India vs Sri Lanka 1st T20 match : २०२३ या नवीन वर्षाची सुरुवात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेपासून करणार आहे. ३ जानेवारीपासून भारत आणि श्रीलंकेमधील सामन्याला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षात भारतीय संघ आपली सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुलसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत हे ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरोधात मैदानात उतरणार आहे. तर, सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकली होती. त्यामुळे घरगुती मैदानावर होत असलेल्या श्रीलंकेविरोधातील मालिकेचं नेतृत्वही हार्दिक पांड्या करत आहे. तर, एकदिवशीय सामन्यापासून रोहित शर्मा पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
ट्वेन्टी-२० सामना कधी, कुठं, कसा बघणार
भारत-श्रीलंका पहिला सामना कधी होणार?
भारत आणि श्रीलंकेमधील पहिला ट्वेन्टी-२० सामना मंगळवारी ( ३ जानेवारीला ) पार पडेल.
भारत-श्रीलंका पहिला सामना कुठं होणार?
भारत आणि श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
भारत-श्रीलंका सामन्याला कधी सुरुवात होणार?
भारत आणि श्रीलंकेमधील ट्वेन्टी-२० पहिला सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. तर, नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे.
भारत-श्रीलंका सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठं होईल?
भारत आणि श्रीलंकेमधील ट्वेन्टी-२० पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाणार आहे.
भारत-श्रीलंका सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठं होईल?
भारत आणि श्रीलंकेमधील ट्वेन्टी-२० पहिल्या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने हॉटस्टारवर होणार आहे.
भारत-श्रीलंका सामना मोफत कुठं पाहता येणार?
भारत आणि श्रीलंकेमधील ट्वेन्टी-२० पहिला सामना डीडी फ्री डिश असलेल्या डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर मोफत प्रक्षेपण पाहता येणार आहे.