२०२० वर्षातला आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली. इंदूरच्या मैदानावर भारताने श्रीलंकेने दिलेलं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे अखेरच्या सामन्यात विजय मिळवणं लंकेसाठी अनिवार्य झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य पाहा – Video : श्रेयसचा उत्तुंग षटकार…चेंडू थेट छतावर आणि कर्णधार विराटही झाला अवाक

या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि हरभजन सिंह यांच्यात चांगलीच थट्टा-मस्करी सुरु होती. Star Sports वाहिनीच्या हिंदी कार्यक्रमात बोलत असताना, विराटने चक्क हरभजनच्या गोलंदाजीची नक्कल केली. विराटने हरभजनची केलेली नक्कल ही इतकी बेमालूम होती….की हरभजनलाही हसू आवरलं नाही.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने शिखर धवनही माघारी परतला. मात्र यानंत कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. विजयासाठी ६ धावांची गरज असताना श्रेयस अय्यर माघारी परतला. यानंतर विराटने ऋषभ पंतच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – IND vs SL : नवीन वर्षाची विराटकडून दणक्यात सुरुवात, पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद