India vs Sri Lanka T20 Highlights Score Updates: भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आणि त्यात भारतीय संघाने २ धावांनी विजय मिळवला. अक्षर पटेलने टाकलेल्या शेवटच्या जादुई षटकाने भारताला विजय मिळवून दिला. शिवम मावीने धारदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना पळताभुई थोडी केली. हार्दिक पांड्याने संघाच्या कर्णधाराची जबाबदारी उत्तम पार पाडली. हार्दिकच्या नेतृत्वातील युवा ब्रिगेडने श्रीलंकेविरुद्धच्या या टी२० मालिकेत गुणवत्ता सिद्ध करत वानखेडे मैदानावर २०० पेक्षा कमी धावसंख्येचा पहिल्यांदा बचाव करताना एक नवीन इतिहास रचला.

खराब सुरुवात असूनही अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांच्या शानदार भागीदारीमुळे टीम इंडियाने पाच गडी गमावून १६२ धावा केल्या. दीपक हुडाने सर्वाधिक ४१ धावा केल्या. इशान किशनने ३७, अक्षरने ३१आणि हार्दिकने २९ धावा केल्या. कासून रजिथा वगळता श्रीलंकेच्या सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दिलशान मदुशंका, महेश तीक्षणा, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा आणि धनंजया डी सिल्वा यांनी मिळून पॉवर प्ले मध्ये भारताच्या धावसंख्येला ब्रेक लावला. टीम इंडियाच्या बाकी फलंदाजांना फारशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सूर्यकुमार यादव, शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांना दोन आकडी धावसंख्या देखील गाठता आली नाही.

आशिया चषक २०२२ मध्ये भारत आणि श्रीलंका शेवटचे आमनेसामने आले होते. त्यानंतर सुपर-१२ फेरीत श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव करून मोठा धक्का दिला. त्या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकला नाही. यानंतर श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. श्रीलंकेची टी२० विश्वचषकात समान कामगिरी नसली तरी उपांत्य फेरीतही स्थान मिळवता आले नाही.

Live Updates

India vs Sri Lanka 1st T20I Highlights Score Updates: भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना हायलाइट्स अपडेट

22:59 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्या रंगतदार सामन्यात भारताने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला

भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्या रंगतदार सामन्यात भारताने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला.

श्रीलंका १६०-१०

22:39 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला १ चेंडूत ४ धावांची गरज

श्रीलंकेला १ चेंडूत ४ धावांची गरज आहे.

श्रीलंका १५९-९

22:35 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: शेवटच्या षटकात ६ चेंडूत १२ धावांची गरज

शेवटच्या षटकात ६ चेंडूत १२ धावांची गरज

श्रीलंका १५१-८

22:25 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला आठवा धक्का

शिवम मावीने भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेच्या नांग्या ठेचल्या. अवघी १ धाव महेश तीक्षणा बाद झाला.

श्रीलंका १३२-८

https://twitter.com/BCCI/status/1610318740566212610?s=20&t=D5LWr8rDAuOGpJURQqdanA

22:19 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला मोठा धक्का, दसून शनाका बाद

उमरान मलिकने भारताला मोठा ब्रेक थ्रू दिला. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाला ४५ धावांवर चहलकरवी झेलबाद केले. २० चेंडूत ३१ धावांची गरज आहे.

श्रीलंका १२९-७

https://twitter.com/BCCI/status/1610317322908229634?s=20&t=8pktVyhOBiKrZgeSqXNGTg

22:16 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा

भारतीय गोलंदाजांनी शिस्त पाळत प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले. पण शेवटच्या षटकात शनाकाला बाद करणे आवश्यक आहे.

श्रीलंका १२९-६

22:11 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: दसून शनाकाची झुंज सुरूच

एका बाजूला लागोपाठ विकेट्स पडत असताना दसून शनाका लंकेसाठी झुंजताना दिसत आहे. २४ चेंडूत ४० धावांची श्रीलंकेला विजयाची गरज आहे.

श्रीलंका १२३-६

22:05 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: वानिंदू हसरंगा बाद, श्रीलंकेला मोठा धक्का

शिवम मावीच्या गोलंदाजीवर वानिंदू हसरंगा धावबाद होताना वाचला. सध्या सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. श्रीलंकेला पुढच्याच चेंडूवर शिवम मावीने त्याला पांड्याकरवी झेलबाद केले. त्याने २१ धावा केल्या.

श्रीलंका १०८-६

https://twitter.com/BCCI/status/1610313651512315907?s=20&t=gGjF8DpysTEJlxoUDEa-tA

21:58 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: शेवटचे सहा षटके भारतासाठी महत्वाचे

श्रीलंकेने पाच विकेट्स गमावल्यानंतरही कर्णधार दसून शनाका आणि वानिंदू हसरंगा यांची भागीदारी हळूहळू पुढे जात आहे. त्यात दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे मैदान देखील ओलसर झाले आहे. भारताला विकेट्सची गरज आहे. चहलच्या एकाच षटकात दोन षटकार हसरंगाने मारले.

श्रीलंका १०७--५

21:46 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला पाचवा धक्का, हार्दिक पांड्याला झाली दुखापत

भानुका राजपक्षेचा झेल घेताना भारताचा हार्दिक पांड्याला दुखापत झाली. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर त्याने झेल घेतला आणि त्याचा स्नायू दुखावला गेला. भानुकाने १० धावा केल्या.

श्रीलंका ६८-५

https://twitter.com/BCCI/status/1610309062390091776?s=20&t=p-FTQRx-AVNWegUh6Jn8Ww

21:32 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला चौथा धक्का, कुसल मेंडिस बाद

हर्षल पटेलने धोकादायक कुसल मेंडिसला संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. त्याने २५ चेंडूत २८ धावा केल्या.

श्रीलंका ५१-४

https://twitter.com/BCCI/status/1610305374888013826?s=20&t=4ATfCZLcEzVVOcQTLUssIg

21:29 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेला तिसरा धक्का

इशान किशनने फाईन लेगला पळत जाऊन चरित असलंकाचा उमराण मलिकच्या गोलंदाजीवर अफलातून झेल घेतला. त्याने १२ धावा केल्या.

श्रीलंका ४७-३

https://twitter.com/BCCI/status/1610304601466744832?s=20&t=4T97vaP8u6u4ZjTRwcHaMQ

21:21 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारताची चांगली सुरुवात

पदार्पणात शिवम मावीने श्रीलंकेचे दोन गडी बाद करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. सध्या श्रीलंकेला भागीदारीची गरज आहे.

श्रीलंका ३६-२

21:12 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: शिवम मावीला मिळाली आपली पहिली विकेट

नवोदित शिवम मावीने श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका बाद करुन आपली पहिली विकेट मिळवली. डावाच्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर मावीने निसांकाला इनस्विंग चेंडूवर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. निसांका ३ चेंडूत एक धाव काढून बाद झाला. श्रीलंकेने २ षटकात १ गडी बाद १२ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1610298734642089985?s=20&t=nEG0fmN6afDEy-cpHwiQ1g

21:10 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: शिवम मावीला दुसरी विकेट

धनंजया डी सिल्वाला शिवम मावीने त्याला सॅमसनकरवी झेलबाद केले. त्याने ८ धावा केल्या,

श्रीलंका २४-२

https://twitter.com/BCCI/status/1610299786439294981?s=20&t=WfURNFnjhJT25UJ3ORTdDw

21:02 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: निसांकाच्या रुपात श्रीलंकेला पहिला धक्का

पदार्पणात शिवम मावीने शानदार गोलंदाजी करत पाथुम निसांकाला त्रिफळाचीत केले. त्याने केवळ १ धाव काढली.

श्रीलंका १२-१

https://twitter.com/BCCI/status/1610297130366959616?s=20&t=L6mTmjum6FwtwcCmZtKAZw

20:52 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: १६३ धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचे सलामीवर मैदानात

१६३ धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचे सलामीवर मैदानात आले आहेत. कर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजीची सुरुवात केली. संजू सॅमसनने त्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुसल मेंडिसचा झेल सोडला.

श्रीलंका २-०

20:43 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: भारताचे श्रीलंकेसमोर १६३ धावांचे आव्हान

दिपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी ३५ चेंडूत ६८ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला १६२ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट्स घेणे गरजेचे आहे. दव किती फरक पाडतो यावर पण सर्व गणित अवलंबून आहे.

भारत १६२-५

20:35 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: दिपक हुड्डा पायचीत होताना बचावला

श्रीलंकेने रिव्ह्यू गमावला. दिपक हुड्डा पायचीत होता-होता वाचला. त्यानंतर अक्षरने दिलशान मदुशंकाला मोठा षटकार मारला. दोघांमध्ये ५० धावांची भागीदारी झाली आहे.

भारत १४९-५

20:22 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: दिपक हुड्डाचे सलग दोन षटकार

महेश तीक्षणाच्या षटकात दिपक हुड्डाने शानदार गगनचुंबी दोन लागोपाठ षटकार लगावले. अजूनही भारताला अशाच मोठ्या काही षटकारांची गरज आहे.

