India vs South Africa 2nd T20 Match Highlights Scorecard, 02 October 2022: डेव्हिड मिलरची झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी निसटता विजय मिळवला. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रिले रॉसो यांना भोपळाही फोडता आला नाही.त्यानंतर एडिन माक्ररमने १९ चेंडूत आक्रमक ३३ धावांची खेळी केली. मात्र ही त्याची खेळी अक्षर पटेलने दांडू गुल करत संपवली. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजी भोवती चांगलाच फास आवळला आहे. कारण सहजासहजी त्यांना धावा करता येत नाहीत. दव सुद्धा फारसे पडले नाही. पण क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांच्यातील शतकी भागीदारीने आफ्रिका सामन्यात परत आली.

गुवाहाटीमध्ये सध्या सुर्यकुमार यादवची त्सुनामी आली आहे. त्याने त्याचा फॉर्म पुढे सुरु ठेवत अर्धशतक पूर्ण केले. जवळपास निम्यापेक्षा कमी चेंडूत त्याने ते पूर्ण केले. १८चेंडूत ५४ धावा केल्या. त्याच बरोबर भारताने २०० धावा पूर्ण केल्या. दोघांमध्ये १०२ धावांची भागीदारी झाली आहे. एकही असा आफ्रिकेचा गोलंदाज नव्हता की त्याला भारतीय फलंदाजांनी चोपले नाही. केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव नंतर विराट कोहलीने पण आपले अर्धशतक केले असते. मात्र त्याला शेवटच्या षटकात चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने २९ चेंडूत ४९ धावा केल्या. दिनेश कार्तिकच्या शेवटच्या षटकातील आतिषबाजीने भारत २३७ धावांपर्यंत पोहचला. त्याने ७ चेंडूत १७ धावा केल्या. आता विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला २३८ धावांची गरज आहे.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या सहा षटकात आक्रमक सुरूवात केली.पहिल्या दहा षटकात भारतीय संघ १०० धावा फलकावर लावणार तेवढ्यात कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यातील निम्म्या धावा या चौकार आणि षटकार यांनीच केल्या आहेत. एडन मार्कराम दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत केएल राहुलचे अर्धशतक साजरे केले. त्याने २७ चेंडूत ५७ धावा केल्या. अर्धशतक होताच केएल राहुल बाद झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका भारताला आजपर्यंत मायदेशात जिंकता आलेली नाही त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला ही नामी संधी आहे. या सामन्यात भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत सलामीवीरांनी ५० धावांची भागीदारी केली. दोघांचेही योगदान हे सारखे आहे. एकाही गोलंदाजाला त्यांनी सोडले नाही.

Live Updates

India vs South Africa Highlights Match Updates; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी२० सामना हायलाइट्स अपडेट

23:10 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: भारत विजयी

डेविड मिलरची झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी निसटता विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिका २२१-३

23:07 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: डेविड मिलरचे शतक

डेविड मिलरने शतक झळकावले.

दक्षिण आफ्रिका २१४-३

23:04 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: क्विंटन डी कॉक-डेविड मिलरची दीडशतकी भागीदारी

क्विंटन डी कॉक आणि डेविड मिलरची दीडशतकी भागीदारीने आफ्रिका पुन्हा या सामन्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका २०१-३

22:55 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: शेवटचे दोन षटके भारतासाठी महत्वाचे

शेवटचे दोन षटके भारतासाठी खूप महत्वाचे आहेत. आफ्रिकेला अजून १२ चेंडूत ६३ धावांची गरज आहे.

दक्षिण आफ्रिका १७५-३

22:42 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: क्विंटन डी कॉकचे अर्धशतक

क्विंटन डी कॉकने ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

दक्षिण आफ्रिका १५५-३

22:38 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: क्विंटन डी कॉक-डेविड मिलर १०० धावांची भागीदारी

क्विंटन डी कॉक आणि डेविड मिलर यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली आहे. त्या दोघांच्या खेळीने आफ्रिका सामन्यात परत आली.

