India vs West Indies 2nd T20 Highlights Score Update: वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी२०सामन्यात भारताचा दोन विकेट राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने आठ गडी गमावून १५५ धावा केल्या आणि सामना जिंकला.
हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात ब्रेंडन किंग व जॉन्सन चार्ल्स या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. कायले मायर्स ( १५) व निकोलस पूरन यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्शदीप सिंगने ही जोडी तोडली. रवी बिश्नोईच्या पहिल्याच षटकात निकोलसने ४,६,०,४,४,० अशी फटकेबाजी केली. निकोलस व कर्णधार रोव्हमन पॉवेल ( २१) यांनी ३७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. निकोलस पूरनला पुरस्कार देण्यात आला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना गयाना येथे सुरू आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला असून टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधायची आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा केल्या. तिलक वर्माच्या शानदार अर्धशतकाने भारताला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ७ विकेट्स गमावून १५२ धावा केल्या असून वेस्ट इंडिजसमोर १५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला १५० धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. अशा स्थितीत वेस्ट इंडिजसाठीही हे लक्ष्य सोपे नसेल. गयानाच्या संथ खेळपट्टीवर धावा काढणे सोपे नाही आणि भारतीय संघातील तीन फिरकी गोलंदाज विंडीजला अडचणीत आणू शकतात. या सामन्यात भारताकडून टिळक वर्माने सर्वाधिक ५१ धावा केल्या. इशान किशनने २७ आणि हार्दिक पांड्याने २४ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने १४ धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
India vs West Indies 2nd T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी २० हायलाइट्स अपडेट्स
वेस्ट इंडीजने सलग दोन सामन्यात पहिल्यांदाच विजय मिळवत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. निकोलस पूरनने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर दोन विकेट्सने रोमांचक विजय संपादन केला.
वेस्ट इंडीज १५५-८
युजवेंद्र चहलच्या जादुई षटकाने टीम इंडिया सामन्यात परत आली आहे. मात्र निकोलस पूरन बाद होताच एकाच षटकात तीन विकेट्स पडल्या. शिमरॉन हेटमायरने २२ चेंडूत २२ धावा करून तो पायचीत बाद झाला.
वेस्ट इंडीज १२९-८
युजवेंद्र चहलच्या जादुई षटकात एक धावबाद आणि एक यष्टीचीत अशा लागोपाठ दोन विकेट्स पडल्या. यामुळे वेस्ट इंडीजचा संघ अडचणीत सापडला आहे. होल्डरही भोपळा न फोडता बाद झाला.
वेस्ट इंडीज १२८-७
निकोलस पूरन बाद होताच वेस्ट इंडीज दबावात आली असे दिसत आहे. रोमॅरियो शेफर्ड भोपळाही न फोडता धावबाद झाला. त्याला अक्षर पटेलने धावबाद केले.
वेस्ट इंडीज १२८-६
निकोलस पूरन अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या जवळ घेऊन जात होता. मात्र, मोठा मारण्याच्या नादात तो संजू सॅमसन करवी झेलबाद झाला. सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. त्याने ४० चेंडूत ६७ धावा केल्या.
वेस्ट इंडीज १२६-५
भारताला विकेट्स गरज आहे मात्र, या सामन्यात वेस्ट इंडीज पुढे आहे. त्यांना ४८ चेंडूत ४७ धावांची गरज असून हातात ६ विकेट्स आहेत. अजूनही निकोलस पूरन खेळपट्टीवर टिकून आहे. त्यामुळे भारताला विजय मिळवण जवळपास अवघड आहे.
वेस्ट इंडीज १०५-६
कर्णधार हार्दिक पांड्याला जोडी फोडण्यात यश आले आहे. भारताच्या कर्णधाराने वेस्ट इंडीजच्या कर्णधाराला बाद केले. रोव्हमन पॉवेल १९ चेंडूत २१ धावा करून मुकेश कुमारकरवी झेलबाद झाला.
वेस्ट इंडीज ८९-४
तीन विकेट्स पडल्यानंतर कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांनी ३७ चेंडूत ५७ धावांची भागीदारी केली. त्यात निकोलस पूरनेने अफलातून अर्धशतक केले. तो सध्या २९ चेंडूत ५० धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे.
वेस्ट इंडीज ८८-३
अर्शदीपच्या चेंडूवर निकोलस पूरनही विकेट्ससमोर झेलबाद झाला होता. अंपायरने त्याला आऊट दिला. मात्र, त्याने रिव्ह्यू घेतला आणि चेंडू स्विंग होऊन स्टंपच्या बाहेर जात होता. यामुळे तो खेळपट्टीवर कायम आहे. सध्या भारताला विकेट्सची गरज आहे.
वेस्ट इंडीज ६२-३
हार्दिक पांड्याने पहिल्या षटकात दोन धावा देऊन दोन विकेट्स घेतले, पण पूरनने दुसऱ्या षटकात १७ धावा दिल्या आणि अजूनही तो मोठे फटके मारत आहे. त्याची आक्रमक फटकेबाजीमुळे वेस्ट इंडीज सामन्यात परत आली आहे.
वेस्ट इंडीज ६१-३
काइल मेयर्स आणि निकोलस पूरन यांनी वेस्ट इंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्शदीप सिंगने ही जोडी फोडत भारताला यश मिळवून दिले. त्याने काइल मेयर्सला १५ धावांवर बाद केले.
