भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी पहिला टी २० सामना रंगणार होता. गुवाहाटीच्या मैदानावर हा सामना खेळला जाणार होता, पण वरूणराजाच्या अवकृपेमुळे सामना रद्द करावा लागला. गेले काही दिवस आसाममध्ये विविध आंदोलने सुरू असल्यामुळे हा सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती. पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सामना होणार हे नक्की झालं, पण पावसाने साऱ्यांच्या आशांवर पाणी फेरलं. तरीदेखील स्टेडियममधील हजारो प्रेक्षकांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही.

गांगुलीवर माझा विश्वास, तो ‘असं’ होऊच देणार नाही – शोएब अख्तर

भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू होण्याआधीपासूनच पावसाने अडथळे निर्माण केले. पण तरीदेखील उत्साही प्रेक्षकांनी आपला आनंद शोधला. याच वेळी स्टेडियममध्ये वंदे मातरम हे गाणं लावण्यात. त्यावेळी तेथे उपस्थित हजारोंच्या संख्येच्या प्रेक्षकांनी एकत्र वंदे मातरमचा जयघोष केला. काहींनी सूर लावताना सलाम ठोकला, तर काहींनी आपल्या मोबाईलचा फ्लॅशलाईट लावून वंदे मातरम म्हटलं.

PHOTO : बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे ऋषभ पंतची गर्लफ्रेंड..!!

दरम्यान, २०२० वर्षात भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिला चेंडू टाकण्याच्या आधीच गुवाहाटीत पावसाला सुरुवात झाली. सामना सुरु होण्यास विलंब होत राहिला. काही कालावधीनंतर पावसाने उसंत घेतली, मात्र खेळपट्टीवरचा काही भाग ओलसर राहिला होता. हा भाग सुकवण्यात मैदानातील कर्मचाऱ्यांना अपयश आल्यामुळे अखेरीस पंचांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी इंदूरच्या मैदानावर खेळवला जाईल.

Story img Loader