India vs West Indies 1st T20 Update: पहिल्या टी-२० मध्ये भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला आहे. वेस्ट इंडिजने भारताचा चार धावांनी पराभव केला. भारतासमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य होते. पण टीम इंडियाला २० षटकात ९ विकेट गमावून केवळ १४५ धावा करता आल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून शेपर्ड, होल्डर आणि मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. यजमान वेस्ट इंडिजने त्याला एका रोमहर्षक सामन्यात चार धावांनी पराभूत केले. विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने २० षटकांत ६बाद १४९ धावा केल्या. टीम इंडियाला १५० धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि २० षटकात ९ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या.

या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. नवोदित तिलक वर्मा वगळता सर्वांची निराशा झाली. टिळकने संघाकडून सर्वाधिक 39 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. संथ विकेटवर, सेट झाल्यानंतर भारतीय फलंदाज बाद होत राहिले. याचा फटका संघाला सहन करावा लागला. सूर्यकुमार यादवने २१, कर्णधार हार्दिक पंड्याने १९, अक्षर पटेलने १३, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंगने १२-१२ धावा केल्या. इशान किशन सहा आणि शुभमन गिलने तीन धावा करून बाद झाले.

Live Updates

IND vs WI 1st T20 Match Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिली टी-२० मॅच अपडेट

19:22 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन/संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल/रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार/उमरान मलिक/आवेश खान .

19:02 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: सॅमसन आणि इशानमध्ये कोणाला मिळणार संधी?

इशान आणि संजू सॅमसन यापैकी कोणाला यष्टिरक्षक म्हणून स्थान दिले जाते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोघांपैकी ज्याला संधी मिळेल, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तिलक पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. ज्या प्रकारचे प्रयोग केले जात आहेत आणि इशान ज्या फॉर्ममध्ये आहे, सॅमसनला बेंचवर ठेवण्याची शक्यता आहे. कर्णधार हार्दिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो.

18:59 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: भारतीय संघात नव्या चेहऱ्यांना संधी

भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या टी-२० मालिकेसाठी काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये आयपीएलमध्ये खेळलेल्या तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. यशस्वीने भारतासाठी कसोटी मालिकेत पदार्पण केले आहे, परंतु आज तो टी-२० मध्येही पदार्पण करू शकतो. त्याचबरोबर तिलकला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. मुकेशने कसोटी आणि वनडेमध्ये पदार्पण केले आहे. अशा स्थितीत त्याला टी-२०मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

18:51 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: टी-२० मध्ये कोणाचे वर्चस्व राहिले?

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत २५ टी-२० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी १७ सामने भारताने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने ७ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. शेवटच्या वेळी २०२२ मध्ये उभय संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली होती. ती भारताने ३-१ने जिंकली होती. भारताने वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या ७ पैकी ४ सामने जिंकले आणि ३ पराभूत झाले.

18:46 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: क्वीन्स पार्क स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिजचे रेकॉर्ड

ब्रायन लारा स्टेडियम म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क मैदानावर भारतीय संघाने केवळ एकच टी-२० सामना खेळला आहे. या सामन्यात भारताने १६ धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने या मैदानावर एकूण ६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानी २ जिंकले आहेत आणि ४ गमावले आहेत.

18:43 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ

वेस्ट इंडिज: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (व्हीसी), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशन थॉमस

18:40 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

भारत : इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग. उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

18:38 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: पहिल्या सामन्यासाठीचा हवामान अंदाज

आज सकाळी ढगांसह सूर्यप्रकाश असेल, तथापि, दुपारपर्यंत, हवामान वेगाने बदलू शकते. आज पावसाची ४०% शक्यता आहे, सुमारे १.० मिमी पावसाचा अंदाज आहे, याचा अर्थ असा की सामना स्थानिक वेळेनुसार १०: ३०वाजता सुरू होणार आहे, जो पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे. तसेच, खेळाडू आणि प्रेक्षकांना संभाव्य वादळासाठी तयार राहावे लागेल, कारण सामन्यादरम्यान मुसळधार पावसासह वीज पडण्याची २४% शक्यता आहे.

18:37 (IST) 3 Aug 2023

18:32 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: ब्रायन लारा स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे?

क्वीन्स पार्क ओव्हलची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे धावा काढण्यासाठी फलंदाजांना खूप संघर्ष करावा लागतो. कारण ही खेळपट्टी अतिशय संथ आहे, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटूंना अतिरिक्त मदत मिळते. या मैदानावर पहिल्या डावात सरासरी ११५ धावा आहेत, तर दुसऱ्या डावात धावांची सरासरी ११२ आहे. येथे आतापर्यंत एकही शतक झळकावलेले नाही.

18:27 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: टीम इंडिया सहा महिन्यांनी टी-२० सामना खेळण्यास सज्ज

भारतीय संघ सहा महिन्यांनंतर टी-२० सामना खेळणार आहे. टीम इंडियाने शेवटचा टी-२० सामना १ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यानंतर संघ फक्त कसोटी आणि वनडे खेळत होता. गेल्या सहा टी-२० सामन्यांमध्ये भारताने चार जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्धची शेवटची टी-२० मालिका टीम इंडियाने २-१ ने जिंकली होती. त्याआधी श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिकाही २-१अशा फरकाने जिंकली होती.

18:21 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भारत दुसरा संघ

सर्वाधिक टी-२० सामने खेळणारा संघ –

पाकिस्तान: २२३

भारत: १९९

न्यूझीलंड: १९३

श्रीलंका: १७९

वेस्ट इंडिज : १७८

ऑस्ट्रेलिया: १७४

इंग्लंड: १७३

दक्षिण आफ्रिका: १६८

बांगलादेश : १५२

आयर्लंड: १५२

18:15 (IST) 3 Aug 2023
IND vs WI 1st T20: भारतासाठी आज ऐतिहासिक सामना, २०० वा सामना खेळणारा जगातील दुसरा संघ

हा भारताचा २०० वा टी-२० सामना असेल. टीम इंडिया हा टप्पा गाठणारा जगातील दुसरा संघ बनेल. भारतापूर्वी केवळ एकाच संघाने २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या यादीत पाकिस्तान २२३ टी-२० सामन्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने पहिला टी २० सामना १ डिसेंबर २००६५ रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्या सामन्यात वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाचे नेतृत्व केले आणि भारताने तो सामना सहा विकेट्सने जिंकला. सचिन तेंडुलकरचा हा पहिला आणि शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता.

भारतासमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य होते. पण टीम इंडियाला २० षटकात ९ विकेट गमावून केवळ १४५ धावा करता आल्या.