केप टाऊन :नव्या वर्षांतील पहिल्याच सामन्याला दुखापतीमुळे मुकावे लागल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या निर्णायक तिसऱ्या कसोटी क्रिकेट लढतीत दमदार कामगिरी करून मालिकेत २-१ असे ऐतिहासिक यश संपादन करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सेंच्युरिअनला झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने ११३ धावांनी दणदणीत विजय मिळवला; परंतु दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने भारतावर सात गडी राखून मात केली. पाठीच्या दुखापतीमुळे कोहली वाँडर्स येथील दुसऱ्या कसोटीत खेळला नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात २४० धावांचा बचाव करताना क्षेत्ररक्षणादरम्यान कोहलीची उणीव तीव्रतेने भासली. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून कारकीर्दीतील ९९व्या कसोटीत छाप पाडण्याबरोबरच कन्या वामिकाला पहिल्या वाढदिवसाची भेट देण्यासाठी कोहली आतुर आहे.
१९९२ पासून भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जात आहे; परंतु अद्याप एकदाही आफ्रिकन भूमीत भारताला कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे कोहलीला हा पराक्रम करण्यासह असंख्य वैयक्तिक विक्रम रचण्याचीही संधी आहे. केप टाऊनला होणाऱ्या या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोहली (६७ सामन्यांत ४० विजय) ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉसह (५७ सामन्यांत ४१ विजय) संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी येईल.
विहारीला डच्चू; श्रेयसची प्रतीक्षा कायम
कोहली परतल्याने हनुमा विहारीला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. दुसऱ्या कसोटीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी अर्धशतके झळकावून संघातील स्थान टिकवले. त्यामुळे मुंबईकर श्रेयस अय्यरला आफ्रिकेत पहिली कसोटी खेळण्यासाठी पुढील दौऱ्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते. उपकर्णधार के. एल. राहुल (दोन सामन्यांत २०४ धावा) सलामीला छाप पाडत असला तरी मयांक अगरवाल आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत यांना कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे.
सिराजच्या स्थानासाठी चुरस
मोहम्मद सिराज तिसऱ्या कसोटीसाठी १०० टक्के तंदुरुस्त नसल्याचे कोहलीने पत्रकार परिषदेदरम्यान जाहीर केले. त्यामुळे त्याच्या जागी उमेश यादव किंवा इशांत शर्मा यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. मुंबईकर शार्दूल ठाकूरने दुसऱ्या कसोटीत अष्टपैलू प्रदर्शन केल्यामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता कमी झाली आहे. न्यूलँड्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असून येथे पुरेशा प्रमाणात गवत असल्यामुळे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी या प्रमुख वेगवान जोडीच्या गोलंदाजीकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
एल्गर, एन्गिडी, रबाडा यांपासून भारताला धोका
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आणि लुंगी एन्गिडी-कॅगिसो रबाडा यांची वेगवान जोडी भारतासाठी धोकादायक ठरत आहे. एल्गरने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद ९६ धावांची जिगरबाज खेळी साकारून संघाला मालिकेत १-१ अशी बरोबरी साधून दिली, तर रबाडा आणि एन्गिडी यांनी आतापर्यंतच्या दोन लढतीत अनुक्रमे १३ आणि ११ बळी गारद केले आहेत. याव्यतिरिक्त तेम्बा बव्हुमा, रॅसी व्हॅन डर दुसेन आफ्रिकेसाठी मोलाचे योगदान देत आहेत. त्यामुळे िक्वटन डीकॉकच्या निवृत्तीचा आफ्रिकेला फारसा फटका बसला नाही.
भारताविरुद्धची तिसरी कसोटी आमच्यासाठी गेल्या १०-१५ वर्षांतील सर्वात महत्त्वाचा सामना असेल. आफ्रिकेतील कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी ही कसोटी मोलाची ठरेल. त्यामुळे माझ्यासह संघातील प्रत्येक खेळाडू छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर पाचव्या दिवसापर्यंत सामना रंगेल, अशी अपेक्षा आहे.
– डीन एल्गर, आफ्रिकेचा कर्णधार
१४६ विराट कोहलीला (७,८५४) कसोटी कारकीर्दीतील ८,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी १४६ धावांची गरज आहे.
५० कॅगिसो रबाडा कारकीर्दीतील ५०वा कसोटी सामना खेळणार आहे.
५ केप टाऊनमध्ये भारतीय संघ एकूण पाच कसोटी सामने खेळला आहे. त्यापैकी तीन कसोटींमध्ये भारताचा पराभव झाला आहे, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
५ रविचंद्रन अश्विनला (४३० बळी) भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवण्यासाठी पाच बळींची गरज आहे. अनिल कुंबळे (६१९) आणि कपिल देव (४३४) अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकांवर आहेत.
संघ
’ भारत : विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, इशांत शर्मा, जयंत यादव, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, प्रियांक पांचाळ.
’ दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर (कर्णधार), तेम्बा बव्हुमा (उपकर्णधार), कॅगिसो रबाडा, सॅरेल एव्र्ही, ब्युरन हेंड्रिक्स, जॉर्ज िलडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडिन मार्करम, विआन मुल्डर, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर दुसेन, कायले व्हेरायन, मार्को जॅन्सन, ग्लेन्टॉन स्ट्रमन, प्रेनलन सुब्रायन, सिसांडा मगाला, रियान रिकेलटन, दुआन ओलिव्हर.
’ वेळ : दुपारी १.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)