भारत ११९-५

20:18 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: शेवटचे पाच षटके भारतासाठी महत्त्वाची

१५ षटकानंतर भारताच्या १०० धावा झाल्या असून किमान १५० धावा करणे आवश्यक आहे.

भारत १०१-५

20:14 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: हार्दिक पांड्या बाद, भारताला खूप मोठा धक्का

कर्णधार हार्दिक पांड्या २७ चेंडूत २९ धावा करून बाद झाला. त्याला दिलशान मदुशंकाने बाद केले.

भारत ९४-५

https://twitter.com/BCCI/status/1610285747168514052?s=20&t=yiJi6CbOyeCEFhHBMxmtSw

20:11 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: भारतासाठी हार्दिक पांड्या खेळपट्टीवर असणे महत्वाचे

कर्णधार हार्दिक पांड्या शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर असणे भारतीय संघासाठी खूप आवश्यक आहे. जर टीम इंडियाला १६०-१७० पर्यंत धावसंख्या धावफलकावर ठेवायची असेल तर दिपक हुड्डा आणि पांड्याला मोठी भागीदारी करत तेही चांगल्या स्ट्राईक रेटने धावा काढणे गरजेचे आहे.

भारत ९४-४

19:58 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: भारताला चौथा धक्का, इशान किशन बाद

सेट फलंदाज इशान किशन आजच्या सामन्यातील सर्वाधिक ३७ धावा करून बाद झाला. त्याला वानिंदू हसरंगाने धनंजया डी सिल्वाकरवी झेलबाद केले.

भारत ७७-४

https://twitter.com/BCCI/status/1610281754220433409?s=20&t=F18aOh-5-cZ2ufspo7-amQ

19:54 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: १० षटकांनंतर भारताला मोठ्या भागीदारीची आवश्यकता

एकाबाजूने विकेट्स पडत असताना इशान किशनने दुसरी बाजू सांभाळून ठेवली आहे. कर्णधार हार्दिक पांड्या आणि किशन यांना एकूण भागीदारी पुढे घेऊन जावी लागणार आहे.

भारत ७५-३

https://twitter.com/BCCI/status/1610280772342108161?s=20&t=4trm0VrsZ0VZOHBYJ2L36g

19:46 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: पॉवर प्ले मध्ये भारताची खराब सुरुवात

पॉवर प्ले मध्ये भारताची खराब सुरुवात झाली. श्रीलंकेने टाकलेल्या जाळ्यात टीम इंडियाचे फलंदाज एकामागोमाग बाद होत गेले. वानिंदू हसरंगा, महेश तीक्षणा आणि धनंजय डिसिल्वा यांनी कसून गोलंदाजी करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. आठ षटकानंतर

भारत ५८-३

19:40 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: संजू सॅमसन बाद, श्रीलंकेची उत्कृष्ट गोलंदाजी

संजू सॅमसनचा झेल सुटला आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याला धनंजय डिसिल्वाने ५ धावांवर दिलशान मदुशंकाकरवी बाद केले. टीम इंडिया अडचणीत आली आहे.

भारत ४६-३

https://twitter.com/BCCI/status/1610277333277249538?s=20&t=4D0uY_eyZhMR28joXdnB0A

19:31 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: भारताला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

उपकर्णधार सूर्यकुमार यादव अवघ्या ७ धावा करून करुणारत्नेने बाद केले. पॉवर प्ले मध्ये श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले.

भारत ३८-२

https://twitter.com/BCCI/status/1610274709710725120?s=20&t=uD_Grs-USGtmceupyxpbbg

19:28 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: सूर्यकुमार यादव थोडक्यात बचावला

महेश तीक्षणाची कसून गोलंदाजी समोर सूर्यकुमार यादव मिडॉनला झेल होण्याआधी टप्पा पडल्याने तो बचावला. ताबडतोब फटकेबाजीला या फिरकीपटूने ब्रेक लावला आहे.

भारत ३८-१

19:17 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: शुबमन गिल बाद, भारताला पहिला धक्का

आजच्या सामन्यात पदार्पण केलेला सलामीवीर शुबमन गिल बाद झाला. त्याने केवळ ७ धावा केल्या. त्याला महेश तीक्षणाने पायचीत केले.

भारत २७-१

https://twitter.com/BCCI/status/1610271598661210112?s=20&t=bnpIu1srQw0N4swlwFa5yg

India vs Sri Lanka 1st T20I Highlights Score Updates: भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना हायलाइट्स अपडेट

Story img Loader