India vs Sri Lanka T20 Highlights Score Updates: भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आणि त्यात भारतीय संघाने २ धावांनी विजय मिळवला. अक्षर पटेलने टाकलेल्या शेवटच्या जादुई षटकाने भारताला विजय मिळवून दिला. शिवम मावीने धारदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना पळताभुई थोडी केली. हार्दिक पांड्याने संघाच्या कर्णधाराची जबाबदारी उत्तम पार पाडली. हार्दिकच्या नेतृत्वातील युवा ब्रिगेडने श्रीलंकेविरुद्धच्या या टी२० मालिकेत गुणवत्ता सिद्ध करत वानखेडे मैदानावर २०० पेक्षा कमी धावसंख्येचा पहिल्यांदा बचाव करताना एक नवीन इतिहास रचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खराब सुरुवात असूनही अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांच्या शानदार भागीदारीमुळे टीम इंडियाने पाच गडी गमावून १६२ धावा केल्या. दीपक हुडाने सर्वाधिक ४१ धावा केल्या. इशान किशनने ३७, अक्षरने ३१आणि हार्दिकने २९ धावा केल्या. कासून रजिथा वगळता श्रीलंकेच्या सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दिलशान मदुशंका, महेश तीक्षणा, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा आणि धनंजया डी सिल्वा यांनी मिळून पॉवर प्ले मध्ये भारताच्या धावसंख्येला ब्रेक लावला. टीम इंडियाच्या बाकी फलंदाजांना फारशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सूर्यकुमार यादव, शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांना दोन आकडी धावसंख्या देखील गाठता आली नाही.

आशिया चषक २०२२ मध्ये भारत आणि श्रीलंका शेवटचे आमनेसामने आले होते. त्यानंतर सुपर-१२ फेरीत श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव करून मोठा धक्का दिला. त्या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकला नाही. यानंतर श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. श्रीलंकेची टी२० विश्वचषकात समान कामगिरी नसली तरी उपांत्य फेरीतही स्थान मिळवता आले नाही.

Live Updates

India vs Sri Lanka 1st T20I Highlights Score Updates: भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना हायलाइट्स अपडेट

19:09 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: इशान किशन आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात

भारतीय संघाची फलंदाजी सुरू झाली आहे. शुबमन गिल आणि इशान किशन यांनी डावाची सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणारा किशन या सामन्यातही चांगल्या लयीत दिसत आहे. पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद १७ धावा आहे.

भारत १७-०

19:05 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: इशान किशनचा पहिल्याच षटकात षटकार

इशान किशनचा पहिल्याच षटकात ७१ मीटरचा कसून रजिताला षटकार मारला. भारताला चांगल्या सुरवातीची आवश्यकता आहे.

भारत ९-०

19:01 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: भारताचे सलामीवीर मैदानात

शुबमन गिल आणि इशान किशन सलामीवीर म्हणून मैदानात आले.

भारत ०-०

https://twitter.com/BCCI/status/1610267141487628288?s=20&t=Tz0dJ7_N5qu73LE1s-6SHQ

18:50 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: थोड्याच वेळात राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ येणार मैदानात

भारत-श्रीलंका संघाचे दोन्ही खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात येणार. कर्णधार म्हणून भारतात हार्दिक पांड्या राष्ट्रगीतासाठी पहिल्या क्रमांकावर उभा राहणार.

18:46 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: सूर्यकुमार यादवने २०२२ हे वर्ष कॉपी-पेस्ट व्हावे अशी व्यक्त केली इच्छा

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना मिस्टर ३६० सूर्यकुमार यादवने २०२२ हे वर्ष २०२३ जसेच्या तसे कॉपी-पेस्ट व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

18:40 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंका प्लेईंग-११

दसून शनाकाने नाणेफेक जिंकली असून त्यांनी देखील संघात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

18:36 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: टीम इंडिया प्लेईंग-११

भारतीय संघात अर्शदीप सिंग अजून पूर्णपणे बरा झाला नसल्याने त्याच्याऐवजी युवा शिवम मावीला संघात स्थान देण्यात आले.

https://twitter.com/BCCI/status/1610260418743906304?s=20&t=FV0u5RVSErHIwcw1pEq_rg

18:32 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवीन वर्षातील पहिली नाणेफेक ही दसून शनाकाने जिंकली.

https://twitter.com/BCCI/status/1610260532527009796?s=20&t=FV0u5RVSErHIwcw1pEq_rg

18:22 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: शुबमन गिल आणि शिवम मावी ने केले टी२० मध्ये पदार्पण

शुबमन गिल आणि शिवम मावी ने केले टी२० मध्ये पदार्पण केले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्याआधी त्यांना हार्दिक पांड्याने कॅप दिली.

https://twitter.com/BCCI/status/1610258855329693696?s=20&t=Tm-uUYRaOg_fqNLt3UQu_Q

17:53 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव असणार उपकर्णधार

श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव उपकर्णधार असणार आहे. भारताचा 'द-स्काय' आणि 'मिस्टर ३६०' अशी ओळख असणारा सूर्या मागील वर्ष स्वप्नवत म्हणावे तसे गेले. सर्वात जास्त धावा करणारा टी२० मधील तो फलंदाज ठरला. २०२३ येत्या वर्षात तो कशी कामगिरी करणार याकडे सर्व चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1609958622427217921?s=20&t=iD2xJMZ56appugNp0KSsvQ

17:48 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असेल का?

वानखेडेच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर फलंदाजीसाठी ती एक उत्तम खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू वेगाने बॅटवर येतो. यामुळे फलंदाजी करणे सोपे जाते. मात्र, याशिवाय वानखेडेच्या विकेटवर गोलंदाजांना मदत होते. विशेषत: वानखेडेच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. याशिवाय वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि चांगली हालचाल मिळते. हवामान एकदम स्वच्छ आणि कोरडे असणार आहे. मात्र ९ वाजेनंतर दव मोठ्या प्रमाणात पडेल आणि याचा फायदा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला होणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

17:45 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली कोणत्या खेळाडूला मिळणार संधी

पहिल्या टी२० सामन्यात शुबमन गिलला इशान किशनसोबत सलामीची संधी मिळू शकते. ऋतुराज गायकवाडही संघात आहे, पण त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालेले नाही. यानंतर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल त्रिपाठीवर लक्ष वेधून घेऊ शकतो. त्याचवेळी उपकर्णधार सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे लागू शकते. यानंतर दीपक हुडा आणि हार्दिक पांड्या फलंदाजीला येऊ शकतात.

https://twitter.com/BCCI/status/1607779542361591808?s=20&t=iD2xJMZ56appugNp0KSsvQ

17:42 (IST) 3 Jan 2023
IND vs SRI: २०२३ या नवीन वर्षात भारतीय संघ श्रीलंकेच्या टी२० मालिकेपासून करणार सुरुवात

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना आज (०३ जानेवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या या टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाची कमान दासुन शनाकाच्या हाती असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610241947339493378?s=20&t=iD2xJMZ56appugNp0KSsvQ

India vs Sri Lanka 1st T20I Highlights Score Updates: भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना हायलाइट्स अपडेट