India vs South Africa (IND vs SA) T20I Series 2024 Live Streaming: टी-२० विश्वचषक २०२४ नंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या काही षटकांमध्ये चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. यावेळी दोन्ही संघ टी-२० मालिकेसाठी एकमेकांविरूद्ध उभे ठाकणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघही दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. पण हे सामने टीव्ही आणि मोबाईलवर लाइव्ह कुठे पाहता येणार, जाणून घेऊया.

भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबरला होणार आहे. एकूण ४ सामने या मालिकेत होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर कामगिरी करणं हे फलंदाजांसाठी कायमचं अवघड असतं, त्यामुळे भारतीय संघातील फलंदाज कशी कामगिरी करतात, यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

ICC Announced Women Ftp For 2025-29 Womens Champions Trophy to be Held First Time See India Schedule
Women’s Cricket: ४ वर्षांत ४ स्पर्धा! ICC ने महिला क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर करताना केली मोठी घोषणा, पहिल्यांदाच खेळवली जाणार ‘ही’ मोठी स्पर्धा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
IND vs SA T20I Series Full Schedule With Date and Time with IST And Squads India South Africa
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
Bhau Beej 2024 Date Time Shubh Muhurat Rituals in Marathi
Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ
Titeekshaa Tawde Nashik Home Tour
Video : तितीक्षा तावडेचं सासरचं घर पाहिलंत का? दिवाळीच्या दिवशी दाखवली घराची झलक; दारावर आहे खास नेमप्लेट
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Virat Kohli run out after Matt Henry direct hit video viral IND vs NZ 3rd Test
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO
India cancel intra-squad match With Team India A team to focus on net practice before Border-Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल, ‘हा’ सामना केला रद्द, काय आहे कारण?

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिका ही २४ आणि २५ नोव्हेंबरला होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वी आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करून खेळाडू आयपीएल फ्रँचायझीचे लक्ष वेधून घेऊ शकतात. भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचे सामने भारतात टीव्हीवर स्पोर्ट्स १८ चॅनलवर पाहता येणार आहेत. तर मोबाईल अ‍ॅपवर जिओ सिनेमावर लाईव्ह पाहता येईल.

हेही वाचा – Robin Uthappa: “देशहित आधी आणि नंतर फ्रँचायझीचे खेळाडू…”, रॉबिन उथप्पा CSK वर भडकला, रचिन रवींद्रला कसोटीपूर्वी मदत केल्याबद्दल सुनावलं

भारत वि दक्षिण आफ्रिका हेड टू हेड

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २७ टी-२० सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने १५ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील केवळ एका सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही.

IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.

हेही वाचा – Shreyas Iyer Double Century: २४ चौकार, ९ षटकार, २३३ धावा… श्रेयस अय्यरने वादळी खेळीसह मोडला स्वत:चाच मोठा विक्रम, IPL लिलावापूर्वी टी-२० अंदाजात केली फटकेबाजी

दक्षिण आफ्रिका
एडन मारक्रम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मॅपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, एंडिले सिमलेन, लूथो सिम्पाला, ट्रिस्टन स्टब्स

IND vs SA: भारत वि दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचे वेळापत्रक

८ नोव्हेंबर – पहिला टी-२० सामना – डरबन – रात्री ८.३० वा
१० नोव्हेंबर – दुसरा टी-२० सामना – गकेबेहरा – रात्री ७.३० वा
३ नोव्हेंबर – तिसरा टी-२० सामना – सेंच्युरियन – रात्री ८.३० वा
१५ नोव्हेंबर – चौथा टी-२० सामना – जोहान्सबर्ग – रात्री ८.३० वा