दक्षिण आफ्रिका १४७-३

22:30 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: डेविड मिलरचे अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरत मिलरने २५ चेंडूत ५० धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका १२२-३

22:18 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: डेविड मिलर आणि क्विंटन डी कॉकने डाव सावरला

डेविड मिलर आणि क्विंटन डी कॉकने डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी ३३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. ते अजूनही खेळत आहेत.

दक्षिण आफ्रिका १०२-३

22:10 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: सामन्यादरम्यान रोहित काही काळासाठी बाहेर

सामन्यादरम्यान रोहित काही काळासाठी बाहेर गेला आहे. रातकिडा तोंडात गेल्याने तो मैदानातून बाहेर गेला आहे.

दक्षिण आफ्रिका ७८-३

22:02 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: पहिल्या दहा षटकानंतर आफ्रिका संकटात

भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजी भोवती चांगलाच फास आवळला आहे. कारण सहजासहजी त्यांना धावा करता येत नाहीत. दव सुद्धा फारसे पडले नाही.

दक्षिण आफ्रिका ७०-३

21:51 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: अक्षर पटेलने मार्करमला केले त्रिफळाचीत

दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका बसला असून एडन मार्करम बाद झाला आहे. त्याने १९ चेंडूत ३३ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका ४७-३

21:47 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: पहिल्या पॉवर प्ले मध्ये आफ्रिकेची अडखळत सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले मध्ये आफ्रिकेची अडखळत सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड तयार केली आहे.

दक्षिण आफ्रिका ४५-२

21:29 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: सामन्याला पुन्हा सुरुवात

स्टेडियममधील गेलेल्या लाईट्स पुन्हा आल्या आहेत. आणि खेळाडू पुन्हा मैदानात आले.

दक्षिण आफ्रिका ५-२

21:13 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: स्टेडियममध्ये लाईट गेली

सामन्यात दुसऱ्यांदा व्यत्यय आला आहे. सध्या स्टेडियममध्ये लाईट गेली आहे.

दक्षिण आफ्रिका ५-२

21:07 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: एकाच षटकात आफ्रिकेला दुसरा धक्का

रिले रॉसोला अर्शदीप सिंगने शून्यावर बाद करत दक्षिण आफ्रिकेला अडचणीत आणले आहे.

दक्षिण आफ्रिका १-२

21:05 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का

सलामीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा शून्यावर बाद झाला.

दक्षिण आफ्रिका १-१

20:51 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २३८ धावांची गरज

दिनेश कार्तिकच्या शेवटच्या षटकातील आतिषबाजीने भारत २३७ धावांपर्यंत पोहचला. त्याने ७ चेंडूत १७ धावा केल्या. आता विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला २३८ धावांची गरज आहे.

भारत २३७-३

20:44 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: विराट कोहलीचे अर्धशतक हुकले

आजच्या सामन्यातील हे तिसरे अर्धशतक ठरले असते. केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव नंतर आता विराट कोहलीने पण आपले अर्धशतक केले असते. मात्र त्याला शेवटच्या षटकात चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने २९ चेंडूत ४९ धावा केल्या.

भारत २३६-३

20:37 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: सुर्यकुमार यादव बाद

१०२ धावांच्या भागीदारीनंतर सुर्यकुमार यादव बाद झाला. त्याने २२ चेंडूत ६१ धावांची खेळी केली.

भारत २०९-३

20:31 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: कोहली नंबर १

११,०१३ धावा करत रोहित शर्माला मागे टाकले आहे. तो आता टी२० पहिल्या स्थानी आहे. आणि त्याच बरोबर भारताने २०० धावा पूर्ण केल्या. दोघांमध्ये ९४ धावांची भागीदारी झाली आहे.

