७ धावा, २२ षटकांत १९४ धावा, २३ षटकांत २०० धावा आणि २४ षटकांत २०६ धावांचे लक्ष्य मिळेल.

भारत १४७-२

17:15 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: पावसामुळे खेळ थांबला

मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला. सामना थांबला तोपर्यंत टीम इंडियाने २४.१ षटकात २ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या. सध्या के.एल. राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे. या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. त्यानंतरही सामना सुरू झाला नाही, तर भारतीय संघ २४.१ षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल.

भारत १४७-२

16:52 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: कोहली आणि राहुल यांच्यावर जबाबदारी

सलग दोन विकेट्स लागोपाठ गेल्याने आता विराट कोहली आणि के.एल. राहुल यांच्यावर डाव पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आली आहे. सध्या के.एल. राहुल २७ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १५ चेंडूत ७ धावा करत फलंदाजी करत आहे. भारताने सलग दोन षटकात दोन विकेट्स गमावल्या. १७व्या षटकात शादाब खानने रोहित शर्माला फहीम अश्रफकरवी झेलबाद केले. ४९ चेंडूंत सहा चौकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ५६ धावा करून तो बाद झाला. यानंतर १८व्या षटकात शाहीन आफ्रिदीने शुबमन गिलला सलमान आघाकरवी झेलबाद केले. शुबमनने ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या होत्या.

भारत १४६-२

16:33 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: भारताला दुसरा धक्का, शुबमन गिल बाद

रोहित शर्मापाठोपाठ शुबमन गिलही बाद झाला आहे. शाहीन आफ्रिदीने त्याला आगा सलमानकरवी झेलबाद केले. गिलने ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. आता विराट कोहलीसोबत लोकेश राहुल क्रीजवर आहे. एकाच वेळी दोन्ही सेट बॅटसमन तंबूत परतल्याने टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज आहे.

भारत १३१-२

16:23 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

पाकिस्तानला शतकी भागीदारी तोडण्यात यश आले आहे. लेगस्पिनर शादाब खानने रोहित शर्माला अर्धशतक करून तंबूत पाठवले. त्याने ४९ चेंडूत ५६ धावा केल्या. आता मदार विराट कोहली आणि शुबमन गिलवर असणार आहे.

भारत १२१-१

16:15 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: रोहित शर्माचेही अर्धशतक आहे

१५ षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता ११५ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने वनडे कारकिर्दीतील ५०वे अर्धशतक झळकावले. त्याने शादाब खानच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध नाबाद ७४ धावा केल्या होत्या. सध्या रोहित ४६ चेंडूत ५५ धावा आणि शुभमन गिल ४४ चेंडूत ५३ धावा करत फलंदाजी करत आहे.

16:04 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: शुबमन गिलचे अफलातून अर्धशतक!

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. १४ षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता १०० धावांचा टप्पा पार केला आहे. शुबमनने ३९ चेंडूंत दहा चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. त्याच वेळी, रोहित देखील त्याच्या अर्धशतकाच्या जवळ आहे. त्याने ४१ चेंडूत ४४ धावा केल्यानंतर फलंदाजी करत आहे.

भारत १०३-०

15:49 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: पहिल्या पॉवर प्ले मध्ये शुबमन-रोहितची अर्धशतकी भागीदारी

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताने एकही विकेट न गमावता ६१ धावा केल्या आहेत. शुबमनने ३० चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, रोहित ३० चेंडूत १८ धावा केल्यानंतर फलंदाजी करत आहे. शाहीनला गोलंदाजीसाठी तीन षटके मिळाली आहेत आणि त्याने त्यात ३१ धावा दिल्या आहेत.

भारत ६१-०

15:44 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: नसीमच्या गोलंदाजीवर शुबमन गिलचा झेल सोडला

नसीम शाहच्या गोलंदाजीवर भारतीय डावाच्या ८व्या षटकात शुबमन गिलचा स्लीपमध्ये झेल सोडला. इफ्तिकार अहमद चेंडूकडे फक्त बघत राहिला. त्यामुळे येणाऱ्या काळात हा झेल किती महाग पडतो पाकिस्तानला ते पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

भारत ४७-०

15:35 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: श्रेयस अय्यरला प्लेइंग-११मध्ये का मिळाले नाही स्थान? नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माने सांगितले कारण

IND vs PAK: श्रेयस अय्यरला प्लेइंग-११ मध्ये का मिळाले नाही स्थान? नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माने सांगितले कारण

15:30 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: शुबमनने केली शाहीनची धुलाई केली

शुबमन गिल शानदार फलंदाजी करत आहे. त्याने शाहीन आफ्रिदीविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. सध्या शुबमन १३ चेंडूत २५ धावा आणि रोहित शर्मा १७ चेंडूत १० धावा करत फलंदाजी करत आहे. शाहीनने तीन षटकांत ३१ धावा दिल्या आहेत. शाहीनच्या दुसऱ्या षटकात शुबमनने तीन चौकार मारले होते. यानंतर शाहीनच्या पाचव्या षटकात तीन चौकारही मारले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने नसीम शाह शानदार गोलंदाजी करत आहे. त्याने दोन षटकांत सहा धावा दिल्या आहेत.

15:24 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: शाहीनच्या षटकात शुबमनने तीन चौकार मारले

शाहीनच्या पहिल्याच षटकात रोहितने षटकार ठोकला होता. यानंतर शाहीन पुन्हा तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आला. या षटकात शुबमनने त्याच्या चेंडूंवर तीन चौकार मारले. दोन्ही खेळाडूंनी शानदार सुरुवात करून दिली. त्यानंतर पाचव्या षटकात त्याने पुन्हा तीन चौकार मारले. आतापर्यंत या दोन्ही सलामीवीरांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत त्यांना सेट होऊ दिले नाही.

भारत ३७-०

15:09 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: रोहित शर्माने भारतीय डावाची केली षटकाराने सुरुवात

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने भारतीय डावाची षटकाराने सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या षटकात नसीमच्या गोलंदाजीवर शुबमन गिलचा झेल शाहीन आफ्रिदीने सोडला. त्यानंतर त्याच षटकात रोहितने कव्हर्सच्या दिशेने एक चौकार मारला.

भारत १५-०

15:04 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध ७८ धावा करताच रोहित शर्मा करणार मोठा विक्रम, वनडे क्रिकेटमध्ये गाठणार ‘हा’ खास टप्पा

IND vs PAK: शोएब अख्तरने टीम इंडियाला दिला इशारा

शोएब अख्तर शनिवारी कोलंबोला पोहोचला आणि त्याने सांगितले की, येथील हवामान ठीक आहे. त्याने मायक्रोब्लॉगिंग साइट पूर्वीचे ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आणि भारतीय फलंदाजांसाठी इशारा दिला.

व्हिडीओमध्ये शोएब अख्तर म्हणत आहे, “देव जाणतो, मी किती वर्षांनी कोलंबोला आलो आहे. पण इथे परत येऊन पुन्हा पाठवू नकोस. महान देश आणि महान लोक आणि हवामान …, नंतर तो हसत हसत म्हणाला, “बच के रहना पाकिस्तान से.”

15:04 (IST) 10 Sep 2023
Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडे क्रमवारीत ‘या’ संघाने हिरावला नंबर वनचा मुकुट

14:43 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: दोन्ही संघांचे प्लेइंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, के.एल. राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

14:42 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: दोन्ही संघात काय झाले बदल? जाणून घ्या.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने शनिवारीच प्लेइंग-११ची घोषणा केली होती. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, मी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार आहे. रोहितने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या जागी के.एल. राहुलचा समावेश करण्यात आला आहे. राहुल पाचव्या क्रमांकावर तर इशानला चौथ्या क्रमांकावर पाठवले जाईल का? की राहुल चौथ्या क्रमांकावर येईल आणि इशान पाचव्या क्रमांकावर बाद होईल? कोणाची बॅटिंग ऑर्डर काय आहे, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

14:36 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: पाकिस्तान जिंकली नाणेफेक, बाबर आझमने घेतला गोलंदाजीचा निर्णय

पाकिस्तान के कप्तान बाबर आजम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया है। भारताने प्लेईंग ११मध्ये दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह आणि के.एल. राहुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. सामन्याआधी श्रेयस अय्यरला किरकोळ दुखापत झाल्याने त्याच्या जागी राहुलचा समावेश करण्यात आला आहे.

14:14 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: आर. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी काय रंग दाखवणार? जाणून घ्या

प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी भलेही योग्य नसेल, पण जर फलंदाज सेट झाले तर ते मोठी धावसंख्या करू शकतात. गेल्या वर्षी याच मैदानावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियन संघासमोर २९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या खेळपट्टीवरून वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. शनिवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये श्रीलंकेचा संघ ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात २५७ धावा करू शकला.

बांगलादेशला त्या धावसंख्येचा पाठलाग करता आला नाही आणि त्यांचा संघ ४८.१ षटकात २३६ धावांवर आटोपला. या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी १९ पैकी १४ विकेट्स घेतल्या. रविवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळू शकते. तसेच, खेळपट्टीवर दिवसा फिरकी गोलंदाजांना देखील अधिक मदत असल्याचे संजय मांजरेकर यांनी पीच रिपोर्ट दरम्यान सांगितले. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला याचा फायदा घ्यायचा असेल. त्यामुळे जो कोणी नाणेफेक जिंकेल तो आधी फलंदाजी करेल.

14:07 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: पाकिस्तानचे प्लेइंग-११ आधीच केली जाहीर

या सामन्यासाठी पाकिस्तानने आपली प्लेइंग-११ जाहीर केली आहे. बाबर आझमने बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळलेल्या संघात एकही बदल केलेला नाही. पाकिस्तानच्या प्लेइंग-११ मध्ये एक खेळाडू आहे जो पाच वर्षांनंतर भारताविरुद्ध वन डेमध्ये खेळणार आहे. कँडी येथे दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात अष्टपैलू फहीम अश्रफ संघात नव्हता. बांगलादेशविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात त्याला संधी मिळाली आणि आता तो पुढच्या सामन्यातही खेळणार आहे. तो २०१८ नंतर प्रथमच टीम इंडियाविरुद्ध वन डे सामना खेळणार आहे. त्यानंतर आशिया कपच्या सामन्यात त्याने ३१ धावा केल्या आणि एक विकेट घेतली.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा प्लेइंग-११

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

14:03 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: कोलंबोच्या हवामानावर कार्तिक आणि अश्विनचे ​​ट्विट

भारताच्या दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन यांनी चाहत्यांना कोलंबोमधील हवामानाबाबत अपडेट दिले आहेत. अश्विनने ट्वीटरवर लिहिले, “भारत-पाकिस्तान सामन्यासाठी यापेक्षा चांगली सकाळ असू शकत नाही. खेळासाठी भरपूर तिकिटे अजूनही ऑनलाइन उपलब्ध आहेत.” तर, कार्तिकने लिहिले, “हवामान स्वच्छ आणि चांगले दिसत आहे. मला एका मजेदार सामन्याची अपेक्षा आहे.”

13:59 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: कोलंबोमध्ये सध्या सूर्यप्रकाश आहे

कोलंबोमध्ये सध्या सूर्यप्रकाश आहे. पाकिस्तान क्रिकेटने स्टेडियमचा फोटो शेअर केला आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी पाऊस पडण्याची शक्यता नाही.

13:58 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: कोलंबोमध्ये दोन्ही संघांचे रेकॉर्ड

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारताने ४६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने २३ सामने जिंकले आणि १९ सामने गमावले. चार सामने अनिर्णित राहिले. त्याचबरोबर या मैदानावर पाकिस्तानने २४ वन डे सामने खेळले आहेत. त्यांनी १४ सामने जिंकले आणि आठ गमावले. दोन सामने अनिर्णित राहिले.

13:56 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यांची आकडेवारी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १३३ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात पाकिस्तानचा वरचष्मा आहे. पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने ५५ सामने जिंकले आहेत. पाच सामने अनिर्णित राहिले. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. एक सामना रद्द झाला, तर एक पाकिस्तानने जिंकला.

13:54 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम उल हक, सलमान आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हॅरिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, सौद शकील.

13:51 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: भारताची गोलंदाजी झाली मजबूत

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही संघात समावेश झाला असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाची गोलंदाजीही मजबूत झाली आहे. ग्रुप स्टेजमधील सामन्यात बुमराहचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र, पावसामुळे संघाने गोलंदाजी केली नाही. आजच्या सामन्यात बुमराह, सिराज आणि शार्दुल खेळू शकतात. शार्दुलने सराव सत्रात गोलंदाजीसोबतच फलंदाजीचा सरावही केला.

13:47 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: लोकेश राहुलची कामगिरी

२०१९ पासून राहुलची कामगिरी चांगली आहे. त्याने २०१९ मध्ये १३ सामन्यांमध्ये ४७.६७च्या सरासरीने ५७२ धावा केल्या. २०२० मध्ये त्याने नऊ सामन्यांमध्ये ५५.३८च्या सरासरीने ४४३ धावा केल्या, २०२१ मध्ये त्याने तीन सामन्यात ८८.५०च्या सरासरीने १०८ धावा केल्या, २०२२ मध्ये त्याने १० सामन्यात २७.८९च्या सरासरीने २५१ धावा केल्या. २०२३ मध्ये त्याने सहा सामन्यांत ५६.५०च्या सरासरीने २२६ धावा केल्या.

भारतीय संघाने सुपरफोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध २२८ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव केवळ १२८ धावांवरच रोखला.