तिसऱया एकदिवसीय सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीन फलंदाजांना स्वस्तात बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. त्यांनतर दक्षिण आफ्रिकेच्या नवख्या क्विंटन डी कॉकचा याही सामन्यात झंझावात तसाच सुरू राहीला आणि याही सामन्यात त्याने तडफदार शतक ठोकले.
या मालिकेतील आपले तिसरे शतक साजरे केल्यानंतर ईशांत शर्माला डी कॉकला १०१ धावांवर बाद करण्यात यश आले. मात्र, दुसऱया बाजूने कर्णधार ए बी डीव्हिलियर्सने कोणताही दबाव न घेता फटकेबाजी सुरू ठेवली आहे. डीव्हिलियर्सही शतकादच्या उंबरठ्यावर आहे.
दोन लागोपाठच्या सामन्यांमधील पराभवांमुळे भारताने एकदिवसीय सामन्यात सपशेल शरणागती पत्करली. आता किमान तिसरा एकदिवसीय सामना जिंकून प्रतिष्ठा राखावी अशी क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे.

धावसंख्या-
दक्षिण आफ्रिका- ४ बाद २२८ (४१ षटके)

 

Story img Loader