India vs West Indies 1st T20 Update: पहिल्या टी-२० मध्ये भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला आहे. वेस्ट इंडिजने भारताचा चार धावांनी पराभव केला. भारतासमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य होते. पण टीम इंडियाला २० षटकात ९ विकेट गमावून केवळ १४५ धावा करता आल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून शेपर्ड, होल्डर आणि मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. यजमान वेस्ट इंडिजने त्याला एका रोमहर्षक सामन्यात चार धावांनी पराभूत केले. विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने २० षटकांत ६बाद १४९ धावा केल्या. टीम इंडियाला १५० धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि २० षटकात ९ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या.
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. नवोदित तिलक वर्मा वगळता सर्वांची निराशा झाली. टिळकने संघाकडून सर्वाधिक 39 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. संथ विकेटवर, सेट झाल्यानंतर भारतीय फलंदाज बाद होत राहिले. याचा फटका संघाला सहन करावा लागला. सूर्यकुमार यादवने २१, कर्णधार हार्दिक पंड्याने १९, अक्षर पटेलने १३, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंगने १२-१२ धावा केल्या. इशान किशन सहा आणि शुभमन गिलने तीन धावा करून बाद झाले.
IND vs WI 1st T20 Match Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिली टी-२० मॅच अपडेट
पहिल्या टी-२० मध्ये भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला आहे. वेस्ट इंडिजने भारताचा चार धावांनी पराभव केला. भारतासमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य होते. पण टीम इंडियाला २० षटकात ९ विकेट गमावून केवळ १४५ धावा करता आल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून शेपर्ड, होल्डर आणि मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताची शेवटची आशाही संपली आहे. अक्षर पटेल बाद झाला. आता भारताला विजयासाठी १० चेंडूत २१ धावांची गरज आहे, जी आता शक्य दिसत नाही. भारताच्या सात विकेट पडल्या आहेत.
१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला शेवटच्या १८ चेंडूत ३२ धावांची गरज आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव ही जोडी क्रीजवर आहे. भारताने ६ विकेट गमावल्या आहेत.
११३ धावांवर भारताच्या सहा विकेट पडल्या आहेत. संजू सॅमसन १२ चेंडूत १२ धावा करून धावबाद झाला. काइल मेयर्सच्या अचूक थ्रोमुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. आता टीम इंडिया अडचणीत आली आहे. अक्षर पटेलसोबत कुलदीप यादव क्रीझवर आहे. भारताची धावसंख्या १६ षटकांनंतर ६ बाद ११३ अशी आहे.
सामना भारताच्या हातात आल्याचे वाटत असतानाच कर्णधार हार्दिक पांड्या १९ धावा करून बाद झाला. संजू सॅमसन १२ धावा करून क्रीजवर उपस्थित आहे. भारताला २९ चेंडूत ३७ धावांची गरज आहे. भारताच्या पाच विकेट पडल्या आहेत.
१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १४ षटकांचया समाप्तीनंतर ४ गडी गमावून ९८ धावा केल्या आहेत. संजू सॅमसन (४) आणि हार्दिक पंड्या (१८) क्रीझवर फलंदाजी करत आहेत. भारताला विजयासाठी अजून ३६ चेंडूत ५२ धावांची गरज आहे.
भारताला मोठा धक्का बसला आहे. तिलक वर्मा बाद झाला आहे. तिलक वर्माने पदार्पणात ३९ धावांची खेळी केली. ११.४ षटकांनंतर भारताची धावसंख्या ७८ आहे. भारताच्या चार विकेट पडल्या आहेत. हार्दिकला पाठिंबा देण्यासाठी संजू क्रिजवर आला आहे.
सूर्यकुमार यादवच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. २१ चेंडूत २१ धावा करून तो बाद झाला. त्याला जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायरने झेलबाद केले. भारताने १० षटकात ३ गडी बाद ७० धावा केल्या आहेत. तिलक वर्मा १८ चेंडूत ३३ धावा करत नाबाद आहे. हार्दिक पांड्या तीन चेंडूत दोन धावा करून खेळत आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत. भारताने सात षटकांत दोन बाद ५० धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव १५ चेंडूत १९ आणि तिलक वर्मा ९ चेंडूत १७ धावांवर नाबाद आहे.
पाचव्या षटकात भारताला आणखी एक धक्का बसला. पाचव्या चेंडूवर ओबेद मॅकॉयने इशान किशनला बाद केले. नऊ चेंडूत सहा धावा करून किशनला रोव्हमन पॉवेलने झेलबाद केले. भारताने पाच षटकांत दोन गडी गमावून २८ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवसोबत तिलक वर्मा क्रीझवर आहे.
या सामन्यात शुभमन गिलची बॅट चालली नाही. नऊ चेंडूत तीन धावा करून तो बाद झाला. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अकिल हुसेनने त्याला बाद केले. अकीलचा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात शुभमन गिलला यष्टिरक्षक जॉन्सन चार्ल्सने यष्टीचित केले.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने सहा गडी गमावून १४९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक ४८ धावा केल्या. त्याचवेळी निकोलस पूरनने ४१ धावांची खेळी केली. ब्रेंडन किंगने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी दोन बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
१९ व्या षटकात १३८ धावांवर वेस्ट इंडिजची सहावी विकेट पडली. अर्शदीप सिंगने रोवमन पॉवेलला बाद केले. पॉवेलने ३२ चेंडूत ४८ धावा केल्या.
