India vs West Indies 2nd T20 Highlights Score Update: वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी२०सामन्यात भारताचा दोन विकेट राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने आठ गडी गमावून १५५ धावा केल्या आणि सामना जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात ब्रेंडन किंग व जॉन्सन चार्ल्स या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. कायले मायर्स ( १५) व निकोलस पूरन यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्शदीप सिंगने ही जोडी तोडली. रवी बिश्नोईच्या पहिल्याच षटकात निकोलसने ४,६,०,४,४,० अशी फटकेबाजी केली. निकोलस व कर्णधार रोव्हमन पॉवेल ( २१) यांनी ३७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. निकोलस पूरनला पुरस्कार देण्यात आला.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना गयाना येथे सुरू आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला असून टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधायची आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा केल्या. तिलक वर्माच्या शानदार अर्धशतकाने भारताला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ७ विकेट्स गमावून १५२ धावा केल्या असून वेस्ट इंडिजसमोर १५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला १५० धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. अशा स्थितीत वेस्ट इंडिजसाठीही हे लक्ष्य सोपे नसेल. गयानाच्या संथ खेळपट्टीवर धावा काढणे सोपे नाही आणि भारतीय संघातील तीन फिरकी गोलंदाज विंडीजला अडचणीत आणू शकतात. या सामन्यात भारताकडून टिळक वर्माने सर्वाधिक ५१ धावा केल्या. इशान किशनने २७ आणि हार्दिक पांड्याने २४ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने १४ धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

Live Updates

India vs West Indies 2nd T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी २० हायलाइट्स अपडेट्स

19:16 (IST) 6 Aug 2023
IND vs WI: दोन्ही संघांच्या खेळाडूंची यादी

भारत वेस्ट इंडिज टी२० संघ

टीम इंडिया टी२० संघ: शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.

वेस्ट इंडिज टी२० संघ: ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, काइल मेयर, ओडीन स्मिथ, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप (विकेटकीपर), अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय, ओशाने थॉमस.

19:06 (IST) 6 Aug 2023
IND vs WI: काय रंग दाखवणार गयानाची खेळपट्टी? जाणून घ्या

प्रोव्हिडन्स स्टेडियम हे वेस्ट इंडिजच्या नवीन स्टेडियमपैकी एक आहे, या स्टेडियममध्ये आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत आणि त्यानुसार येथे आधी गोलंदाजी करणे फायदेशीर मानले जाते. कारण इथे फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळते. ज्यामुळे फलंदाजाला धावा काढणे खूप कठीण जाते. त्यामुळे जो कोणता संघ नाणेफेक जिंकेल तो आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.

18:59 (IST) 6 Aug 2023
IND vs WI: आजच्या सामन्यात पाऊस घालणार का खोडा?

गयानामध्ये रविवारी पाऊस खराब होऊ शकतो. AccuWeather नुसार, पावसाची सात टक्के शक्यता आहे आणि दुपारनंतर हे प्रमाण ७१ टक्क्यांपर्यंत वाढेल. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सामना सुरू होईल आणि खेळादरम्यान थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

18:57 (IST) 6 Aug 2023
IND vs WI: भारतीय संघ आज वेस्ट इंडीजशी करणार दोन हात

आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. प्रॉव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ खेळायला आले आहेत. याच सामन्यात हार्दिक पांड्या आणि रोवमन पॉवेल यांनी कर्णधार म्हणून मैदानात उतरले आहे. भारतीय संघाने पहिला सामना ४ धावांनी गमावला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना आज (६ ऑगस्ट) संपन्न झाला. भारतीय संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. विंडीजने दोन विकेट्सने रोमांचक विजय संपादन केला.