India vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Highlights Match Updates: विश्वचषकात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने सपशेल लोटांगण घातले. भारताने तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. या विजयाने टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे. आजच्या सामन्यात बर्थडे बॉय विराट कोहलीने वन डे क्रिकेटमधील ४९वे शतक झळकावत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
विश्वचषक २०२३च्या ३७व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या. विराट कोहली १२१ चेंडूत १०१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा १५ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला. त्याआधी श्रेयस अय्यरने ७७ धावा केल्या. श्रेयस आणि विराट यांच्यात १३४ धावांची शतकी भागीदारी केली.
तत्पूर्वी, टीम इंडियाची सुरुवात खूपच आक्रमक झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर धावा बोलत पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ९० धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित ४० धावा करून बाद झाला. रोहित शर्माने शुबमन गिलसह ३५ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. रोहित २४ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.
शुबमन गिल २४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. ९३ धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी १३४ धावांची भागीदारी केली. श्रेयस ८७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून बाद झाला. केएल राहुल काही विशेष करू शकला नाही आणि त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने जलद २२ धावा केल्या.
विराटने ४९व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १२१ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याचवेळी जडेजाने २९ धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. विराटचे हे ४९वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना या विश्वचषकातील सर्वात मनोरंजक सामना ठरू शकतो, असे बोलले जात आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आहेत. भारताने आतापर्यंतचे सातही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संपन्न झाला आहे.
CWC 2023 India vs South Africa Highlights Score Updates in Marathi: भारत वि दक्षिण आफ्रिका हायलाईट्स स्कोअर अपडेट्स
विश्वचषकात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने सपशेल लोटांगण घातले. भारताने तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. या विजयाने टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे. आजच्या सामन्यात बर्थडे बॉय विराट कोहलीने वन डे क्रिकेटमधील ४९वे शतक झळकावत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दक्षिण आफ्रिकेने ७९ धावांत नऊ विकेट्स गमावल्या आहेत. कागिसो रबाडा २६ चेंडूत सहा धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. या सामन्यातील त्याचे हे सहावे यश आहे.
दक्षिण आफ्रिका ७९-९
दक्षिण आफ्रिकेने ७९ धावांत आठ विकेट्स गमावल्या आहेत. मार्को यानसेनने ३० चेंडूत १४ धावा केल्या आहेत. कुलदीप यादवने त्याला रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद केले.
दक्षिण आफ्रिका ७९-८
दक्षिण आफ्रिकेची सातवी विकेट ६७ धावांवर पडली. केशव महाराज ११ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला क्लीन बोल्ड केले. आता कागिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन क्रीजवर आहेत. २० षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ६९/७ आहे.
दक्षिण आफ्रिका ६९-७
दक्षिण आफ्रिकेने ५९ धावांत सहा विकेट्स गमावल्या आहेत. डेव्हिड मिलर ११ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला क्लीन बोल्ड केले. या सामन्यातील त्याचे हे तिसरे यश आहे. आता मार्को जानसेन आणि केशव महाराज क्रीजवर आहेत.
दक्षिण आफ्रिका ५९-६
विराटने ४९व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १२१ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याचवेळी जडेजाने २९ धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. विराटचे हे ४९वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. यानंतर त्याला सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री यांनी शुभेच्छा दिल्या.
https://twitter.com/sachin_rt/status/1721147544389185802
https://twitter.com/RaviShastriOfc/status/1721119891640774948
दक्षिण आफ्रिकेने ४० धावांवर पाच विकेट्स गमावल्या आहेत. मोहम्मद शमीने डुसेनला स्टंपसमोर पायचीत केले. त्याने ३२ चेंडूत १३ धावा केल्या. रिव्ह्यू घेत भारताला पुन्हा एकदा विकेट मिळाली. आता मार्को यानसेन डेव्हिड मिलरसोबत क्रीजवर आहे. १४ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ४२/५ अशी होती.
दक्षिण आफ्रिका ५२-५
दक्षिण आफ्रिकेने ४० धावांत चार विकेट्स गमावल्या आहेत. रवींद्र जडेजाने हेन्रिक क्लासेनला बाद केले. त्याने ११ चेंडूत एक धाव केली. जडेजाने रिव्ह्यू घेत ही विकेट मिळवली.