अर्शदीप सिंगने भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्याने शिमरॉन हेटमायरला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. हेटमायरने १२ चेंडूत १० धावा केल्या. वेस्ट इंडिजने १८.१ षटकात ५ विकेट गमावत १३४ धावा केल्या आहेत. कर्णधार रोव्हमन पॉवेल ४८ धावा करून नाबाद आहे. रोमारियो शेफर्ड फलंदाजीला आला आहे.
पहिल्या टी-२० मध्ये वेस्ट इंडिजने १६ षटकांनंतर ४ विकेट गमावून ११५ धावा केल्या आहेत. रोव्हमन पॉवेल (३३) आणि शिमरॉन हेटमायर (६) क्रीझवर फलंदाजी करत आहेत.
भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने १५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. त्याने निकोलस पूरनला तिलक वर्माकरवी झेलबाद केले. या सामन्यात पुरणने शानदार फलंदाजी केली, मात्र त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. ३४ चेंडूत ४१ धावा करून तो बाद झाला. यादरम्यान पुरणने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. वेस्ट इंडिजने १५.१ षटकात चार विकेट गमावत ९६ धावा केल्या आहेत. रोव्हमन पॉवेल २० धावांवर नाबाद आहे. पूरण बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायर क्रीजवर आला आहे.
११ षटकांनंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या ३ विकेट गमावून ८० धावा आहे. भारतीय फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजच्या वेगाला ब्रेक लावला आहे. निकोलस पूरन ३४ आणि रोव्हमन पॉवेल १२ धावांवर खेळत आहेत.
वेस्ट इंडिज संघाने १० षटकानंतर ३ बाद ६९ धावा केल्या आहेत. निकोलस पूरन ३३ आणि कर्णधार रोव्हमॅन पॉवेल ३ धावांवर खेळत आहेत.
जॉन्सन चार्ल्सच्या रूपाने वेस्ट इंडिजला तिसरा धक्का बसला. पहिल्या टी-२० मध्ये त्याची बॅट चालली नाही. सहा चेंडूत तीन धावा करून तो बाद झाला. त्याला कुलदीपचा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवायचा होता, पण चेंडू हवेत उंच गेला. पहिला सामना खेळत असलेल्या तिलक वर्माने पुढे धावताना अप्रतिम झेल घेतला. वेस्ट इंडिजने आठ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ६१ धावा केल्या आहेत. निकोलस पूरन १४ चेंडूत नाबाद २७ तर कर्णधार रोव्हमन पॉवेल दोन चेंडूत एक धाव करून नाबाद आहे.
कुलदीप यादवनेही पहिल्याच षटकात येताच विकेट घेतली आहे. विंडीजची तिसरी विकेट पडली. ७.३ षटकानंतर विंडीजची धावसंख्या ३ बाद ५७ झाली आहे पूरनला साथ देण्यासाठी कर्णधार पॉवेल क्रीझवर आला आहे.
युजवेंद्र चहलने आपल्या पहिल्याच षटकात भारताला दोन यश मिळवून दिले. काइल मेयर्स (१) नंतर त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने ब्रँडन किंगला (२८) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. निकोलस पूरन आणि जॉन्सन चार्ल्स आता क्रीजवर फलंदाजी करत आहेत.
वेस्ट इंडिजचे फलंदाज वेगाने धावा करत आहेत. चार षटकांनंतर विंडीजच्या २९ धावा. किंगने २८ धावा केल्या आहेत. दोन्ही बाजूंनी स्पिनर्स गोलंदाजी करत आहेत. चहलने येताच भारताला पहिली विकेट मिळवून दिली. मेअर्स एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
वेस्ट इंडिजचा सलामीवीर कायल मेयर्सने पहिल्या दोन षटकांतच भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. विंडीज संघाची धावसंख्या २ षटकांनंतर १६ धावा झाली आहे. पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारला पहिल्याच षटकात ८ धावा मिळाल्या.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात चौकार मारला गेला. पहिल्या षटकात ७ धावा झाल्या. मुकेश कुमारने दुसरे षटक आणले आहे.
भारताकडून दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. तिलक वर्मा आणि मुकेश कुमार पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळत आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यावरच मुकेश कुमारला कसोटी आणि वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
भारत: शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
https://twitter.com/BCCI/status/1687102514494414848?s=20
वेस्ट इंडीज: काइल मेयर्स, ब्रेंडन किंग, जॉन्सन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करेल.
तिलक वर्मा आणि मुकेश कुमार भारतासाठी त्यांचे टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.
३ ऑगस्ट: पहिला टी-२० सामना , ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियम, त्रिनिदाद
६ ऑगस्ट: दुसरा टी-२० सामना , नॅशनल स्टेडियम, गयाना
८ ऑगस्ट: तिसरा टी-२० सामना , नॅशनल स्टेडियम, गयाना
१२ ऑगस्ट: चौथा टी-२० सामना , ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
१३ ऑगस्ट: पाचवा टी-२० सामना, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
वेस्ट इंडिज: ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स/शाई होप (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड/ओडियन स्मिथ, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ/ओशेन थॉमस .
https://twitter.com/windiescricket/status/1687093584535719936?s=20
IND vs WI 1st T20 Match Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिली टी-२० मॅच अपडेट
भारतासमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य होते. पण टीम इंडियाला २० षटकात ९ विकेट गमावून केवळ १४५ धावा करता आल्या.