India vs South Africa Weather and Pitch Report: भारतीय क्रिकेट संघ आज, गुरुवारी (१४ डिसेंबर) तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना यजमान दक्षिण आफ्रिकेशी खेळणार आहे. जोहान्सबर्गची खेळपट्टी कशी असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. तिसरा टी-२० जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा त्याचा प्रयत्न असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम काय केले पाहिजे आणि या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या किती आहे? जाणून घेऊ या.

जोहान्सबर्गच्या न्यू वाँडरर्स स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग आहे. चौकार आणि षटकारांचा पाऊस इथे पाहायला मिळतो. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील या खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्येचा सामना होऊ शकतो. मात्र, सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना इथे मदत मिळू शकते. या खेळपट्टीवर, धावांचा पाठलाग करणे अधिक सोयीस्कर राहील. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १५ सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने १७ सामने जिंकले आहेत. या खेळपट्टीवरील सर्वोच्च धावसंख्या २६० धावांची आहे जी २००७ मध्ये श्रीलंकेने केनियाविरुद्ध केली होती. सर्वात कमी धावसंख्या ६३ धावा आहे. जोहान्सबर्गमध्ये भारताने पाच टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. प्रथम फलंदाजी करणारा संघ दोनदा जिंकतो आणि पाठलाग करणारा संघ एकदा जिंकतो.

Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा: AUS vs PAK 1st Test: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्टीव्ह स्मिथचे सूचक विधान; म्हणाला, “शाहीन आफ्रिदी हा नेहमीच…”

जोहान्सबर्गची खेळपट्टी कशी खेळते?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स मैदानावर खेळवला जाईल. वाँडरर्सच्या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व होते. या मैदानावर भरपूर चौकार आणि षटकार मारले जातात आणि चांगल्या उसळीमुळे चेंडू सहजपणे बॅटवर येतो. मात्र, सुरुवातीला खेळपट्टीत ओलावा असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळते.

वाँडरर्सवर ३२ टी-२० सामने खेळले आहेत

दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमध्ये २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी १४ जिंकले आहेत आणि १० गमावले आहेत. एकूण टी-२० मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ २५ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने १३ आणि दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. न्यू वाँडरर्स स्टेडियमवर आतापर्यंत ३२ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेने १४ जिंकले आहेत आणि पाहुण्या संघाने १० जिंकले आहेत. ८ सामन्यांत एकही निकाल लागला नाही. भारताने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० सामने खेळले असून त्यात २ जिंकले आहेत.

हेही वाचा: IND vs SA: भारतासाठी आज ‘करो या मरो’! श्रेयस-बिश्नोई संघात पुनरागमन करणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी टी-२० हवामान अंदाज

हवामान वेबसाइट Accuweather नुसार, जोहान्सबर्गमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच १४ डिसेंबर रोजी सकाळी पावसाचा कोणताही अंदाज नाही मात्र, दुपारी आणि संध्याकाळी ३५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमान २६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पूर्ण २० षटकांचा खेळ पाहिला मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.