दक्षिण आफ्रिका ४०-४
भारतीय गोलंदाजांनी अफलातून प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेला बॅकफुटवर ढकलेले आहे. पॉवर प्ले टीम इंडियाने तीन विकेट्स घेत सामन्यात आघाडी घेतली आहे. मोहम्मद शमीने एडन मार्करामला के.एल. राहुलकरवी झेलबाद केले. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका ३५-३
३२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय संथ झाली आहे. आठ षटकांनंतर संघाची धावसंख्या २१/१ अशी होती. याचाच दबाव संघावर आला आणि कर्णधार टेम्बा बावुमा बाद झाला. त्याला जडेजाने त्याला त्रिफळाचीत केले आहे. त्याने १९ चेंडूत ११ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका २२-२
भारताने ठेवलेल्या ३२७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक बाद झाला आहे. त्याला मोहम्मद सिराजने त्याला त्रिफळाचीत केले. त्याने १० चेंडूत ५ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका ६-१
भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या. विराट कोहली १२१ चेंडूत १०१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा १५ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला. त्याआधी श्रेयस अय्यरने ७७ धावा केल्या.
भारत ३२६-५
विराट कोहलीने १२१ चेंडूत १०१ धावा करत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४९वे शतक होते. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. सचिनने वन डेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. सचिनने ४५२ एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर सचिनने आपल्या २७७व्या एकदिवसीय डावात ४९ शतके झळकावली आहेत. यात विशेष म्हणजे आज त्याच्या वाढदिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले.
वन डेत सर्वाधिक शतके
४९* विराट कोहली (२७७ डाव)
४९ सचिन तेंडुलकर (४५२ डाव)
३१* रोहित शर्मा (२५१ डाव)
३० रिकी पाँटिंग (३६५ डाव)
२८ सनथ जयसूर्या (४३३ डाव)
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४९वे शतक झळकावत एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरने देखील ४९ शतके त्याच्या कारकिर्दीत वन डेमध्ये झळकावली आहेत.
भारत ३१६-५
पाचवा धक्का ४६व्या षटकात २८५ धावांवर बसला. तबरेझ शम्सीने सूर्यकुमार यादवला यष्टिरक्षक डी कॉककरवी झेलबाद केले. तो १४ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने २२ धावा करून बाद झाला. सध्या विराट कोहली ९७ धावा करून क्रीजवर आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी रवींद्र जडेजा आला आहे.
भारत २९३-५
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721136023948943468
श्रेयस अय्यर पाठोपाठ मोठा फटका मारण्याच्या नादात श्रेयस अय्यर बाद झाला आहे. त्याने केवळ १७ चेंडूत ८ धावा केल्या आहेत. जर टीम इंडियाला ३०० ते ३२५ धावा करायच्या असतील तर विराट कोहली खेळपट्टीवर टिकून राहणे आवश्यक आहे.
भारत २५४-४
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721131434856059027
शुबमन गिलने डावातील ९व्या षटकातील तिसरा चेंडू हलक्या हाताने खेळला. हा मार्को जॅन्सनचा अचूक लेन्थ बॉल होता जो गिलने मिड ऑफला पाठवला. बावुमा धावत आला आणि चेंडू पकडत थ्रो केला. तोपर्यंत गिलने धाव काढली होती. सिंगल पूर्ण होताच विराट गिलला हसतहसत बोलला. तो म्हणाला की, "मरवाओ गे क्या?" त्यानंतर शुबमन गिलने शानदार षटकार मारला.
भारत २४८-३
जेव्हा विराट कोहली आणि श्रेयस अय्यर खेळत होते तेव्हा केशव महाराज भेदक गोलंदाजी करत होता. त्याला विरोध करण्यासाठी ड्रेसिंगरूममधून कर्णधार रोहित शर्माने इशान करवी मेसेज पाठवला होता. श्रेयसने आक्रमक फलंदाजी करावी आणि विराटने एक बाजू सांभाळून धरावी.
भारत २४१-३
https://twitter.com/TotallyImro45/status/1721124845919010858
दक्षिण आफ्रिकेला विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची शतकी भागीदारी तोडण्यात यश आले. श्रेयस अय्यरचे शतक हुकले त्याने ८७ चेंडूत ७७ धावा केल्या. त्यात त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. त्याला लुंगी एनगिडीने मार्कराम झेलबाद केले. आता मदार विराट कोहली आणि के.एल. राहुलवर असणार आहे.
