India vs Sri Lanka Final Highlights Women’s Asia Cup 2024: भारत आणि श्रीलंका महिला संघादरम्यान महिला टी-२० आशिया चषकाचा अंतिम सामना आज दांबुला येथील स्टेडियमवर खेळला गेला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत २० षटकांत ६ गडी गमावून १६५ धावा केल्या. या सामन्यात भारतीय महिला संघासाठी स्मृती मंधानाने ६० धावांची, ऋचा घोषने ३० धावांची आणि जेमिमाह रॉड्रिग्जने २९ धावांची खेळी खेळली. श्रीलंकेकडून काशवी दिलहरीने गोलंदाजीत २ विकेट घेतले.
श्रीलंकेच्या संघाने शानदार फलंदाजी करत १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला आणि १८.४ षटकांत २ गडी गमावून सामना जिंकून प्रथमच महिला आशिया चषक ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात श्रीलंकन संघाची कर्णधार चमारी अटापट्टूने ४३ चेंडूत ६१ धावांची खेळी केली, तर हर्षिता समरविक्रमाने ५१ चेंडूत ६९ धावांची नाबाद खेळी केली.
Women's Asia Cup 2024 Final Live, INDW vs SLW: श्रीलंकेने पहिल्यांदाच आशिया कपचे जेतेपद पटकावले आहे. या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला.
१९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर दिल्हारीने षटकार लगावत श्रीलंकेला पहिले आशिया चषकाचे जेतेपद पटकावून दिले. श्रीलंकेने ८ चेंडू बाकी ठेवत २ बाद १६७ धावा करत भारतावर विजय मिळवला.
राधा यादवच्या १८व्या षटकात हर्षिता समरविक्रमाने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. श्रीलंकाने १८व्या षटकात १७ धावा करत विजय निश्चित केला.
हर्षिता समरविक्रमाने ४३ चेंडूत ५० धावा करत शानदार अर्धशतक झळकावले आहे. यासह श्रीलंकेला विजयासाठी १८ चेंडूत २५ धावांची आवश्यकता आहे.
श्रीलंकेने १५ षटकांत २ बाद १२३ धावा केल्या आहेत. अटीतटीचा सामना पाहायाला मिळत आहे.
दीप्ती शर्माच्या १२व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेची कर्णधार ६१ धावा करत मैदानात होती, तिला क्लीन बोल्ड करत भारताला मोठी विकेट मिळवून दिली. ही विकेट कदाचित सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो.
१० षटकांनंतर १ बाद ८० धावा झाल्या आहेत. चमारीने ३४ चेंडूत ५१ धावा केल्या आहेत. कर्णधार चमारी मैदानात असेपर्यंत नक्कीच श्रीलंकेचा विजय निश्चित असल्याचे म्हणता येईल. भारतीय संघ विकेट्सच्या प्रतिक्षेत आहे.
श्रीलंकेने पॉवरप्लेमध्ये १ बाद ४४ धावा केल्या आहेत. पाचव्या षटकापर्यंत संघाच्या २८ धावा होत्या पण अखेरच्या ६व्या षटकात १६ धावा करत श्रीलंकेने चांगली फटकेबाजी केली. तनुजा कंन्वरच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.
५ षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या १ बाद २८ धावा आहे. भारताच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत धावांवर अंकुश ठेवला आहे.
श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्या षटकातील पूजा वस्त्राकारच्या चौथ्या चेंडूवर भारताला पहिली विकेट मिळाली. पूजाच्या चेंडूवर विश्मीने धाव घेण्याचा प्रयत्न केला पण चेंडू फार लांब गेला नव्हता तरीही विश्मीने धाव घेतली. पण चमारी तिला येताना पाहूनही पुन्हा चेंडूकडे पाहत मागे गेली आणि अशारितीने श्रीलंकेने फार सहज आपली पहिली विकेट गमावली. यासह श्रीलंकेने दोन षटकांत १ बाद ७ धावा केल्या.
भारताने दिलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचे सलामीवीर उतरले आहेत. श्रीलंकेकडून कर्णधार चमारी आणि विश्मी उतरले आहेत. तर भारताकडून रेणुका सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.
स्मृती मानधना-ऋचा घोषच्या झंझावाची खेळीच्या जोरावर भारताने 5 बाद १६५ धावा केल्या आहेत. श्रीलंकेच्या या खेळपट्टीवर भारताने धावांचा डोंगर उभारला आहे. स्मृती मानधनाने ६० धावांची, जेमिमाने २९ तर ऋचा घोषने पुन्हा एकदा १४ चेंडूत ३० धावांची झटपट खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. यासह भारताने श्रीलंकेला विजयासाठी १६६ धावांचे आव्हान दिले आहे.
स्मृती मानधना आणि जेमिमाने भारताच्या धावांना गती मिळवून दिली होती. पण दोघीही एकाच षटकात बाद झाल्या. १७व्या षटकातील दिल्हारीच्या पहिल्या चेंडूवर धाव घेण्याच्या नादात जेमिमा धावबाद झाली. जेमिमाने झटपट १६ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांसह २९ धावा करत धावबाद झाली. तर याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाली. स्मृती ४७ चेंडूत १० चौकारांसह ६० धावा करत बाद झाली.