वेस्ट इंडीज ३२-३
भारताने ठेवलेल्या १५३ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची खराब सुरुवात झाली आहे. हार्दिक पांड्याच्या पहिल्याच षटकात विंडीजला एकापाठोपाठ दोन धक्के दिले. ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांना तंबूत पाठवण्यात यश आले. ब्रँडनला भोपळाही फोडता आला नाही आणि चार्ल्सने केवळ २ धावा केल्या.
वेस्ट इंडीज २-२
तिलक वर्माच्या शानदार अर्धशतकाने भारताला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले. टीम इंडियाने वेस्ट इंडीजसमोर १५३ धावांचे आव्हान ठेवले आहे. आता भारतीय गोलंदाजी टीम इंडियाला जिंकून देणार का? हे पाहणे उत्सुकेचे असणार आहे.
भारत १५२-७
टीम इंडियाची गळती सुरूच असून तिलक वर्मा वगळता सर्वच फलंदाजांनी निराशा केली. अष्टपैलू अक्षर पटेल १२ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. त्याला रोमॅरियो शेफर्डने निकोलस पूरनकरवी झेलबाद केले.
१३९-१
ओबेद मॅककॉयच्या शानदार यॉर्कर चेंडूवर भारताचा हार्दिक पांड्या त्रिफळाचीत झाला. त्याने १८ चेंडूत २४ धावा केल्या.
भारत १२९-६
टीम इंडियाचा डाव सावरणारा फलंदाज तिलक वर्मा अर्धशतक होताच बाद झाला आहे. त्याला अकील हुसेनने ओबेद मॅककॉयकरवी झेलबाद केले. त्याने ४१ चेंडूत ५१ धावा केल्या.
भारत ११४-५
एका बाजूने विकेट्स पडत असताना भारताचा युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्माने दुसऱ्या बाजूने शानदार फटकेबाजी करत अफलातून अर्धशतक केले. सध्या खेळपट्टीवर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा खेळत असून भारताला धावगती वाढवण्याची गरज आहे.
भारत ११३-४
भारताचा युवा फलंदाज सध्या अप्रतिम फलंदाजी करत असून त्याचा झेल विंडीज क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी सोडला. त्यामुळे संपूर्ण भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तो सध्या ३२ धावांवर फलंदाजी करत आहे.
भारत ८५-४
भारतीय संघाला मोठी भागीदारी करण्यात अपयश येत आहे. टीम इंडियाला चौथा धक्का बसला असून संजू सॅमसन अवघ्या ७ धावा करून बाद झाला. त्याला निकोलस पूरनने यष्टिचीत केले. आता भारतीय डावाची संपूर्ण मदार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा या दोन फलंदाजांवर आहे.
भारत ७९-४
तिलक वर्मा आणि इशान किशन या जोडीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात इशान त्रिफळाचीत झाला. त्याला रोमॅरियो शेफर्डने २७ धावांवर बाद केले.
भारत ६०-३
भारताने अर्धशतक पूर्ण केले असून लागोपाठ विकेट पडल्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्माने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. सध्या दोन्ही भारताची धावगती कमी असली तरी विकेट्स हातात असल्याने भारताला मोठी धावसंख्या वाढवण्याची संधी आहे.
भारत ६०-२
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दुसरा टी२० सामना सुरु आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सलामीवीर शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव बाद झाले. सध्या खेळपट्टीवर इशान किशन आणि तिलक वर्मा भारताचा डाव पुढे नेत आहेत. मात्र, धावगती वाढवण्याची अधिक गरज आहे.
भारत ३४-२
वेस्ट इंडीजने दुसऱ्या सामन्यात शानदार सुरुवात करत भारताला पॉवर प्ले मध्ये एकापाठोपाठ एक असे दोन धक्के दिले. शुबमन पाठोपाठ 'द-स्काय' अशी ओळख असणारा सूर्यकुमार यादव अवघी एक धाव करून धावबाद झाला.
भारत १८-२
मोठा फटका मारण्याच्या नादात सलामीवीर शुबमन गिल बाद झाला. त्याने ९ चेंडूत ७ धावा केल्या. त्याला अल्झारी जोसेफने हेटमायरकरवी झेलबाद केले.
भारत १७-१
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर इशान किशन झेलबाद होता होता वाचला. त्याने मिडॉफला शॉट खेळला पण क्षेत्ररक्षकाकडे तो चेंडू एक टप्पा पोहचला. वेस्ट इंडीजने सामन्याची सुरुवात उत्तम केली आहे.
भारत १-०
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना गयाना येथे सुरू आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला असून टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधायची आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आकडेवारीत भारताने २६ सामने खेळले आहेत त्यापैकी १७ सामने भारताने आणि ८ सामने वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. भारताचा जिंकण्याची सरासरी ६५.२८ आहे.
वेस्ट इंडीज: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.
भारत: इशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, रवी बिश्नोई.
भारतीय संघाने कुलदीप यादवच्या जागी रवी बिश्नोईला संघात स्थान मिळाले आहे. कुलदीप यादवला नेट मध्ये सराव करताना दुखापत झाली. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यातील संघात टीम इंडियाने बदल केला आहे. मात्र, वेस्ट इंडीजने विजयी संघात कुठलाही बदल केला नाही.
भारतीय संघाने सामन्याआधी टीम इंडियाने कसून सराव केला. हार्दिक पांड्या आणि इतर संपूर्ण संघाने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कॅचिंगचा सराव केला.
India vs West Indies 2nd T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी २० हायलाइट्स अपडेट्स
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना आज (६ ऑगस्ट) संपन्न झाला. भारतीय संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. विंडीजने दोन विकेट्सने रोमांचक विजय संपादन केला.