Asia Cup 2023, India vs Pakistan Super 4 Score Updates: भारतीय संघाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने २००८ च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये १४० धावांनी त्यांचा पराभव केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळीमुळे दोन गडी गमावून ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ विकेट्सवर केवळ १२८ धावा करू शकला आणि सामना २२८ धावांनी गमावला. पाकिस्तान संघाला ३२ षटकात केवळ १२८ धावा करता आल्या. दुखापतग्रस्त हरिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीला आले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७७ शतके झळकावण्यात यश मिळवले आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ५९४ डावात ७७ शतके पूर्ण केली होती, तर कोहलीने ५६१ डावात हा पराक्रम केला आहे. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ४७ शतके करणारा फलंदाज ठरला. त्याने सचिनचा विक्रमही मोडला. सचिनने आपल्या ४३५ व्या डावात ४७ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले होते, तर कोहलीने २६७ व्या डावात हा पराक्रम केला.

कोहलीने केएल राहुलसोबत २०० हून अधिक धावांची केली भागीदारी –

या सामन्यात विराट कोहलीने केएल राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १९४ चेंडूत २३३ धावांची नाबाद भागीदारी केली. आशिया चषकात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी ठरली. या सामन्यात विराट कोहलीने ९४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद १२२ धावांची खेळी केली. विराट कोहलीने कोलंबोमध्ये चौथे शतक झळकावले. या सामन्यात केएल राहुलने ११ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानविरुद्ध ५० षटकात २ बाद ३५६ धावा केल्या.

Live Updates

Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023 Highlights Updates: आशिया चषक २०२३ भारत वि पाकिस्तान सुपर ४ अपडेट्स

13:37 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: आजच्या सामन्यात इशान किशन खेळणार की के.एल. राहुल?

पाचव्या क्रमांकावर कोणाचा दावा जास्त?

राहुल आणि इशान किशन यांच्यात निवड करण्याच्या पेचप्रसंगावर तोडगा काढणे भारतीय संघ व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या महिनाभरात इशानने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावरील राहुलची सरासरीही उत्कृष्ट आहे. इशानने त्याच्या वन डे कारकिर्दीत फक्त एकदाच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे आणि तीही पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात, जिथे त्याने ८२ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, राहुलने वनडेमध्ये पाचव्या क्रमांकावर १८ डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५३च्या सरासरीने ७४२धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.

13:35 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची शक्यता

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पावसाची ४९ ते ६९ टक्के शक्यता आहे. दुपारी ३ वाजता सामना सुरू होईल. उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. सामना पूर्ण करण्यासाठी दोन्ही डावात २०-२० षटके खेळणे आवश्यक आहे.

13:33 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: गेल्या सामन्यात भारताने नेपाळचा पराभव केला होता

भारताने शेवटच्या सामन्यात नेपाळचा १० गडी राखून पराभव केला होता. पावसाने व्यत्यय आणलेल्या त्या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना २३० धावा केल्या होत्या. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला २३ षटकांत १४५ धावांचे लक्ष्य मिळाले, जे टीम इंडियाने २०.१ षटकांत १० गडी राखून पूर्ण केले.

13:28 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: भारत-पाकिस्तानमध्ये मोठी लढत, आज पाऊस पुन्हा खलनायक ठरणार?

कोलंबो येथे रविवारी आशिया चषक सुपर-4 सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. याच स्पर्धेत या दोन संघांमध्ये २ सप्टेंबर रोजी झालेला गट सामना पावसामुळे वाहून गेला होता. भारत-पाकिस्तान सुपर-४ सामन्यावरही पावसाचा धोका आहे, मात्र या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

रविवारी पाऊस पडल्यास खेळ थांबवून सोमवारी तेथून सुरू होईल. यापूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यातील गट सामन्यातही पावसामुळे अडथळा निर्माण झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने आपला डाव खेळला, पण पाकिस्तानला आपला डाव खेळता आला नाही.

13:21 (IST) 10 Sep 2023
IND vs PAK: आज टीम इंडिया पाकिस्तानशी करणार दोन हात

आज कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोरचा सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाची छाया पसरली आहे. मात्र, त्यासाठी उद्याचा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. या दोघांमधील गटातील सामना अनिर्णित राहिला. पाऊस न पडल्यास दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते.

भारतीय संघाने सुपरफोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध २२८ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव केवळ १२८ धावांवरच रोखला.