भारताची उपकर्णधार आणि विस्फोटक फलंदाज स्मृती मानधनाने ३६ चेंडूत ५१ धावा करत आपले टी-२० मधील २६ वे अर्धशतक झळकावले. स्मृती मैदानात कायम असून भारताने १४ षटकांत १०० धावांचा पल्ला गाठला आहे.
१२व्या षटकातील निसानसालाच्या सहाव्या चेंडूवर भारताची कर्णधार झेलबाद झाली. हरमनने लगावलेल्या शॉटमुळे चेंडू हवेत उडाला आणि डिसिल्वाने तो टिपत हरमनला माघारी धाडले. हरमन ११ धावा करत बाद झाली. यासह भारताची धावसंख्या १२ षटकांनंतर ३ बाद ८७ आहे.
भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे. उमा छेत्री 7 चेंडूत 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. श्रीलंकेचा कर्णधार चमारी अट्टापथूने उमा छेत्रीला बाद केले. आता भारताची धावसंख्या 9 षटकांनंतर 2 बाद 64 धावा आहे. सध्या स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर क्रीजवर आहेत.
https://twitter.com/InsideSportIND/status/1817504104244986088
भारताची विस्फोटक फलंदाज शफाली वर्मा १६ धावा करत पायचीत झाली. सातव्या षटकातील दिल्हारीच्या तिसऱ्या चेंडूवर शफाली पायचीत झाली. यासह श्रीलंकाला मोठा ब्रेकथ्रू मिळाला आहे.
भारताने पॉवरप्लेमध्ये बिनबाद ४४ धावा केल्या आहेत. मानधना २६ धावा तर शफाली १६ धावांवर खेळत आहे.
पाचव्या षटकातील दिल्हारीच्या तिसऱ्या चेंडूवर स्मृतीने मोठा फटका खेळण्यासाठी बॅट फिरवली. झेलबाद होणार वाटत असतानाचं श्रीलंकाने झेल सोडला आणि स्मृतीला जीवदान मिळाले. तर पुढच्याच चेंडूवर चौकार लगावत स्मृतीने आपला क्लास दाखवला. यासह भारत ५ षटकांनंतर बिनबाद ३० धावा केल्या.
स्मृती मानधना आणि शफाली वर्माची जोडी मैदानावर कायम आहे. संधी मिळताच दोन्ही खेळाडू मोठे फटके मारत आहेत. यासह भारत तीन षटकांनंतर बिनबाद 20 धावांवर खेळत आहे.
पहिल्या षटकात भारताने दोन चेंडूवर संथ खेळ केला आणि संधी मिळताच शफालीने चौकार लगावला आहे. पहिल्या षटकात टीम इंडियाने ६ धावा केल्या आहेत.
भारत वि श्रीलंका महिला आशिया चषक अंतिम फेरीला सुरूवात झाली आहे. भारताची प्रथम फलंदाजी असून स्मृती मानधना आणि शफाली वर्माची जोडी मैदानात उतरली आहे. तर श्रीलंकानंतर इनोशीकडून गोलंदाजीला सुरूवात.
राष्ट्रगीतासाठी दोन्ही देश अंतिम सामन्यापूर्वी मैदानात हजर झाले आहेत. यजमान श्रीलंका देशाचे राष्ट्रगीत प्रथम झाले. तर सात वेळचा चॅम्पियन भारतीय संघाचे राष्ट्रगीत दुसऱ्यांदा झाले.
स्मृती मानधना, शफाली वर्मा, उमा चेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग
विश्मी गुणरत्ने, चामारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (यष्टीरक्षक), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सचीला प्रबोधन
भारतीय संघाने महिला आशिया चषक २०२४ च्या अंतिम फेरीची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तर श्रीलंका संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे.
विशामी गुणरत्ने, चामारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (यष्टीरक्षक), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, अचिनी कुलसूर्या, इनोशी प्रियदर्शिनी, उदेशिका प्रबोधिनी, अमा कंचना, सचिनी निसानसाला, काव्या कविंदी, शशिनी गिम्हणी.
स्मृती मानधना, शफाली वर्मा, उमा छेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग, एस सजना, दयालन, हेमलता, अरुंधती रेड्डी, आशा शोभना.
उभय संघांमधील हा सामना रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे या संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड. भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या २४ टी-२० पैकी १९ सामने जिंकले आहेत. तर, श्रीलंकेने केवळ चार वेळा भारताचा पराभव केला आहे आणि दोन्ही संघांमधील एका सामन्याचा निकाल लागला नाही. अशा स्थितीत या सामन्यातही भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळू शकतो.
महिला आशिया चषक २०२४ चा अंतिम सामना आज म्हणजेच २८ जुलै रोजी भारत आणि श्रीलंका संघांमध्ये होत आहे. विजयाच्या रथावर स्वार होत भारतीय क्रिकेट संघाच्या नजरा 8व्या आशिया चषक विजेतेपदावर आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली आहे. त्याचवेळी सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करून श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.०० वाजता खेळवला जाईल.