Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka Highlights Score: शेवटी, आशिया चषक २०२३ची सांगता होणार आहे. १९ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील १३वा आणि शेवटचा सामना आज खेळवला जात आहे. भारत आणि श्रीलंकेचे संघ अंतिम फेरीत आमनेसामने आहेत. विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेने भारतासमोर केवळ ५० धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. आजच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज याने घेतलेल्या ६ व हार्दिक पांड्या याने घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर भारताने फार वेळ न घेता ६.१ षटकात १० गडी राखून श्रीलंकेचा धुव्वा उडवला. इशान किशन आणि शुबमन गिल यांनी नाबाद ५१ धावा करत टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवून दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे विजेतेपद पटकावले होते. गेल्या वेळी भारताने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपवला होता. या धावांचा पाठलाग करताना भारताने एकही गडी न गमावता दहा गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला.
श्रीलंकेचा डाव
चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा एलबीडब्ल्यू आऊट झाली. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली. पाचवा चेंडू चौकारासाठी गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने सहाव्या षटकात दासून शनाका आणि बाराव्या षटकात कुसल मेंडिसला बाद केले. हार्दिक पांड्यानेही तीन बळी घेतले. त्याने दुनिथ वेललागे, मदुशन आणि पाथिराना यांच्या विकेट घेतल्या. बुमराहने परेराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. श्रीलंकेच्या सर्व १० विकेट्स भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. सिराजने सात षटकांत २१ धावा देत सहा बळी घेतले. त्याचवेळी हार्दिकने २.२ षटकांत तीन धावा देऊन तीन बळी घेतले, तर बुमराहने पाच षटकांत २३ धावांत एक विकेट घेतली.
Asia Cup 2023 IND vs SL Highlights Score Update in Marathi: भारत विरुद्ध श्रीलंका आशिया कप २०२३ हायलाईट्स स्कोअर
रविवारी (दि. १७ सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअम येथे पार पडणाऱ्या आशिया चषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका संघ आमनेसामने आले. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज याने घेतलेल्या ६ व हार्दिक पंड्या याने घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर सलामीवीर शुबमन गिल आणि इशान किशन यांनी फार वेळ न घेता सहा षटकातच सामना जिंकला. भारताने १० गडी आणि ४३.५ षटके राखून श्रीलंकेचा धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह भारताने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.
भारत ५१-०
श्रीलंकेने ठेवलेल्या ५१ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची शानदार सुरुवात झाली आहे. आज रोहितऐवजी इशान किशन सलामीला आहे. त्याने येताच आक्रमक फलंदाजी करत चौकार मारण्यास सुरुवात केली.
भारत १७-०
श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांवर बाद झाला. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी, या वर्षी जानेवारीमध्ये भारताने श्रीलंकेला २२ षटकांत ७३ धावांत गुंडाळले होते. इतकंच नाही तर भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी बांगलादेशने २०२४ मध्ये मीरपूरमध्ये भारताविरुद्ध ५८ धावा केल्या होत्या. ५० धावा ही कोणत्याही एकदिवसीय अंतिम फेरीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी भारतीय संघ २००० मध्ये शारजाहमध्ये श्रीलंकेविरुद्ध ५४ धावांत ऑलआऊट झाला होता. आताही श्रीलंकेने सर्वात कमी धावसंख्या केली आहे. भारताला आशिया चषक विजयासाठी ५१ धावांचे माफक लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break!
— BCCI (@BCCI) September 17, 2023
Sensational bowling display from #TeamIndia! ⚡️ ⚡️
6⃣ wickets for Mohd. Siraj
3⃣ wickets for vice-captain Hardik Pandya
1⃣ wicket for Jasprit Bumrah
Target ? for India – 51#AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/kTPbUb5An8
श्रीलंकेला १३व्या षटकात ४० धावांवर आठवा धक्का बसला. हार्दिक पांड्याने दुनिथ वेलाल्गेला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. वेलल्गेला २१ चेंडूत ८ धावा करता आल्या. १३ षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या आठ गड्यांच्या मोबदल्यात ४० धावा आहे. सध्या प्रमोद मदुशन आणि दुशान हेमंथा क्रीजवर आहेत.
