India vs South Africa 3rd T20 Match Highlights Updates, 04October 2022: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ आजचा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल असे वाटत असताना मात्र भारताने शेवटचा सामना गमावला. मोहम्मद सिराजला बाद करत दक्षिण आफ्रिकेने भारतावर ४९ धावांनी विजय मिळवला. टी२० विश्वचषकापूर्वी हा टीम इंडियाचा शेवटचा सामना होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या पॉवर प्ले नंतर दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. कर्णधार टेम्बा बावुमाला उमेश यादवने बाद केले. क्विंटन डी कॉकची शानदार फलंदाजी सुरु असताना त्याला दुसऱ्यांदा जीवदान मिळाले. सिराजने त्याचा झेल सोडला. रिले रॉसो आणि डी कॉक यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्याने ३३ चेंडूत ५३ धावा करत स्वतःचे ही अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला दुसरा मोठा धक्का बसला. क्विंटन डी कॉक ४३ चेंडूत ६८ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरने त्याला धावबाद केले. शेवटच्या सामन्यात रिले रॉसोने शानदार शतक पूर्ण करत ४८ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या या शतकाने दक्षिण आफ्रिकने २०० धावांचा टप्पा पार केला असून भारतासमोर विजयासाठी २२८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संघाची धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा भोपळाही न फोडता तंबूत परतला. विराटच्या जागी श्रेयस अय्यरला स्थान मिळाले होते पण त्याचा फायदा मात्र त्याला उठवता आला नाही. एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेल्याने भारतीय संघाला मोठी भागीदारी करता आली नाही. सगळेच फलंदाज हे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर एकही फलंदाज टिकू शकला नाही.

भारतीय गोलंदाजीच्या तर आफ्रिकेने पार चिंधड्या उडवल्या. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित संघात सामील झालेला मोहम्मद सिराज देखील कसोटीला खरा उतरला नाही. तो देखील खूप महागात पडला. त्यामुळे रोहित शर्मा समोर ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात भारतीय संघ कमी पडला.

Live Updates

India vs South Africa Highlights Score Today, 04 October 2022 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी टी२० हायलाइट्स मॅच अपडेट

22:39 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: दक्षिण आफ्रिका विजयी

मोहम्मद सिराजला बाद करत दक्षिण आफ्रिकेने भारतावर ४९ धावांनी विजय मिळवला.

भारत सर्वबाद १७८

22:30 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: दीपक चाहर बाद

दीपक चाहरने १७ चेंडूत ३१ धावा करत भारताला १५० पार पोहचवले. त्याला ड्वेन प्रिटोरियसने बाद केले.

भारत १६८-९

22:08 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: आर. आश्विन बाद

आर. अश्विन बाद झाला. त्याला केशव महाराजने बाद केले. महाराजने दुसरा गडी बाद केला.

भारत १२०-८

22:03 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: अक्षर पटेल बाद

वेन पारनेलच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर अक्षर पटेल बाद झाला. त्याने ८ चेंडूत ९ धावा केल्या.

भारत ११४-७

21:57 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: हर्षल पटेल बाद

लुंगी एनगिडीने हर्षल पटेलला बाद केले. कुठलीही मोठी भागीदारी झाली नाही.

भारत १०८-६

21:54 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: भारतीय संघाच्या १०० धावा पूर्ण

पहिल्या दहा षटकानंतर १०० धावा पूर्ण केल्या. धावगती चांगली असली तरी हातात मात्र विकेट्स कमी आहेत.

भारत १०७-५

21:40 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: सुर्यकुमार यादव बाद

फटकेबाजी करण्याच्या नादात सुर्यकुमार यादवही बाद झाला. भारत संकटात सापडला आहे.

भारत ८६-५

21:35 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: दिनेश कार्तिक बाद, मोठा धक्का

खराब फटका मारण्याच्या नादात दिनेश कार्तिक बाद झाला. त्याने २१ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याला केशव महाराजने बाद केले.

भारत ७८-४

21:31 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: पॉवर प्ले मध्ये भारताची अडखळत सुरुवात

दिनेश कार्तिकच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ५० धावांचा टप्पा पार केला. पण भारताने त्यात ३ गडी गमावले. सामना जिंकण्यासाठी हातात विकेट्स असणे महत्वाचे आहे.

भारत ६४-३

21:25 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: ऋषभ पंत बाद

भारतीय संघाची धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. पहिले दोन गडी बाद झाले पण त्यानंतर पंत आणि कार्तिक यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने १४ चेंडूत २७ धावा केल्या.

भारत ४५-३

21:07 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: श्रेयस अय्यर बाद

श्रेयस अय्यर अवघी १ धाव करून बाद झाला. भारतीय संघ संकटात

भारत ४-२

20:59 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: भारताला मोठा धक्का रोहित बाद

भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा भोपळाही न फोडता तंबूत परतला.

