महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारतीय संघाची मोहीम आजपासून सुरू होत आहे. भारताचा पहिला सामना आज (१२ फेब्रुवारी) पाकिस्तानविरद्ध भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. परंतु भारतीय संघांसमोर या सामन्यात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. संघाची उपकर्णधार दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दुसऱ्या बाजुला दुखापतीतून नुकतीच सावरलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने संघात पुनरागमन केल्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांना हायसं वाटू लागलं आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिच्या बोटाला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे ती आजचा सामना खेळू शकणार नाही.
भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी सांगितलं की, स्मृती मंधाना भारताच्या दुसऱ्या सामन्यात उपलब्ध असेल. अशातच भारताला एक चांगली बातमी मिळाली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतीमधून सावरली असून तिला फिट घोषित केलं आहे. तिच्या खांद्याला दुखापत झाली होती. परंतु सामन्यापूर्वी तिला फिट घोषित केलं आहे.
भारताचा संभाव्य संघ
जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, रिचा घोष. शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, के अंजली सरवानी
राखीव : यस्तिका भाटिया, स्मृती मंधाना, मेघना सिंह, स्नेह राणा, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, मेघना सिंग
हे ही वाचा >> IND vs AUS: फिरकीचीच फिरकी! रोहितची मुलाखत घ्यायला गेला अन् अॅश अण्णाच झाला क्लीन बोल्ड, पाहा Video
पाकिस्तानचा संभाव्य संघ
जावेरिया खान, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, निदा दार, बिस्माह मारूफ (कर्णधार), कायनात इम्तियाज, मुनीबा अली, सिद्रा नवाज, नुशरा संधू, सना फातिमा, आयमान अन्वर
राखीव : सिद्रा अमीन, आयेशा नसीम, तुबा हसन, सादिया इक्बाल, सदफ शमास, गुलाम फातिमा