श्रीलंका ४९-८
सिराजने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने १२ धावांत सहा
विकेट्स गमावल्या होत्या. सहा विकेट्स गमावल्यानंतर वन डेमधली ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. त्याचवेळी श्रीलंकेने अवघ्या १२ धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. वन डे फायनलमध्ये पाच विकेट्स गमावल्यानंतरची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
या दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला हसू अनावर झाले आहे.
Virat Kohli and Shubman Gill couldn't control their laughter seeing Mohammad Siraj run to the boundary to stop the 4. pic.twitter.com/3MAka2Z4oA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2023
“मोहम्मद सिराज त्याच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर आशिया चषक फायनलला थ्रिलर बनवत आहे, त्याने ५ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या! छान चालला आहे भाऊ…” असे म्हणत भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने ट्वीट केले आहे. त्याचे ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mohd Siraj is turning the Asia Cup finals into a thriller with his incredible bowling performance, taking down 5 important wickets! Great going brother @mdsirajofficial ??? #AsiaCupFinals #SirajShowdown #INDvSL
— Suresh Raina?? (@ImRaina) September 17, 2023
कोलंबोत आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये मोहम्मद सिराज नावाच्या वादळापुढे श्रीलंका उडून गेली, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. त्याने १६ चेंडूत ५ विकेट्स घेत लंकेचे कंबरडे मोडले. सिराजने त्याच्या कारकीर्दीतील एकदिवसीय क्रिकेटमधील ५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तसेच, पहिल्यांदाच त्याने वन डेमध्ये पंचक म्हणजे फाइव्ह विकेट हॉल पूर्ण केले आहे. ही त्याची सर्वोतम कामगिरी आहे. शेवटची विकेट त्याने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची घेतली. त्याला त्याने ४ धावांवर त्रिफळाचीत केले.
श्रीलंका १८-६
The historical over of Mohammad Siraj…..!!!

4 wickets in a single over. pic.twitter.com/aMd3cihLso
भारत आणि श्रीलंका यांच्यातील विजेतेपदाचा सामना सुरू झाला आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने श्रीलंकेला धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद सिराजने जादुई गोलंदाजी करत लंकेला एकापाठोपाठ एक असे चार धक्के दिले. त्याने कुसल परेरा, सदरविक्रमा, असलंका आणि डिसिल्वा यांना एकाच षटकात बाद केले. सिराजने चौथ्या षटकात पाच चेंडूत चार विकेट्स घेतल्या . प्रथम, त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला ४ चेंडूत २ धावा करता आल्या. यानंतर सादिरा समरविक्रमाला पायचीत केले, तो भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर चरित असलंका पहिल्याच चेंडूवर कव्हर्समध्ये इशान किशनकरवी झेलबाद झाला. धनंजय डिसिल्वाने त्याला एक चौकार मारला त्यामुळे त्याची हॅटट्रिक हुकली. मात्र, पुढच्याच चेंडूवर त्याला विकेटकीपर के.एल. राहुलकरवी झेलबाद केले.
श्रीलंका १२-५
Make that FOUR wickets in an over ?
— BCCI (@BCCI) September 17, 2023
? bowling this from @mdsirajofficial ?#TeamIndia on a roll with the ball and Sri Lanka are 12/5.
Follow the match ▶️ https://t.co/xrKl5d85dN#AsiaCup2023 | #INDvSL https://t.co/eB1955UBDo pic.twitter.com/kaZcVOk1AZ
भारत आणि श्रीलंका यांच्यातील विजेतेपदाचा सामना सुरू झाला आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने श्रीलंकेला धक्का दिला. कुसल मेंडिस भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. त्याला बुमराहने राहुलकरवी झेलबाद केले.
श्रीलंका ६-१
BOOM ?@Jaspritbumrah93 strikes in the very first over! ⚡️
— BCCI (@BCCI) September 17, 2023
Kusal Perera departs as @klrahul takes the catch ?
Follow the match ▶️ https://t.co/xrKl5d85dN#AsiaCup2023 | #TeamIndia | #INDvSL pic.twitter.com/mYGLNm1T3U
पावसामुळे आधीच सामन्याला उशीर झाल्याने राष्ट्रगीताविना आशिया चषक फायनल सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आले आहेत. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका ०-०
पाऊस थांबला आहे. दोन्ही संघ सध्या अजूनही पव्हेलियनमध्ये असून ग्राउंड्समन कव्हर हटवत आहेत. अंपायर्स मैदानाची पाहणी करत आहेत. खेळ दुपारी ३.४० वाजता सुरू होऊ शकतो.
कोलंबोमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आज कोलंबोमध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा होती. तीन वाजता पावसाची शक्यता होती आणि तेच झाले. अशा स्थितीत खेळ सुरू होण्यास विलंब होत आहे. तीन वाजता खेळ सुरू होणार होता. संपूर्ण मैदान कव्हरने झाकले गेले आहे.
भारताने २०१८ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शेवटचे विजेतेपद पटकावले होते, जेव्हा रोहितच्या संघाने दुबई येथे आशिया कपमध्ये बांगलादेशचा तीन विकेट्स राखून पराभव केला होता. या विजयानंतर भारताला महत्त्वाच्या सामन्यात अटीतटीच्या प्रसंगी वर्चस्व राखण्यात अपयश आले. भारताने २०१९ एकदिवसीय विश्वचषक आणि २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. २०१९ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये न्यूझीलंडकडून आणि २०२३ WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाले . गेल्या वर्षीच्या आशिया चषकातही संघ आपली उपस्थिती जाणवू शकला नाही ज्यामध्ये श्रीलंकेने टी२० फॉर्मेटमध्ये खेळल्या गेलेल्या विजेतेपद पटकावले.
शुक्रवारी बांगलादेशविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात भारताने आपल्या पाच प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती, जे आता अंतिम फेरीत चांगली कामगिरी करतील. या सामन्यात संघाचा सहा धावांनी पराभव झाला होता. फायनलसाठी विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचे पुनरागमन बांगलादेशच्या फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करणाऱ्या फलंदाजीला नक्कीच बळकट करेल.
सलामीवीर शुबमन गिलने अव्वल दर्जाचे शतक झळकावले, पण उर्वरित फलंदाजांना मधल्या षटकांमध्ये स्ट्राईक चांगले रोटेट करता आले नाही, ज्यामुळे खालच्या फळीसमोर मोठे लक्ष्य होते. या सामन्याने हे देखील स्पष्टपणे दर्शविले की भारताला त्यांच्या या समस्येवर काम करावे लागेल की सुरुवातीच्या विकेट्स घेतल्या तरी प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात अपयश आले.
बांगलादेशच्या ५९ धावांमध्ये भारताने चार विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्याच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये भरपूर धावा दिल्या ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघ २६५ धावांची चांगली धावसंख्या करण्यात यशस्वी ठरला. मात्र, रविवारच्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांच्या पुनरागमनाने ही समस्या दूर होईल.
कोलंबोमध्ये सध्या सूर्यप्रकाश आहे. दोन्ही संघांचे खेळाडू सराव करत आहेत. सलग १५ एकदिवसीय सामने जिंकून घरचा संघ जबरदस्त फॉर्मात असल्याने श्रीलंकेचा संघही आत्मविश्वासाने भरलेला आहे. श्रीलंकेचा संघ मुख्य फिरकीपटू महेश तिक्षणा याच्या सेवेशिवाय असेल कारण तो स्नायूंच्या दुखापतीमुळे बाहेर आहे. फलंदाजीत श्रीलंकेकडे कुसल मेंडिस, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, तर गोलंदाजीत फिरकी गोलंदाज वेलालागे चांगल्या फॉर्मात आहेत.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.
Sri Lanka won the toss and elected bat first!
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) September 17, 2023
Here's your ?? playing XI ?#LankaLions #SLvIND #AsiaCup2023 pic.twitter.com/Y94pZZgk0k
? Toss & Team News from Colombo ?
— BCCI (@BCCI) September 17, 2023
Sri Lanka have elected to bat against #TeamIndia in the #AsiaCup2023 Final.
Here's our Playing XI ? #INDvSL
Follow the match ▶️ https://t.co/xrKl5d85dN pic.twitter.com/tzLDct6Ppb
आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शनाकाने प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. जखमी महेश तिक्षणाच्या जागी हेमंता खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-११ मध्ये सहा बदल केले आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर जखमी अक्षर पटेलच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. सुंदर ऑफ स्पिनर आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमी यांना वगळण्यात आले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रविवारी कोलंबोमध्ये आशिया कप २०२३च्या अंतिम फेरीत श्रीलंकेशी भिडणार आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . टीम इंडिया आज धावांचा पाठलाग करणार आहे. दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात प्लेईंग-११मध्ये बदल केला आहे.
