India vs Sri Lanka Asia Cup T20 Highlights : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत सध्या सुपर-४ फेरीतील सामने खेळवले जात आहेत. आज भारत-श्रीलंका यांच्यात लढत झाली. ४ सप्टेंबर रोजी भारताला पाकिस्तानविरोधातील लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. असे असताना आजच्या सामन्यातही भारताला पराभव पत्कारावा लागला. भारताने दिलेल्या १७४ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने सहा गडी राखून गाठले.

Live Updates

India vs Sri Lanka , Asia Cup 2022 T20 Cricket Score, 06 September 2022 : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

23:32 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : श्रीलंकेचा भारतावर सहा गडी राखून विजय

श्रीलंकेने भारतावर सहा गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेल्या १७४ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने लिलया पेलले.

22:44 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताला चौथे मोठे यश, कुशल मेंडिस पायचित

श्रीलंकेला कुशल मेंडिसच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. युझवेंद्र चहलने कुशला पायचित केले. सध्या श्रीलंकेच्या ११० धावा झाल्या आहेत.

22:39 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : श्रीलंकेला दानुष्का गुनाथिलकाच्या रुपात दिसरा झटका

श्रीलंकेला दानुष्का गुनाथिलकाच्या रुपात दिसरा झटका बसला आहे. सध्या श्रीलंकेच्या ११० धावा झालेल्या आहेत. आर अश्विनने दानुष्काला झेलबाद केले आहे.

22:27 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : श्रीलंकेला पहिला झटका, पथुम निसांका झेलबाद

पथुम निसांकाच्या रुपात भारताला पहिला बळी मिळाला आहे. सध्या श्रीलंकेच्या ९७ धावा झाल्या आहेत. युझवेंद्र चहलने त्याला बाद केले आहे.

22:02 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : श्रीलंकेच्या ५६ धावा, भारताला पहिल्या बळीचा शोध

भारताने दिलेल्या १७४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी श्रीलंकेने सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळायला सुरुवात केली आहे. सध्या श्रीलंकेच्या ५६ धावा झाल्या असून भारताला अजूनही पहिल्या बळीचा शोध आहे.

21:28 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताच्या १७३ धावा, श्रीलंकेला विजयासाठी १७४ धावांची गरज

भारताने २० षटकांत १७३ धावा केल्या आहेत. विजयासाठी श्रीलंकेला १७४ धावा काराव्या लागणार आहेत.

21:26 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताला आठवा मोठा झटका, भुवनेश्वरकुमार बाद

भुवनेश्वरकुमारच्या रुपात भारताला आठवा मोठा झटका बसला आहे. तो खातेदेखील खोलू शकला नाही.

21:18 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताला सातवा मोठा झटका, ऋषभ पंत १७ धावांवर झेलबाद

भारताला ऋषभ पंतच्या रुपात सातवा मोठा झटका बसला आहे. सध्या भारताच्या १५७ धावा झाल्या आहेत. तर पंतने १७ धावा केल्या.

21:15 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताला सहावा मोठा झटका, दीपक हुडा त्रिफळाचित

भारताला दीपक हुडाच्या रुपात सहावा मोठा झटका बसला आहे. ३ धावांवर खेळत असताना तो त्रिफळाचित झाला आहे. सध्या भारताच्या १५६ धावा झाल्या आहेत.

21:08 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताला हार्दिक पंड्याच्या रुपात पाचवा मोठा झटका

भारताला हार्दिक पंड्याच्या रुपात पाचवा मोठा झटका बसला आहे. पंड्याने १३ चेंडूंंमध्ये १७ धावा केल्या.

21:00 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताच्या १३४ धावा पूर्ण, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत करत आहेत फलंदाजी

सूर्यकुमार यादव बाद झाला असून सध्या भारताच्या १३४ धावा झाल्या आहेत. भारताकडून हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत फलंदाजी करत आहेत.

20:43 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताला रोहित शर्माच्या रुपात तिसरा मोठा झटका

भारताला रोहित शर्माच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. त्याने ४१ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या आहेत.

20:40 (IST) 6 Sep 2022
रोहित शर्माकडून धडाकेबाज फलंदाजी, भारताच्या १०० धावा पूर्ण

भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत. सध्या रोहित शर्मा चांगल्याच फॉर्ममध्ये असून त्याने श्रीलंकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. सध्या रोहित शर्माच्या ७२ धावा झाल्या आहेत.

20:28 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : रोहित शर्माने झळकावले दमदार अर्धशतक

विराट कोहली बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा धडाकेबाज फलंदाजी करताना दिसतोय. त्याचे अर्धशतक पूर्ण झाले असून संघाच्या ७९ धावा झाल्या आहेत.

20:18 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताच्या ५० धावा पूर्ण

भारताच्या ५० धावा पूर्ण झाल्या असून सध्या मैदानात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव फलंदाजी करत आहेत.

20:06 (IST) 6 Sep 2022
भारताला दुसरा मोठा झटका, विराट कोहली शून्यावर त्रिफळाचित

भारताला सुरुवातीच्या खेळातच दोन मोठे धक्के बसले आहेत. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली शून्यावर परतला आहे.

19:46 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताला पहिला मोठा झटका, केएल राहुल पायचित

केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला मोठा झटका बसला आहे. केएल राहुलने ६ धावा केल्या. सध्या भारताच्या ११ धावा झाल्या आहेत.

19:32 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : भारताकडून केएल राहुल, रोहित शर्मा मैदानात

सामन्याला सुरुवाता झाली असून भारताकडून केएल काहुल आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी आले आहेत.

19:12 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : श्रीलंकेचे प्लेइंग इलेव्हन

पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरिथ असलंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, माहीश तिक्षणा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका

19:10 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

19:09 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय

श्रीलंकेने नाणेफेक जिंकली असून भारताला अगोदर फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

18:59 (IST) 6 Sep 2022
IND vs SL Asia Cup 2022 : दुबई स्टेडियमवर काही क्षणांत सामन्याला होणार सुरुवात

आज भारत-श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

IND vs SL Asia Cup 2022 Live Score, India vs Sri Lanka T20 Asia Cup 2022 Live

भारत विरुद्ध श्रीलंका लाइव्ह मॅच स्कोअर , भारत विरुद्ध श्रीलंका

Story img Loader