भारत २२७-३
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721115762700730664
विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. आता दोघेही चांगल्या गतीने धावा करत आहेत आणि टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. सध्या कोहली ५६ आणि श्रेयस ६१ धावांवर खेळत आहे.
भारत १९८-२
श्रेयस अय्यरने ६४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने विराट कोहलीबरोबर चांगली भागीदारी रचली आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने ६७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने त्याच्या वाढदिवशी शानदार खेळी केली आहे आणि कठीण खेळपट्टीवर टीम इंडियाला चांगल्या स्थितीत ठेवले आहे.
भारत १९६-२
विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही सावधपणे खेळत आहेत. विराटने त्याच्या वाढदिवशी अर्धशतक करत त्याच्या चाहत्यांना सुंदर भेट दिली आहे. त्या अर्धशतकाचे रुपांतर विराट शतकात करतो का? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. दोघांमध्ये सध्या ८४ धावांची भागीदारी झाली आहे.
भारत १७७-२
१८ षटकांनंतर भारताने २ गडी गमावून ११८ धावा केल्या होत्या. सध्या श्रेयस अय्यर २९ चेंडूत १८ धावा तर विराट कोहली ४७ चेंडूत ४० धावा करत आहे. दोघांमध्ये ४०+ धावांची भागीदारी झाली आहे. अशीच मोठी भागीदारी करण्याची टीम इंडियाला गरज आहे. जर ३०० धावा करायच्या असतील तर ही भागीदारी १०० पेक्षा जास्त धावांची होणे गरजेचे आहे.
भारत १३४-२
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721107783821717641
भारताला ११व्या षटकात ९३ धावांवर दुसरा धक्का बसला. शुबमन गिल २४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. त्याला केशव महाराजांनी क्लीन बोल्ड केले. आता टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर आहे. आज त्याचा वाढदिवस असल्याने त्याच्याकडून चाहते शतकाची अपेक्षा करत आहेत. त्याच्या शतकासाठी चाहते मीम्स बनवत आहेत.
https://twitter.com/RomanaRaza/status/1721093362512789813?s=20
कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहलीने भारताचा डाव सांभाळला होता. मात्र, केशव महाराजच्या अप्रतिम फिरकी चेंडूवर शुबमनला त्रिफळाचीत केले. त्याने २४ चेंडूत २३ धावा केल्या. टीम इंडियाला आता मोठ्या भागीदारीची गरज आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना भारताचा डाव पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.
भारत ९३-२
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721095667538661601
भारताने पाच षटकात एकही विकेट न गमावता ६२ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा रोहित सहा चौकार आणि दोन षटकार मारत ४० धावा करून बाद झाला. मात्र, त्याने टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. पाचव्या षटकात १६ धावा आल्या. चौथ्या षटकात १० धावा, तिसऱ्या षटकात १३ धावा, दुसऱ्या षटकात १७ धावा आणि पहिल्या षटकात पाच धावा झाल्या. सध्या शुबमन गिल आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.
भारत ७६-१
भारताने पाच षटकांनंतर एकही विकेट न गमावता ६० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात कर्णधार रोहित शर्मा २४ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करून बाद झाला. त्याने शुबमनबरोबर अर्धशतकी भागीदारी केली. त्याच्या या छोट्या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले.
भारत ६२-१
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721090593898783036
कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आक्रमक सुरुवात करत भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. चौकारांची आतिषबाजी करत पहिल्या चार षटकात ४० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दरम्यान रोहित शर्माचा झेल देखील तबरेझ शम्सीने सोडला.
भारत ४५-०
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
https://twitter.com/RevSportz/status/1721077945215938759
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपली ताकद लक्षात घेता टीम इंडियाला धावांचा पाठलाग करायला आवडेल असे मानले जात होते, पण रोहितने वेगळा निर्णय घेतला. तो म्हणाला की, "मला आव्हानाचा सामना करायचा आहे. भारताने प्लेइंग-११ मध्ये एकही बदल केला नाही. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीच्या जागी वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीचा समावेश केला."
https://twitter.com/cricketworldcup/status/1721077241830871380
CWC 2023 India vs South Africa Highlights Score Updates in Marathi: भारत वि दक्षिण आफ्रिका हायलाईट्स स्कोअर अपडेट्स
भारताने दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाचा अजिंक्य राहण्याचा ट्रेंड कायम आहे. सलग आठ विजयांसह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून आता भारत अव्वल स्थानावर राहणार हेही निश्चित झाले आहे.