भारत २०१-२

https://twitter.com/BCCI/status/1576587706528043017?s=20&t=anhM2m_dqh9hf5aeqE_hyA

20:23 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: सुर्यकुमार यादव शो

गुवाहाटीमध्ये सध्या सुर्यकुमार यादवची त्सुनामी आली आहे. त्याने त्याचा फॉर्म पुढे सुरु ठेवत अर्धशतक पूर्ण केले. जवळपास निम्यापेक्षा कमी चेंडूत त्याने ते पूर्ण केले. १८चेंडूत ५४ धावा केल्या.

भारत १७८-२

20:16 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: कोहली - सुर्यकुमार यादव यांनी डाव सावरला

सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली - सुर्यकुमार यादव यांची तुफानी फटकेबाजी करत आहे.

सर्वात जलद १००० धावा करणाऱ्यांच्या यादीत त्याचा तिसरा क्रमांक लागला आहे.

भारत १५५-२

https://twitter.com/BCCI/status/1576583954563756033?s=20&t=lUdE044BDc62lHoNbGJUaw

19:59 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: भारताला दुसरा धक्का

अर्धशतक होताच केएल राहुल बाद झाला. त्याने २७ चेंडूत ५७ धावा केल्या. जवळपास २००च्या स्ट्राइकने धावा केल्या.

भारत १०७-२

19:55 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: केएल राहुलचे अर्धशतक

एडन मार्कराम दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत केएल राहुलचे अर्धशतक साजरे केले. त्याने २६ चेंडूत ५६ धावा केल्या.

भारत १०५-१

19:50 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: भारताला पहिला धक्का

पहिल्या दहा षटकात भारतीय संघ १०० धावा फलकावर लावणार तेवढ्यात कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यातील निम्म्या धावा या चौकार आणि षटकार यांनीच केल्या आहेत.

भारत ९६-१

19:39 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: सामन्यात व्यत्यय पण पुन्हा सुरु

मैदानात अचानक साप आल्याने सामना थोडा थांबवण्यात आला होता. पण तो पुन्हा सुरु झाला आहे. भारतीय संघाची सुरुवात अतिशय उत्तम झाली आहे. रोहित आणि राहुल यांनी दोघांचे योगदान अगदी बरोबरीचे आहे.

भारत ७२ -०

https://twitter.com/SUKc2019/status/1576575299457728513?s=20&t=cfokGgijrTM4HsoJnhGCcQ

19:28 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: पॉवर प्ले मध्ये भारताची आक्रमक सुरुवात

पॉवर प्ले मध्ये भारताची चांगली सुरुवात झाली असून रोहित आणि राहुल दोघेही पुढे कसे नेतात हे महत्वाचे आहे. दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ३३ चेंडूत ही ५३ धावांची भागीदारी केली.

भारत ५७-०

19:16 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: रोहित शर्माच्या बोटाला दुखापत

मागच्या षटकात वेन पारनेलच्या चेंडूवर चौकार मारताना रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली. पण थोड्या वेळाने मात्र फ़िजिओने येऊन थोडी मदत केली. त्यानंतरच्या चेंडूवर पंचानी वाईड बॉल दिला नाही.

भारत २१-०

19:03 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: भारतीय सलामीवीर मैदानात

भारतीय सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल मैदानात आले. रबाडाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत राहुलने खाते उघडले. पहिल्या षटकानंतर भारताने चांगली सुरुवात केली.

भारत ६-०

18:36 (IST) 2 Oct 2022
IND vs SA: प्लेईंग ११

दक्षिण आफ्रिकेने तबरेझ शम्सी ऐवजी लुंगी एनगिडीचा संघात समावेश केला आहे. भारतीय संघाने संघात कोणताही बदल न करता तोच संघ कायम ठेवला आहे.

India vs South Africa Highlights Match Updates; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी२० सामना हायलाइट्स अपडेट

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी२० सामना आज संध्याकाळी सात वाजल्यापासून गुवाहाटी येथील बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

Story img Loader