Toss time, Srilanka Won the toss end decide to bat first??#AsiaCupFinal #INDvSL pic.twitter.com/jsQT4fo81w
— Sɩɭɘŋt Lɩps? (@TauquirTheist) September 17, 2023
Accuweatherच्या अहवालानुसार, रविवारी कोलंबोमध्ये ढगाळ वातावरण असेल. म्हणजे ढगाळ वातावरण राहील. सकाळी काही भागात पाऊस झाला तर दुपारनंतरही पाऊस पडण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, कोलंबोमध्ये आज पावसाची ९० टक्के शक्यता आहे आणि वादळाची ५४ टक्के शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार, सकाळी १०, दुपारी १, ६, ८ आणि रात्री १० वाजता वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सामना दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे.
आज ज्या खेळपट्टीवर अंतिम सामना होत आहे त्याच खेळपट्टीवर परवा भारत आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषक २०२३ मधील शेवटचा सामना खेळला गेला होता. गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही संधी देऊन खेळपट्टी संतुलित दिसते. येथील शेवटच्या सामन्यात एकूण १८ विकेट्स पडल्या आणि ५२४ धावा झाल्या. शेवटच्या वेळी भारत आणि श्रीलंका येथे (सुपर-४) आमनेसामने आले होते, २० विकेट्स गमावून ३८५ धावा केल्या होत्या, त्यापैकी १६ विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. कोलंबोच्या खेळपट्टीने फिरकीपटूंना मदत केली असून त्यांच्याविरुद्ध मोठी धावसंख्या करणे फलंदाजांसाठी आव्हानात्मक आहे. आशिया कप २०२३ मध्ये या मैदानावर वेगवान गोलंदाजांना फारसे यश मिळालेले नाही.
एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका आतापर्यंत ८ वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये भारताने ५ तर श्रीलंकेने ३ जिंकले आहेत. भारताने १९८४, १९८८, १९८८, १९९०, १९९५ आणि २०१० मध्ये आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते, तर श्रीलंकेने १९९७, २००४, २००८ साली आशिया कप फायनलमध्ये भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
आतापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये १६६ वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाने ९७ सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत, ११ सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत राहिला. एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत २० सामन्यांपैकी भारताने ११ आणि श्रीलंकेने ९ सामने जिंकले आहेत. भारताविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या ६५ एकदिवसीय सामन्यांपैकी श्रीलंकेने ३० तर भारताने २९ जिंकले आहेत, दुसरीकडे ६ सामन्यांचा निकाल लागला नाही.
श्रीलंकेच्या सर्वोत्तम प्लेइंग-११ बद्दल बोलायचे तर, संघ आपल्या खेळाडूंच्या दुखापतींशी झगडत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मैदानावर तिक्षणाला दुखापत झाली होती, त्यानंतर आज ती फायनलमधून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. तिक्षणाच्या अनुपस्थितीत, श्रीलंकेकडे लेगस्पिनर दुशान हेमंथाचा सक्षम पर्याय आहे. दुशान हा एक चांगला मनगट फिरकी गोलंदाज आणि खालच्या क्रमाचा चांगला फलंदाज आहे; अशा प्रकारे फलंदाजीची खोली ९ पर्यंत वाढते.
भारतीय संघाने मायदेशात श्रीलंकेविरुद्ध ६५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताने ३१ सामने जिंकले असून श्रीलंकेने २८ सामने जिंकले आहेत. सहा सामन्यांत निकाल लागला नाही. मात्र, श्रीलंकेत या दोघांमधील शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांपैकी चार सामने भारताने जिंकले आहेत. एकात दासुन शनाका संघ विजयी झाला.
आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने- सामने आहेत. रविवारी (दि. १७ सप्टेंबर) कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअम येथे खेलळ्या जाणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली आठव्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी श्रीलंकेशी सज्ज झाला आहे.
All eyes ? on the prize ?
— BCCI (@BCCI) September 17, 2023
Grand finale time ⏳#TeamIndia | #AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/8BzKFlOWwY

गेल्या वेळी भारताने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकावर नाव कोरले आहे.