IND vs SL 3rd T20 Highlights Today, 30 July 2024 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-२० सामना पल्लेकेलेच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला १३८ धावांचे लक्ष्य दिले. यानंतर श्रीलंकेचा संघ २० षटकांत १३७ धावा करू शकला. यासह सामना बरोबरीत राहिला. ज्यामुळे सामना निकालासाठी सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. ज्यामध्ये श्रीलंकेने भारताला ३ धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाचा कर्णधार सूर्याने चौकार मारुन पूर्ण केले. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला ३-० ने क्लीन स्विप दिला.
IND vs SL 3rd T20 Highlights : भारत सलग ६ द्विपक्षीय मालिकेत अपराजित आहे. २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गमावली होती. त्यानंतर टीम इंडियाने आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत पराभूत केले.
भारताने श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये केला पराभव
भारताने सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा पराभव केला. भारताला विजयासाठी ३ धावा करायच्या होत्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले. महिष तिक्षीनाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सूर्यकुमार यादवने विजय मिळवून दिला.
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि कुसल मेंडिस फलंदाजीसाठी आले होते. यावेळी भारताकडून गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने कमाल केली. या षटकातील तीन चेंडू टाकत त्याने दोन फलंदाजांना बाद केले आणि फक्त दोन धावा खर्च केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी ३ धावांचे लक्ष्य मिळाले.
सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी20 सुपर ओव्हरमध्ये पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवला शेवटच्या 6 चेंडूंवर 6 धावा करायच्या होत्या, पण श्रीलंकेचे फलंदाज केवळ 5 धावा करू शकले. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. आता दोन्ही संघ 6-6 चेंडू खेळतील. अशा प्रकारे सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरने होईल.
रवी बिश्नोईने कुसल मेंडिसला बाद केले
भारतीय संघाला दुसरे यश मिळाले आहे. रवी बिश्नोईने कुसल मेंडिसला आपला शिकार बनवले. कुसल मेंडिसने 41 चेंडूत 43 धावा केल्या. आता श्रीलंकेची धावसंख्या 2 विकेटवर 110 धावा आहे. श्रीलंकेला विजयासाठी 27 चेंडूत 27 धावांची गरज आहे.
भारताच्या हातातून सामना निसटत आहे.
श्रीलंकेची धावसंख्या 15 षटकांनंतर 1 बाद 108 धावा. आता श्रीलंकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज आहे. सध्या कुसल मेंडिस 39 चेंडूत 41 धावा करून खेळत आहे. तर कुसल परेराने 24 चेंडूत 38 धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये 37 चेंडूत 50 धावांची भागीदारी झाली आहे.
श्रीलंकेची धावसंख्या 13 षटकात 88 धावा आहे.
श्रीलंकेची धावसंख्या 13 षटकात 1 गडी बाद 88 धावा. यावेळी श्रीलंकेला विजयासाठी 42 चेंडूत 50 धावांची गरज आहे. तर कुसल परेरा आणि कुसल मेंडिस क्रीजवर आहेत.
https://twitter.com/Faizanali_152/status/1818334906105446610
पथुम निसांकला पॅव्हेलियनमध्ये परतला
भारतीय संघाला पहिले यश मिळाले आहे. रवी बिश्नोईने पथुम निसांकला बाद केले. पथुम निशांकने 27 चेंडूत 26 धावा केल्या. आता श्रीलंकेची धावसंख्या 10 षटकात 1 बाद 61 धावा आहे.
https://twitter.com/CricWatcher11/status/1818331890497339686
श्रीलंकेची 5 षटकांनंतर धावसंख्या 31/0
वॉशिंग्टन सुंदरने डावाच्या ५व्या षटकात एकूण ७धावा दिल्या. श्रीलंकेने 5 षटकांनंतर एकही विकेट न गमावता 31 धावा केल्या आहेत. निसांका 20 तर कुसल मेंडिसने 9 धावा केल्या आहेत.
https://twitter.com/Shebas_10dulkar/status/1818327511606182247
तिसऱ्या षटकात आल्या 15 धावा
खलील अहमदने तिसऱ्या षटकात 15 धावा दिल्या. या षटकात एकूण 3 चौकार लागले, ज्यामुळे श्रीलंकेने 3 षटकात एकही विकेट न गमावता 19 धावा केल्या आहेत. पथुम निसांकाने 13 चेंडूत 16 आणि कुसल मेंडिसने 5 चेंडूत 2 धावा केल्या.
भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 137 धावा केल्या आहेत. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली कारण अर्धा संघ 50 धावांचा टप्पा गाठण्यापूर्वीच बाद गारद झाला होता. भारताकडून सर्वाधिक धावा शुबमन गिलने केल्या, ज्याने 37 चेंडूत 39 धावा केल्या. एकवेळ भारतीय संघाची धावसंख्या 5 विकेटवर 48 धावा होती, मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि रायन पराग यांच्यात 54 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. ज्यामुळे टीम इंडियाचा डाव सावरला गेला. शुबमन गिल व्यतिरिक्त रियान परागने 26 आणि वॉशिंग्टन सुंदरने 25 धावा केल्या.
भारताची धावसंख्या 7 विकेटवर 128 धावा आहे
भारताची धावसंख्या 19 षटकांनंतर 7 बाद 129 धावा. सध्या वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई खेळत आहेत. रवी बिश्नोईने 8 चेंडूत 8 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 14 चेंडूत 17 धावा केल्या.
भारताची धावसंख्या 7 विकेटवर 105 धावा आहे
भारताची धावसंख्या 16 षटकांत 7 बाद 105 धावा आहे. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई क्रीजवर आहेत. याआधी शुबमन गिल आणि रियान पराग चांगली खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, टीम इंडियाची नजर सन्मानजनक धावसंख्येवर आहे.
https://twitter.com/Faizanali_152/status/1818313949886198228
भारताची धावसंख्या 11 षटकात 5 बाद 68 धावा
भारताची धावसंख्या 11 षटकात 5 विकेट गमावत 68 धावा आहे. सध्या रियान पराग आणि शुबमन गिल क्रीजवर आहेत. शुभमन गिलने 23 चेंडूत 23 धावा केल्या. तर रियान परागने 6 चेंडूत 9 धावा केल्या. श्रीलंकेकडून आतापर्यंत महिष तिक्षिना याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताची पाचवी विकेटही पडली
भारताची पाचवी विकेट 48 धावांवर पडली. रमेश मेंडिसने शिवम दुबेला बाद केले. त्याला केवळ 13 धावा करता आल्या. रियान पराग सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी गिल आहे. नऊ षटकांनंतर भारताची धावसंख्या 53/5आहे.https://twitter.com/CBMCRICKET/status/1818306784244744657
सूर्यकुमार यादव पॅव्हेलियनमध्ये परतला
भारतीय संघाला चौथा झटका बसला आहे. असिथा फर्नांडोने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला बाद केले. सूर्यकुमार यादव 9 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. आता भारताची धावसंख्या 7 षटकांनंतर 4 गडी बाद 35 धावा आहे.
यशस्वी जैस्वालनंतर संजू सॅमसन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. संजू सॅमसन आपले खाते उघडू शकला नाही. या यष्टीरक्षक फलंदाजाला चामिंडू विक्रमसिंघेने बाद केले. यानंतर महिष तिक्ष्णाने रिंकू सिंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रिंकू सिंगला 2 चेंडूत 1 धाव करता आली. आता भारताची धावसंख्या 3.1 षटकांनंतर 3 गडी बाद 14 धावा आहे.
महिष तिक्ष्णाने यशस्वी जैस्वालची विकेट घेतली
भारतीय संघाला पहिला झटका बसला आहे. महिष तिक्ष्णाने यशस्वी जैस्वालला बाद केले. मात्र, या षटकात यशस्वी जैस्वालने 2 चौकार मारले, मात्र शेवटच्या चेंडूवर महिश तिक्ष्णा त्याची विकेट घेतली. आता भारताची धावसंख्या 2 षटकांनंतर 1 बाद 11 धावा आहे.
पहिल्या षटकात 3 धावा झाल्या
भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल क्रीजवर आहेत. श्रीलंकेसाठी चामिंडू विक्रमसिंघेने पहिले षटक टाकले. या षटकात 3 धावा झाल्या. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच भारतीय संघ 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पुढे आहे.
