India vs Sri Lanka 2nd T20 Highlights Score Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. यासह श्रीलंका संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला आठ विकेट्स गमावून केवळ १९० धावा करता आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना होत असून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जात आहे. उभय संघांतील पहिला टी२० सामना भारताने अवघ्या दोन धावांच्या अंतराने जिंकला होता. मालिकेतील हा दुसरा सामना निर्णायक असून भारताकडे मालिका नावावर करण्याची संधी आहे. पण या महत्वाच्या सामन्यात अर्शदीप सिंग याने एका षटकात तीन नो बॉल टाकण्याची चूक करून बसला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने शानदार सुरुवात केली. यानंतर मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेचा डाव गडगडला, पण शेवटी कर्णधार दासुन शनाकाने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या २०६ धावांपर्यंत नेली. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दसून शनाका यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून उमरान मलिकने तीन विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर कुसल मेंडीस आणि पथुम निसंका यांनी वेगवान फलंदाजी केली. खास करून मेंडीसने आक्रमक रूप दाखवत अर्शदीप सिंग व शिवम मावी यांचा समाचार घेतला. या दोघांनी ८.२ षटकात ८० धावांची सलामी दिली. चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले.

भारतीय फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकात विकेट्स घेत भारताला सामन्यात पुन्हा आणले होते. मात्र शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी मिळून तब्बल ७ नो बॉल टाकले. त्यामुळे श्रीलंकेला खुले मैदान फटके मारण्यासाठी मिळाले. भारताकडून सर्वाधिक विकेट्स उमरान मलिकने घेतल्या. तर अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहलने मिळून ३ विकेट्स घेत त्याला साथ दिली.

श्रीलंकेने ठेवलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पॉवर प्ले मध्ये भारताने खराब फलंदाजी केली. सलामीवीर इशान किशन, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिपक हुड्डा यांना दोन आकडी धावसंख्या देखील करता आली नाही. त्यानंतर आलेला कर्णधार हार्दिक पांड्याला देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र त्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने सूर्यकुमार यादवला साथ देत अर्धशतकी भागीदारी केली. त्यांच्यात ९१ धावांची भागीदारी झाली. पण सूर्या ५१ धावा करून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने शिवम माविच्या साथीने लक्ष्याच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ३१ चेंडूत ६५ धावा करून बाद झाला आणि भारताच्या अशा संपुष्टात आल्या.

Live Updates

India vs Sri Lanka 2nd T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध श्रीलंका टी२० हायलाइट्स अपडेट्स

18:56 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात दाखल

श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात फलंदाजीसाठी उतरले आहेत. मालिकेत बरोबरी करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610990721749889024?s=20&t=hEcOlqhcvck4i1qT6PrvoA

18:37 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: प्लेईंग ११ श्रीलंका

श्रीलंकेने मागील सामन्यातील तोच संघ आजच्या सामन्यात पुढे कायम ठेवला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610985667206746114?s=20&t=DWcO0hYgXu2R5WHASTisYQ

18:34 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: टीम इंडिया प्लेईंग-११

आजच्या सामन्यात राहुल त्रिपाठीला अंतिम अकरा मध्ये स्थान देण्यात आले आहे. एमसीए हे एकप्रकारे त्याचे होम ग्राउंड आहे. हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंगची वर्णी लागली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610985172354367490?s=20&t=zzMUruNAnE_X_3KELhQfCA

18:32 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/BCCI/status/1610984860017123329?s=20&t=gHCMSYrLpACEi2McJUMn8w

18:27 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: हार्दिक पांड्या आणि दसून शनाकाची टी२० कामगिरी

हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून मागील ६ सामन्यांत अपराजित राहिला आहे. पुण्यातील
मागच्या ७ सामन्यात पहिल्या डावातील १७०+ धावांचा बचाव करण्यात यश आले होते. हार्दिकची पुण्यातील सर्वोच्च टी२० धावसंख्या फक्त ५७आहे.

शनाकाचे भारताविरुद्ध शेवटचे चार टी२० आंतरराष्ट्रीय कामगिरी ४५, ३३*, ७४*, ४७*

18:06 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: काय रंग दाखवणार पुण्याची खेळपट्टी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गहुंजे येथील स्टेडियमची खेळपट्टी पाहिली तर पहिल्या डावात १६० आणि दुसऱ्या डावात १३० धावसंख्या अशी सर्वसाधारण सरासरी राहिली आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक असून फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. मागील सामन्यांचे निकाल पाहिले तर या खेळपट्टीवर लक्ष्य मोठे नसले तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना संघ जिंकला आहे. कारण हिवाळ्यात दव हा एक मोठा घटक आहे जो विजय आणि पराभव यात फरक पाडतो.

18:00 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन मालिकेतून पडला बाहेर

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे.संजू सॅमसनला पहिल्या सामन्यात झेल घेताना गुडघ्याला दुखापत झाली होती, त्याच्या जागी जितेश शर्माचा भारतीय संघात समावेश केला आहे.

17:51 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात पुण्यात होणार काट्याची लढत

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गहुंजे येथील स्टेडीयममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात रोमांचक मुकाबला होणार असून त्यासाठी टीम इंडिया मैदानात दाखल झाली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610969854747738118?s=20&t=SCxAF2GD-OXPdxiuFguNqw

17:46 (IST) 5 Jan 2023
IND vs SL: मालिका विजयाच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार आजच्या सामन्यात

हार्दिक पांड्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने पहिल्या रोमांचक सामन्यात शानदार प्रदर्शन केले. तो सामना दोन धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1610961864531537920?s=20&t=SCxAF2GD-OXPdxiuFguNqw

 

India vs Sri Lanka 2nd T20I Highlights Score Updates:भारत विरुद्ध श्रीलंका टी२० हायलाइट्स अपडेट्स

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश‌ आले. श्रीलंका संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय संघाला १६ धावांनी पराभूत करण्यात यश मिळवले.