भारत ०-१

20:48 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: भारतासमोर २२८ धावांचे आव्हान

रिले रॉसोच्या शानदार शतकाने दक्षिण आफ्रिका सुस्थितीत पोहचली आहे. २२८ धावांचे आव्हान भारतासमोर त्यांनी विजयासाठी ठेवले आहे.

दक्षिण आफ्रिका २२७-३

20:41 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: ट्रिस्टन स्टब्स बाद

दीपक चाहरने ट्रिस्टन स्टब्सला बाद केले. १८ चेंडूत २३ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका २०७-३

20:39 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: रिले रॉसोचे शानदार शतक

शेवटच्या सामन्यात रिले रॉसोने शानदार शतक पूर्ण केले. त्याने ४८ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या या शतकाने दक्षिण आफ्रिकने २०० धावांचा टप्पा पार केला.

दक्षिण आफ्रिका २०७-२

20:25 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: ट्रिस्टन स्टब्स- रिले रॉसो मध्ये अर्धशतकी भागीदारी

ट्रिस्टन स्टब्स आणि रिले रॉसो मध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. २७ चेंडूत ५१ धावांची भागीदारी केली.

दक्षिण आफ्रिका १७१-२

20:22 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: दीपक चाहरचा मांकडींगचा प्रयत्न

दीपक चाहरने ट्रिस्टन स्टब्स बरोबर मांकडींगचा प्रयत्न केला. पण त्याला धावबाद केले नाही. इशारा देऊन सोडून दिले.

दक्षिण आफ्रिका १६९-२

20:09 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: रिले रॉसोचे अर्धशतक

अक्षर पटेलला षटकार खेचत रिले रॉसोने अर्धशतक केले. २७ चेंडूत ५५ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका १४०-२

20:03 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: क्विंटन डी कॉक धावबाद

दक्षिण आफ्रिकेला दुसरा मोठा धक्का बसला असून फॉर्ममध्ये असलेला फलंदाज बाद झाला आहे. क्विंटन डी कॉकने ४३ चेंडूत ६८ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका १२०-२

19:54 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: पहिल्या दहा षटकात १०० धावा पूर्ण

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दहा षटकात १०० धावांचा टप्पा ओलांडला असून भारताला एका विकेट्सची गरज आहे. डिकॉक – रॉसोची आक्रमक फलंदाजी सुरु आहे.

दक्षिण आफ्रिका ११४-१

19:44 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: क्विंटन डी कॉकची शानदार फलंदाजी

क्विंटन डी कॉकची शानदार फलंदाजी, दुसऱ्यांदा मिळाले जीवदान सिराजने झेल सोडला. रिले रॉसो आणि डी कॉक यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्याने स्वतःचे ही अर्धशतक पूर्ण केले. ३३ चेंडूत ५३ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका ९१-१

19:38 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: क्विंटन डी कॉकचे २००० धावा

क्विंटन डी कॉकचे टी२० कारकिर्दीत ७२ सामन्यात २००० धावा पूर्ण. मोहम्मद सिराज आजच्या सामन्यात दोन षटकात पडला महाग त्याने आतापर्यंत २६ धावा दिल्या.

दक्षिण आफ्रिका ६८-१

19:28 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: पहिल्या पॉवर प्ले, दक्षिण आफ्रिकाची सावध सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले नंतर दक्षिण आफ्रिकाची सावध सुरुवात झाली आहे. कर्णधार टेम्बा बावुमाला उमेश यादवने बाद केले.

दक्षिण आफ्रिका ४८-१

19:21 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का

कर्णधार टेम्बा बावुमा बाद झाला. त्याने केवळ ३ धावा केल्या. रोहित शर्माने पकडला झेल

दक्षिण आफ्रिका ३०-१

19:15 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेची चांगली सुरुवात

दक्षिण आफ्रिकेची चांगली सुरुवात झाली असून क्विंटन डी कॉक थोडक्यात वाचला. सिराजच्या पहिल्या षटकात १३ धावा दिल्या.

दक्षिण आफ्रिका २३-०

18:58 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: सामन्याला सुरुवात

शेवटच्या टी२० सामन्याला सुरुवात झाली असून दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर खेळपट्टीवर आले आहेत.

18:36 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: दक्षिण आफ्रिका संघात एक बदल

कर्णधार टेम्बा बावुमाने दक्षिण आफ्रिका संघात एक बदल केला आहे. एनरिक नॉर्सिया ऐवजी ड्वेन प्रिटोरियसला संघात स्थान देण्यात आले.

18:33 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: भारतीय संघात बदल

श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, उमेश यादव यांची अंतिम अकरा मध्ये निवड करण्यात आली. तर अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली.

18:32 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: भारताने नाणेफेक जिंकली

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

18:15 (IST) 4 Oct 2022
IND vs SA: पिच रिपोर्ट

होळकर मैदानावरील खेळपट्टी ही फलंदाजीला साथ देणारी आहे. मैदान खूप लहान आहे. त्यामुळे या स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर होतात. असे मत सुनील गावसकर यांनी सांगितले.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ आजचा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोल ठरला. भारताने मालिका २-१ अशी जिंकली.