भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार होता, पण सतत पडणाऱ्या पावसामुळे अखेर एकही चेंडू न खेळता सामना रद्द करण्यात आला. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तिकीट विक्रीवर परिणाम झाला होता. तशातच या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे अखेर पावसाने तुफान बॅटिंग करत सामना रद्द करण्यास भाग पाडले.
धरमशाला येथे दुपारी १.३० वाजता सामना सुरू होणार होता, पण पाऊस आणि ओली खेळपट्टी यामुळे सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. आधी ओली खेळपट्टी आणि २.३० नंतर पाऊस अशा दुहेरी कारणामुळे अखेर ५.३० च्या सुमारास सामना रद्द करण्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला.
The 1st ODI between India and South Africa has been abandoned due to rains.#INDvSA pic.twitter.com/Oc5iO6q9dj
— BCCI (@BCCI) March 12, 2020
भारताचा संघ –
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल
आफ्रिकेचा संघ –
क्विंटन डी कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), टेंबा बावुमा, रासी वॅन डर डसन, फाफ डु प्लेसिस, कायल वेरिन, हेन्रीच क्लासें, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडिल फेलुक्वायो, लुंगी एनगीडी, लुथो सिपाम्ला, ब्युरॉन हेंडरिक्स, एनरिच नॉर्ये, जॉर्ज लिंड, केशव महाराज
पावसामुळे अद्याप नाणेफेकही झालेली नाही. जर ६.३० च्या आधी पाऊस थांबला आणि खेळासाठी पोषक वातावरण निर्माण झाले, तर २०-२० षटकांचा सामना खेळता येऊ शकतो.
धरमशाला येथील ताजी दृश्ये बीसीसीआयनं जाहीर केली आहेत. अद्यापही आकाशात ढग दाटून आले असून पाऊस सुरुच आहे. वातारणात कुठलीही सुधारणा झाली नसल्याने सामना अद्याप सुरु होण्याची चिन्हे नाहीत.
पाऊस सुरु झाल्याने सामना सुरु व्हायला आणखी उशीर होणार आहे. सुरुवातीला पावसाची चिन्हे असल्याने नाणेफेकही अद्याप होऊ शकलेली नाही.
आजच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सध्या पाऊस पडत नसला तरी ओल्या खेळपट्टीमुळे नाणेफेक उशीराने होणार आहे.