India vs South Africa 2nd T20 Highlights Score, 12 December 2023: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१२ डिसेंबर) खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने गबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडिया पुढे खेळू शकली नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी १३.५ षटकात १५४ धावा करत सामना जिंकला. यासह त्याने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. तिसरा आणि अंतिम सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल.

फेहलुकवायोने षटकार मारून सामना संपवला

पावसाने प्रभावित झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला. १४व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडिले फेहलुकवायोने रवींद्र जडेजाला षटकार ठोकला आणि सामना संपवला. आफ्रिकन संघाने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. तिसरा आणि अंतिम सामना जोहान्सबर्ग येथे गुरुवारी होणार आहे. टीम इंडियाने तो सामना जिंकला तर मालिका बरोबरीत येईल. यासोबतच दक्षिण आफ्रिकेची नजर मालिका २-० ने जिंकण्यावर असेल.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने गेबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडिया पुढे खेळू शकली नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी १३.५ षटकात १५४ धावा करत सामना जिंकला.

भारताचा डाव संपणार होता तेव्हा पाऊस आला आणि पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. खेळ थांबला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. रिंकू सिंग ३९ चेंडूत ६८ धावा करून नाबाद आहे. मोहम्मद सिराज खाते न उघडता नाबाद आहे. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने ५६ धावांची खेळी केली. तिलक वर्माने २९ तर रवींद्र जडेजाने १९ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि अर्शदीप सिंग यांना खाते उघडता आले नाही. जितेश शर्माने केवळ एक धाव काढली. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने तीन विकेट्स घेतल्या. मार्को जॅनसेन, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि एडन मार्करन यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

Live Updates

India vs South Africa 2nd T20 Highlights Updates Score Today: भारत वि दक्षिण आफ्रिका दुसरा टी २० सामना हायलाईट्स अपडेट्स

00:38 (IST) 13 Dec 2023
IND vs SA: क्षिण आफ्रिकेने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला

पावसाने प्रभावित झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला. १४व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडिले फेहलुकवायोने रवींद्र जडेजाला षटकार ठोकला आणि सामना संपवला. आफ्रिकन संघाने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. तिसरा आणि अंतिम सामना जोहान्सबर्ग येथे गुरुवारी होणार आहे. टीम इंडियाने तो सामना जिंकला तर मालिका बरोबरीत येईल. यासोबतच दक्षिण आफ्रिकेची नजर मालिका २-० ने जिंकण्यावर असेल.

00:10 (IST) 13 Dec 2023
IND vs SA: भारताला दुहेरी यश मिळाले

नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवने रीझा हेंड्रिक्सला बाद केले. हेंड्रिक्सने २७ चेंडूत ४९ धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि एक षटकार मारला. हेंड्रिक्सला सूर्यकुमार यादवने झेलबाद केले. पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजने हेनरिक क्लासेनला बाद केले. क्लासेनने पाच चेंडूत सात धावा केल्या. यशस्वी जैस्वालने त्याचा झेल घेतला. अशाप्रकारे भारताला आठव्या, नवव्या आणि दहाव्या षटकात प्रत्येकी एक यश मिळाले. दक्षिण आफ्रिकेने १० षटकात ४ विकेट्स गमावत ११६ धावा केल्या आहेत. आफ्रिकन संघाला ३० चेंडूत ३६ धावा करायच्या आहेत. डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स क्रीजवर आहेत.

दक्षिण आफ्रिका १२८-४

23:54 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, कर्णधार एडन मार्कराम बाद

दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध तीन षटकांत एका विकेटवर ४३ धावा केल्या आहेत. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर टीम इंडियाला पहिले यश मिळाले. त्यानंतर कर्णधार एडन मार्कराम आणि रीझा हेंड्रिक्स यांनी शानदार खेळी करत दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत नेले. मात्र, एडन मार्कराम १७ चेंडूत ३० धावा करून बाद झाला.

