तिरंगी मालिकेतील भारत विरूध्द श्रीलंका सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला ९६ धावांमध्ये गुंडाळत अखेर अंतीम फेरीत प्रवेश मिळाला.  दरम्यान  पावसामुळे सामना २६ षटकोंमध्ये मर्यादीत करण्यात आला होता. श्रीलंकेला २६ षटकांमध्ये १७८ धावा करण्याचे आव्हान पेलवले नाही. भुवनेश्वरच्या भेदक माऱयासमोर श्रीलंकेने अक्षरशा नांगी टाकली.  श्रीलंकेचा संपूर्ण संघ २५ व्या षटकामध्ये अवघ्या ९६ धावांमध्ये गारद झाला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २९ षटकांमध्ये ३ बाद ११९ धावा केल्या. पावसामुळे सामना मर्यादीत षटकांचा करण्यात आला होता. श्रीलंकेसमोर २६ षटकांमध्ये १७८ धावा करण्याचे आव्हान होते. मात्र, श्रीलंकेच्या संपूर्ण संघाला २५ व्या षटकामध्ये अवघ्या ९६ धावांमध्ये बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. तिरंगी मालिकेचा अंतीम सामना भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानच खेळला जाणार आहे. गुरुवारी त्रिनीदाद, पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल, या आजच्याच मैदानावर दोन्हीसंघ आमने-सामने येतील. श्रीलंकेच्या आजच्या पराभवामुळे भारताच्या खात्या मध्ये अतिरीक्त २ गुणांची भर पडली आहे.                

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा