दुसर्‍या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेला ३ गडी राखून पराभूत करत मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियाला २७६ धावांचे लक्ष्य मिळाले आणि शिखर धवनच्या नेतृत्वातील संघाने हे लक्ष्य ५ चेंडू ठेऊन गाठले. सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर हे विजयाचे नायक ठरले. दोघांनीही अर्धशतके ठोकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या विजयानंतर टीम इंडियाने जोरदार सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसले. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. भारतीय खेळाडूंनी गँगस्टर चित्रपटाचे ‘ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी’ हे प्रसिद्ध गाणेही गायले. इशान किशन, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार  हे खेळाडू या व्हिडिओत दिसत आहेत.

सामनावीर पुरस्कार मिळालेल्या दीपक चहरने भुवनेश्वर कुमारबरोबर आठव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचली. दीपक चहरने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत नाबाद ६९ धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमारही १९ धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा – VIDEO : शास्त्री मास्तरांच्या टीम इंडियानं पाहिली द्रविड सरांच्या टीम इंडियाची मॅच!

द्रविडचा मास्टरस्ट्रोक

यावेळी दीपक चहरच्या या आक्रमक फलंदाजीबाबत श्रीलंका दौर्‍यादरम्यान भारताचा उपकर्णधार असलेल्या भुवनेश्वर कुमारने मोठा खुलासा केला आहे. भुवनेश्वर कुमार म्हणाला की, दीपक चहरला फलंदाजीसाठी पाठवणे हा संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मास्टरस्ट्रोक होता. चहरला भुवनेश्वरच्या वर फलंदाजीसाठी पाठवले होते.