दक्षिण आफ्रिका ९६-२

https://twitter.com/BCCI/status/1734639607894171799

23:27 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, मॅथ्यू ब्रिट्झके धावबाद

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू झाला आणि मॅथ्यू ब्रिट्झकेने रीझा हेंड्रिक्सबरोबर आक्रमक फटकेबाजी करण्यात सुरुवात केली. मात्र, ही भागीदारी तोडण्यात टीम इंडियाला यश आले. रवींद्र जडेजाच्या षटकात मॅथ्यू ब्रिट्झके धावबाद झाला. त्याने ७ चेंडूत १६ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका ४१-१

https://twitter.com/BCCI/status/1734633807129539003

23:21 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: रिंकू सिंहच्या षटकाराने ड्रेसिंग रूमची काच फुटली

पहिल्या डावात फलंदाजी करताना रिंकू सिंहच्या षटकाराने ड्रेसिंग रूमची काच फोडली. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेने १५२ धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली आहे. टीम इंडियाला विकेट्सची गरज आहे.

दक्षिण आफ्रिका ३८-०

https://twitter.com/askrajeshsahu/status/1734616931225731124

23:10 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला १५२ धावांचे लक्ष्य मिळाले

गकेबराह येथे पाऊस थांबला असून दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. खेळ थांबला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पॉवर प्ले पाच षटकांचा असेल.

भारत १८०-७

22:57 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: पाऊस थांबला, लवकरच खेळ सुरू होईल

गकेबराहत पाऊस थांबला असून ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय खेळाडू मैदानात उतरून गोलंदाजीचा सराव करत आहेत. यावरून असे दिसते की भारतीय तीन चेंडू खेळण्यासाठी येणार नाही. दक्षिण आफ्रिकेला बदललेले लक्ष्य मिळू शकते. खेळ थांबला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या.

भारत १८०-७

22:31 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: पावसाने खेळ थांबवला

पावसामुळे दुसरा टी-२० थांबवण्यात आला आहे. भारताचा डाव संपणार होता तेव्हा पाऊस आला आणि पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. खेळ थांबला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. रिंकू सिंग ३९ चेंडूत ६८ धावा करून नाबाद आहे. मोहम्मद सिराज खाते न उघडता नाबाद आहे. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने ५६ धावांची खेळी केली. तिलक वर्माने २९ तर रवींद्र जडेजाने १९ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि अर्शदीप सिंग यांना खाते उघडता आले नाही. जितेश शर्माने केवळ एक धाव काढली. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने तीन विकेट्स घेतल्या. मार्को जॅनसेन, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि एडन मार्करन यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

भारत १८०-७

https://twitter.com/BCCI/status/1734615845974749370

22:14 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: भारताला एकापाठोपाठ दोन धक्के, रवींद्र जडेजा आणि अर्शदीप सिंग बाद

शेवटच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात रवींद्र जडेजा बाद झाला. त्याला जेराल्ड कोएत्झीने पायचीत केले. त्यानंतर आलेल्या अर्शदीप सिंगलाही अँडिले फेहलुकवायोने झेलबाद केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही आणि जडेजा १४ चेंडूत १९ धावा करून बाद झाला.

भारत १८०-७

https://twitter.com/BCCI/status/1734614434998637055

21:58 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: रिंकू सिंहचे शानदार अर्धशतक

रिंकू सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक पूर्ण केले. त्याने १६व्या षटकात एडन मार्करामच्या चेंडूवर एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने १६ षटकात ५ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या आहेत. रिंकू सिंग ३० चेंडूत नाबाद ५० तर रवींद्र जडेजा ३ चेंडूत ६ धावा करून नाबाद आहे.

भारत १४९-५

https://twitter.com/BCCI/status/1734610337163600361

21:55 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: भारताला पाचवा धक्का, जितेश शर्मा बाद

एका बाजूला रिंकू सिंह अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना दुसऱ्या बाजूने खराब फटका मारत जितेश शर्मा बाद झाला. त्याला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने ट्रिस्टन स्टब्सकरवी झेलबाद केले.

भारत १४२-५

https://twitter.com/BCCI/status/1734609874754187329

21:45 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: भारताला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

टीम इंडियाचा विस्फोटक खेळाडू सूर्यकुमार यादवने दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधारपदाला साजेशी अशी अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याला तबरेझ शम्सीने मार्को जॅनसेनकरवी झेलबाद केले. त्याने रिंकू सिंहबरोबर ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

भारत १२५-४

https://twitter.com/Saabir_Saabu01/status/1734608028148879459

21:37 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचे दोन हजार धावा पूर्ण

सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक पूर्ण केले आहे. यापाठोपाठ त्याने टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःच्या २००० धावा देखील पूर्ण केल्या आहेत. मार्को जॅन्सनच्या ११व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने धाव घेतली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.

भारत १२२-३

https://twitter.com/BCCI/status/1734598947124236684

21:30 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: कर्णधार सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक

भारताच्या डावातील १० षटके संपली आहेत. तीन गड्यांच्या मोबदल्यात टीम इंडियाने शंभर धावा पूर्ण केल्या आहेत. त्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपले दमदार अर्धशतक पूर्ण केले आहे. रिंकू सिंगने त्याला चांगली साथ दिली आहे. ही भागीदारी जर अशीच सुरु राहिली तर भारत १७० ते १८० धावांचा टप्पा गाठू शकतो.

भारत १०४-३

https://twitter.com/BCCI/status/1734603673102324082

21:06 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: मोठा फटका मारण्याच्या नादात तिलक वर्मा बाद

पहिल्या पॉवर प्ले मध्ये एकापाठोपाठ दोन विकेट्स पडल्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. तिलक वर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला आहे. त्याला जेराल्ड कोएत्झीने मार्को जॅनसेनकरवी झेलबाद केले.

भारत ५५-३

https://twitter.com/BCCI/status/1734597382443327897

21:01 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: भारताचे अर्धशतक पूर्ण, सूर्यकुमार- तिलक वर्माने सावरला डाव

सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल सुरुवातील बाद झाल्यानंतर टीम इंडिया संकटात सापडली होती. मात्र, त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी शानदार फटकेबाजी करत डाव पुढे नेला. पॉवर प्ले मध्ये टीम इंडियाचे अर्धशतक झाले असून ही भागीदारी आणखी वाढवण्याची गरज आहे.

भारत ५४-२

https://twitter.com/Adi_says_alot/status/1734597799986291184

20:46 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: भारताला दुसरा धक्का, शुबमन गिल बाद

भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. यशस्वी जैस्वाल पाठोपाठ शुबमन गिलही बाद झाला आहे. त्याला भोपळा फोडण्यात अपयश आले. लिझाद विल्यम्सने त्याला पायचीत बाद केले आहे.

भारत १६-२

https://twitter.com/BCCI/status/1734592291183178023

20:36 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: भारताला पहिला धक्का, यशस्वी जैस्वाल बाद

दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली आहे. यशस्वी जैस्वाल भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. त्याला मार्को जॅनसेनने डेव्हिड मिलरकरवी झेलबाद केले.

भारत ०-१

https://twitter.com/BCCI/status/1734589866770673977

20:16 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: दोन्ही संघांची प्लेईंग-११

भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

https://twitter.com/BCCI/status/1734583376240386092

दक्षिण आफ्रिका: मॅथ्यू ब्रिट्झके, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी.

https://twitter.com/ProteasMenCSA/status/1734584806271299699

20:12 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: ऋतुराज गायकवाडला आजारी असल्याने संघातून वगळले

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी कोणत्याही खेळाडूने पदार्पण केलेले नाही. या सामन्यात ऋतुराज गायकवाड खेळत नाहीये. तो आजारी आहे.

20:05 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: पाऊस थांबला, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१२ डिसेंबर) खेळवला जात आहे. उभय संघांमधला हा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/BCCI/status/1734582733391933815

19:50 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: नाणेफेकीआधी रिमझिम पावसाला सुरुवात

गकेबरहा येथे आज ७८ टक्के पावसाची शक्यता आहे. दिवसा ८४ टक्के आणि रात्री नऊ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसा आकाश ढगाळ राहण्याची शक्यता ८५ टक्के, तर रात्री ७३ टक्के आहे. आज दिवसभर आकाश ढगाळ राहील. हवामानाचा अंदाज असे दर्शवितो की दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे हवामान सुधारेल, परंतु पावसाचा धोका दूर करता येणार नाही. सध्या तिथे रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1734571829518270613

19:05 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: भारतीय प्रमाणवेळेनुसार आठ वाजता होणार नाणेफेक

आज दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार रात्री साडेआठपासून गाकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळतील. सध्या त्या ठिकाणी ढगाळ हवामान आहे. मात्र, सामन्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे.

https://twitter.com/BCCI/status/1734556656053166117

18:02 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमवर भारताची आकडेवारी काय आहे?

सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी २ सामने यजमान दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत तर एक सामना पाहुण्या संघाने जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. या खेळपट्टीवर सर्वाधिक १७९ धावा दक्षिण आफ्रिकेने २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केल्या होत्या. येथे सर्वात कमी धावसंख्या १४६ धावा आहे, जी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती. दोन्ही संघ आतापर्यंत २४ वेळा टी-२० मध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने १३ सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने १० सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.

18:01 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: सेंट जॉर्ज पार्कची खेळपट्टी आजच्या सामन्यात कोणाला मदत करणार फलंदाज की गोलंदाज?

सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना अनुकूल असते पण, जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी ती फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल होईल. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. येथे पाठलाग करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या ९९ धावांची आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करू शकतो. आजच्या सामन्यात आकाश ढगाळ राहणार असल्याने वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल, असे मानले जात आहे. पण या खेळपट्टीवर फिरकीपटूला फारशी मदत मिळण्याची शक्यता नाही.

17:58 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: आजच्या सामन्यात कोणत्या युवा खेळाडूंना संधी मिळू शकते?

रिंकू सिंह, यशस्वी आणि शुबमन या तिघांनाही एकत्र खेळणं जवळपास अशक्य आहे. शुबमन किंवा ऋतुराज या दोघांपैकी एकाला खेळण्याची संधी मिळू शकते, जे यशस्वीबरोबर सलामी देऊ शकतात. यशस्वीमध्ये सुरुवातीलाच आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे विश्वचषक संघात निवडले जाण्याचे मोठे दावेदार आहेत. बुमराह वर्ल्ड कपपासून खेळत नाहीये. दीपक चाहर सध्या आपल्या आजारी वडिलांची काळजी घेण्यासाठी भारतात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांनी छाप पाडली. आता या मालिकेत रवींद्र जडेजाही त्याच्याबरोबर आला आहे.

17:52 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: दक्षिण आफ्रिका आणि भारत दोन्ही संघ

दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, मॅथ्यू ब्रायझके, नॅंद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वेब्सी, सेंट ट्राइझुब्सी, केशव महाराज, लिझार्ड विल्यम्स.

भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.

17:50 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील टी-२० सामन्याची आकडेवारी

भारताने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकूण सात टी-२० सामने खेळले असून पाच जिंकले आहेत. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. त्याच वेळी, एकूणच दोन्ही संघ २४ टी-२० सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. त्यात भारताने १३ सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने १० सामने जिंकले आहेत. एकाचा निकाल लागला नाही. याशिवाय या दोघांमध्ये तीन टी-२० सामने झाले आहेत ज्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.

17:48 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: पोर्ट एलिझाबेथ येथील आजच्या सामन्यावरही पावसाचे सावट

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी नाही. वास्तविक, डरबन टी-२० प्रमाणेच पोर्ट एलिझाबेथमध्येही पाऊस खलनायक ठरू शकतो. म्हणजेच पावसामुळे दुसरा सामना देखील रद्द होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता पावसाची शक्यता ६० टक्के वर्तवण्यात आली आहे. याशिवाय आर्द्रता ७३.५ टक्के असणार आहे. तापमान २४ अंश सेल्सिअस ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तसेच, आकाशात दाट काळे ढग असतील. त्याचवेळी हा सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता सुरू होईल.

17:42 (IST) 12 Dec 2023
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचे टी-२० मालिका विजयाचे लक्ष्य

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील डरबनमधील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला. एवढा पाऊस झाला की नाणेफेकही होऊ शकली नाही. आता गाकेबरहा येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यावरही पावसाचे सावट आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या मालिकेकडे पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीचा सराव म्हणून पाहिले जात आहे.

https://twitter.com/BCCI/status/1734240179907342638

India vs South Africa 2nd T20 Live Updates in Marathi

India vs South Africa 2nd T20 Highlights Updates Score Today: भारत वि दक्षिण आफ्रिका दुसरा टी २० सामना हायलाईट्स अपडेट्स

भारताने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकूण सात टी-२० सामने खेळले असून पाच जिंकले आहेत. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.