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.
श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महिश तिक्षाना, मथिशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकली
श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने आपल्या संघात फक्त एक बदल केला आहे. टीम इंडियाने चार बदलांसह प्रवेश केला आहे. हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल आज खेळत नाहीत.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात तीन बदल
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या T20 मध्ये भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये मध्ये 3 बदल करू शकतो. शुबमन गिलचे पुनरागमन होऊ शकते. संजू सॅमसनला बेंचवर बसावे लागू शकते. याशिवाय खलील अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संधी मिळू शकते.
https://twitter.com/kapuchoudhary25/status/1818278941033128321
नाणेफेक 7:40 वाजता होईल
भारत-श्रीलंका तिसऱ्या टी-20 सामन्याची नाणेफेक पावसामुळे लांबणीवर पडला आहे. नवीन अपडेटनुसार, टॉस 7:40 वाजता होईल आणि सामना 20 मिनिटांनी 8 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल. सध्या खेळाडू सरावासाठी मैदानात आले आहेत.
https://twitter.com/golden_duckk_/status/1818279221027852337
पल्लेकेलेमध्ये श्रीलंकेची खराब कामगिरी
पल्लेकेलेमध्ये श्रीलंकेची खराब कामगिरी सुरूच आहे. या संघाने 2019 पासून आपल्या घरच्या मैदानावर 8 T20I सामने खेळले आहेत, त्यापैकी या संघाने 6 सामने गमावले आहेत, तर केवळ 2 सामने जिंकले आहेत. श्रीलंकेचा संघ भारताविरुद्धचा शेवटचा T20I जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि ही मालिका आनंददायी पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न करेल, तथापि, भारताविरुद्धचा सामना जिंकणे या संघासाठी सोपे जाणार नाही.
https://twitter.com/kapuchoudhary25/status/1818278941033128321
नाणेफेकीपूर्वी पल्लेकेलेमध्ये पाऊस सुरू झाला, परंतु पाऊस काही काळ थांबला आहे, परंतु टॉस वेळेवर झालेला नाही आणि अजून उशीर होऊ शकतो. दुसऱ्या टी-20सामन्यातही पावसामुळे टॉसला उशीर झाला आणि दुसऱ्या डावात पावसामुळे सामना 8 षटकांचा करण्यात आला ज्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पडला आहे. खेळपट्टीवरून कव्हर्स काढण्यात आले असले तरी नाणेफेकीला अजून थोडा उशीर होऊ शकतो.
https://twitter.com/golden_duckk_/status/1818267644404859226
श्रीलंकेकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल
पथुम निसांका आणि कुसल मेंडिस सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांच्याकडून संघाला शेवटच्या सामन्यात दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. तसेच श्रीलंकेच्या गोलंदाजांनाही योग्य लाइन लेंथचा अवलंब करावा लागेल. मथिशा पाथिराना टीम इंडियाविरुद्ध मोठा उलटफेर करु शकतो.
भारत-श्रीलंका सामन्याची खेळपट्टी कशी आहे?
पल्लेकेले स्टेडियमच्या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळते, पण हळूहळू त्याचा फायदा फलंदाजांनाही मिळतो. तर फिरकी गोलंदाजांनाही येथे मदत मिळत आहे. अशा स्थितीत खेळपट्टीचा घटक सामन्याच्या निकालावर फारसा परिणाम करणार नाही. भारत-श्रीलंका तिसऱ्या सामन्याला पावसामुळे अडथळा येऊ शकतो. ३० जुलै रोजी पल्लेकेलेमध्ये ५५ ते ६० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
टी-२० मध्ये भारताचा दबदबा कायम
भारत सलग ६ द्विपक्षीय मालिकेत अपराजित आहे. २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गमावली होती. त्यानंतर टीम इंडियाने आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेसोबतची मालिका बरोबरीत सुटली. त्यानंतर संघाने अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वेचा पराभव केला. याच काळात भारताने अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातही एकाही सामन्यात पराभव पत्करता आयसीसीचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.