अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या वनडेत भारताने वेस्ट इंडीजला ६ गड्यांनी सहज धूळ चारली आहे. टीम इंडियाचा हा १०००वा वनडे सामना होता, शिवाय पूर्णवेळ कप्तान म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच परीक्षा होती. या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या प्रभावी फिरकीपुढे विंडीजचे फलंदाज निष्प्रभ ठरले. वेस्ट इंडीजचा डाव ४३.५ षटकात १७६ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात रोहितने दमदार अर्धशतकी खेळी केली. २८ षटकातच भारताने हा सामना खिशात टाकला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यजुर्वेंद्र चहलला सामनावीर पुरस्कार मिळाला.
भारताचा डाव
विंडीजच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी ८४ धावांची दमदार सलामी दिली. रोहितने ४४वे अर्धशतक झळकावत १० चौकार आणि एका षटकारासह ६० धावांची खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर मधल्या फळीत विराट कोहली, ऋषभ पंत, जास्त धावा काढू शकले नाहीत. आज पदार्पण केलेल्या दीपक हुडाला सोबत घेत सूर्यकुमारने संघाला आधार दिला. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. २८ षटकात भारताने वेस्ट इंडीजचे आव्हान पूर्ण केले. सूर्यकुमार यादव ३४ तर दीपक हुडा २६ धावांवर नाबाद राहिला.
हेही वाचा – IND vs WI : विकेट घेतल्यानंतर मोहम्मद सिराजनं केलं ‘असं’ सेलिब्रेशन; पाहा VIDEO
वेस्ट इंडीजचा डाव
वेस्ट इंडीजकडून शाई होप आणि ब्रँडन किंग यांनी सलामी दिली. पण किंग जास्त काळ तग धरू शकला नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने वेस्ट इंडीजला पहिला धक्का दिला, त्याने होपला (८) बोल्ड केले. डॅरेन त्यानंतर भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने विंडीजला दोन धक्के दिले. अर्धशतक पूर्ण करण्याआधी किंग आणि डॅरेन ब्राव्होला सुंदरने बाद केले. किंगने १३ तर ब्राव्होने १८ धावा केल्या. ४५ धावांत विंडीजने ३ गडी गमावले. आघाडीची फळी कोसळल्यानंतर विंडीजच्या डावाला सुरुंग लागला. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने दमदार गोलंदाजी करत विंडीजचा अर्धाा संघ तंबूत धाडला. त्याने शमारह ब्रुक्स (१२), निकोलस पूरन (१८), आणि विंडीजचा कप्तान कायरन पोलार्डला (०) तंबुचा मार्ग दाखवला. घसरगुंडीनंतर अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर आणि फॅबियन एलन यांनी विंडीजचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला आधार दिला. वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या ३८व्या षटकात होल्डरने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर होल्डर बाद झाला. त्याने ४ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. चहलने अल्झारी जोसेफला झेलबाद करत विंडीजचा डाव ४३.५ षटकात १७६ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून चहलने ४९ धावांत ४ बळी घेतले. तर सुंदरने ३ बळी घेतले. प्रसिध कृष्णाला २ बळी मिळाले.
२८ षटकात भारताने वेस्ट इंडीजचे आव्हान पूर्ण केले. सूर्यकुमार यादव ३४ तर दीपक हुडा २६ धावांवर नाबाद राहिला.
भारताची मधली फळी ढासळल्यानंतर हुडा आणि यादवने डाव सांभाळला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजयाजवळ नेले.
फिरकीपटू अकिल होसेनने सलामीवीर इशानला झेलबाद केले. इशानने २८ धावा केल्या. त्यानंतरच्या षटकात ऋषभ पंत धावबाद झाला. चार फलंदाज माघारी परतल्यानंतर पदार्पणवीर दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात आहेत. २० षटकात भारताने ४ बाद १३७ धावा केल्या आहेत.
दौन चौकार खेचत विराटने चांगली सुरुवात केली. पण जोसेफने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. विराट (८) रोचकडे सोपा झेल देऊन तंबूत परतला. विराटनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आहे.
वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने रोहितला पायचीत पकडत भारताला पहिला धक्का दिला. रोहित-इशानने ८४ धावांची सलामी दिली. रोहितने १० चौकार आणि एका षटकारासह ६० धावांची खेळी केली. रोहितनंतर विराट कोहली मैदानात आला आहे.
भारतासाठी ऐतिहासिक ठरलेल्या या सामन्यात कप्तान रोहित शर्माने ४४वे वनडे अर्धशतक पूर्ण केले.
रोहित-इशानने ९व्या षटकात भारताचे अर्धशतक पूर्ण केले.
भारताकडून रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी सलामी दिली आहे.
अल्झारी जोसेफला चहलने झेलबाद करत विंडीजचा डाव ४३.५ षटकात १७६ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून चहलने ४९ धावांत ४ बळी घेतले. तर सुंदरने ३ बळी घेतले. प्रसिध कृष्णाला २ बळी मिळाले.
प्रसिध कृष्णाने ४१व्या षटकात होल्डरला यष्टीपाठी झेलबाद केले. होल्डरने ४ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली.
वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या ३८व्या षटकात होल्डरने आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात सुंदरने एलनला (२९) झेलबाद करत विंडीजला आठवा धक्का दिला.
घसरगुंडीनंतर अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर आणि फॅबियन एलन यांनी विंडीजचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला आधार दिला. ३५ षटकात विंडीजने ७ बाद १४२ धावा केल्या.
वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने अकिल होसेनला शून्यावर झेलबाद करत विंडीजला सातवा धक्का दिला. ७९ धावांत विंडीजने ७ फलंदाज गमावले.
आघाडीची फळी कोसळल्यानंतर विंडीजच्या डावाला सुरुंग लागला. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने दमदार गोलंदाजी करत विंडीजचा अर्धाा संघ तंबूत धाडला. त्याने शमारह ब्रुक्स (१२), निकोलस पूरन (१८), आणि विंडीजचा कप्तान कायरन पोलार्डला तंबुचा मार्ग दाखवला.
भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने विंडीजला दोन धक्के दिले. अर्धशतक पूर्ण करण्याआधी पाहुण्या संघाच्या ब्रँडन किंग आणि डॅरेन ब्राव्होला सुंदरने बाद केले. किंगने १३ तर ब्राव्होने १८ धावा केल्या. ४५ धावांत विंडीजने ३ गडी गमावले. आता निकोलस पूरन आणि शमारह ब्रुक्स मैदानात आहेत.
वेस्ट इंडीजकडून शाई होप आणि ब्रँडन किंग यांनी सलामी दिली. पण किंग जास्त काळ तग धरू शकला नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने वेस्ट इंडीजला पहिला धक्का दिला, त्याने होपला (८) बोल्ड केले. डॅरेन ब्राव्हो फलंदाजीला आला आहे.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, यजुर्वेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीज - ब्रॅंडन किंग, शाई होप, शमारह ब्रूक्स, डॅरेन ब्राव्हो, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, फॅबियन एलन, अल्झारी जोसेफ, केमार रोच, अकिल होसेन.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
सध्याची परिस्थिती पाहता वनडे मालिकेतील सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य संघाने हा निर्णय घेतला आहे. आजचा हा सामना ऐतिहासिक ठरला आहे. भारताचा हा १०००वा एकदिवसीय सामना आहे. अशी कामगिरी करणारा भारत पहिला संघ ठरणार आहे.