India vs South Africa 4th T20 Live Score, 15 November 2024: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात २-१ ने आघाडीवर आहे. जर भारताने चौथा सामना जिंकला तर संघ मालिका आपल्या नावे करेल, तर यजमान संघ सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आणि तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पुनरागमन करत सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

IND vs SA 4th t20i Live: भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्याचील चौथ्या टी-20 सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

21:24 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: संजू सॅमसनचे अर्धशतक

संजू सॅमसनने दोन डक नंतर आता चौथ्या टी-20 सामन्यात दणदणीत षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. सॅमसनने २८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा केल्या.

21:08 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: पॉवरप्ले

पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्मा झेलबाद झाला आहे. अभिषेकच्या बॅटची कड घेत चेंडू क्लासेनच्या हातात गेला. यासह अभिषेक शर्मा १८ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारत बाद झाला. यासह भारताने पॉवरप्लेमध्ये १ बाद ७३ धावा केल्या.

21:01 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: ५व्या षटकात कुटल्या २४ धावा

अभिषेक शर्माने सिमेलेनच्या पाचव्या षटकात २४ धावा केल्या. ज्यात २ वाईड बॉलचा समावेश आहे. ३ षटकार आणि एका चौकारासह भारताची धावसंख्या ५ षटकांत बिनबाद ६८ वर पोहोचली आहे.

20:58 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: अभिषेक शर्मा-संजूची तुफान फटकेबाजी

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने तुफान फटकेबाजी करत आहेत. चार षटकांत संजू आणि अभिषेकने मिळून ४४ धावा केल्या आहेत. तर ५व्या षटकात अभिषेकने पहिल्या चेंडूवर षटकार खेचताच भारताने ५० धावा पूर्ण केल्यात.

20:50 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनला जीवदान मिळाल्यानंतर दोघांनी चांगली फटकेबाजी केली. पहिल्या षटकात ४ धावा केल्यानंतर ३ षटकांमध्ये भारताने ३० धावा केल्या आहेत. संजू १४ धावा तर अभिषेक ९ धावांवर खेळत आहे.

20:39 (IST) 15 Nov 2024
IND vs SA: पहिले षटक

पहिले षटक मार्काे यान्सेन टाकत होता. पहिल्याच षटकात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोघेही बाद होता होता वाचले. संजू सॅमसनने तिसऱ्या चेंडूवर फटका मारला पण स्लिपमध्ये झेलबाद होता होता तो वाचला. तर चौथ्या चेंडूवर रिझा हेंड्रिक्सने अभिषेक शर्माचा झेल सोडला.

20:33 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: भारत-आफ्रिका सामन्याला सुरूवात

भारत दक्षिण आफ्रिका चौथ्या टी-20 सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आहे. तर मार्काे यान्सेन गोलंदाजी करत आहे.

20:29 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात

मालिरकेतील अखेरच्या टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरले आहेत. तीन सामन्यांनंतर चौथा टी-२० सामना निर्णायक ठरणार आहे.

20:05 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):

रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, अँडीले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला

20:05 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: भारत (प्लेइंग इलेव्हन):

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती

20:02 (IST) 15 Nov 2024
IND vs SA Pitch Report:नाणेफेक

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अनेकदा विजय मिळवला आहे. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही.

19:35 (IST) 15 Nov 2024

IND vs SA Pitch Report: धावांचा पडणार पाऊस

जोहान्सबर्गची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याने या मैदानावर मोठ्या प्रमाणावर धावा होण्याची शक्यता आहे. भारताने या मालिकेत दोन्ही वेळा प्रथम फलंदाजी करत सामना जिंकला आहे. अशा स्थितीत चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास संघ मोठा धावा करू शकतो

19:04 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड

भारत आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत २९ टी-२० सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. भारत १६ विजयांसह आघाडीवर आहे, तर दक्षिण आफ्रिकेने १२ विजय मिळवले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.

18:57 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: अर्शदीप सिंग

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ५९ टी-२० सामन्यात ९२ विकेट घेतले आहेत. त्याला या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याची संधी आहे. या सामन्यात अर्शदीप पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर तो युझवेंद्र चहलचा (९६ विकेट) सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मागे टाकेल.

18:43 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: कर्णधार सूर्यकुमार यादव

भारतीय संघाला सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाची चांगली संधी आहे. रोहित शर्माच्या टी-२० मधील निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर दिली आहे. भारतीय क्रिकेट संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे.

18:37 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-२० मालिका आफ्रिकेत खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले ३ सामने झाले असून त्यातील दोन सामने भारताने तर आफ्रिकेने १ सामना जिंकला आहे. टीम इंडियाला ही मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. भारत सध्या २-१ ने आघाडीवर आहे आणि किमान मालिका गमावण्याच्या स्थितीत नाही. यजमान मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करतील

India vs South Africa 4th T20I Live Updates in Marathi: भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना आज खेळवला जात आहे. भारत २-१ ने या मालिकेत पुढे आहे. त्यामुळे आजचा सामना कोणता संघ जिंकणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.