India vs West Indies 3rd T20I Highlights Update: भारताने तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा सात विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत कायम आहे. भारताच्या विजयानंतर मालिकेतील स्कोअर २-१ असा वेस्ट इंडिजच्या बाजूने आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या आणि भारताने तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने ५ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या आहेत. ब्रेंडन किंगने ४२ आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाबाद ४० धावा केल्या. या दोघांशिवाय मेयर्सने २५ आणि पूरनने २० धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने तीन बळी घेतले. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. या मालिकेतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे.
सूर्यकुमार यादव (४४ चेंडूत ८३ धावा) आणि तिलक वर्मा (३७ चेंडूत नाबाद ४९ धावा) यांनी भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२०सामन्यात विजय मिळवून दिला. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर मंगळवारी भारताने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने १६० धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने १७.५ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. भारतासाठी हा ‘करो किंवा मरो’ सामना होता.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत आठ वेळा टी२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. यादरम्यान टीम इंडियाने सहा मालिका जिंकल्या आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजला केवळ दोन मालिकांमध्ये यश मिळाले. २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचा शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर विंडीजने त्यांच्या भूमीवर एक सामन्याची मालिका १-० अशी जिंकली होती. यापूर्वी २०१६ मध्ये वेस्ट इंडिजने त्यांच्या यजमानपदावर दोन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली होती. अशा परिस्थितीत सहा वर्षांनंतर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गमावू नये यासाठी भारताचा प्रयत्न असेल.
India vs West Indies 3rd T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज तिसरी टी २० हायलाइट्स अपडेट्स
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. टीम इंडिया या मालिकेत २-०ने पिछाडीवर असताना आजच्या सामन्यात शानदार पुनरागमन करत सात विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
भारत १६४-३
१२१ धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. सूर्यकुमार यादव ४४ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला अल्झारी जोसेफच्या चेंडूवर ब्रेंडन किंगने झेलबाद केले. आता कर्णधार हार्दिक पांड्या तिलक वर्मासोबत क्रीजवर आहे.
भारत १२१-३
भारताच्या धावसंख्येने दोन विकेट गमावून १०० धावा ओलांडल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या तुफानी फलंदाजीमुळे हा सामना एकतर्फी झाला. तिलक वर्माला हाताशी घेत त्याने नाबाद ४५ चेंडूत ७७ धावांची भागीदारी रचली आहे. दोन्ही सध्या खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताला ४८ चेंडूत ४६ धावांची गरज आहे.
भारत ११४-२
सूर्यकुमार यादवने एका बाजूने आक्रमक फटकेबाजी करत त्याने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने तिलक वर्माला हाताशी घेत भारतीय संघाचा डाव सावरला. सध्या तो ५१ धावांवर खेळत आहे. त्या दोघांमध्ये २३ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली आहे.
भारत ७९-२
दोन्ही सलामीवीर तंबूत परतताच सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या जोडगोळीने भारताचा डाव सावरला आहे. पॉवर प्लेमध्ये भारताने एका बाजूला विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूने आक्रमक फलंदाजी केली. भारताचे अर्धशतक देखील पूर्ण झाले आहे.
भारत ६०-२
१६० धावांचा पाठलाग करताना भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. पदार्पण करणारा यशस्वी जैस्वाल अवघी एक धाव काढून बाद झाला आणि शुबमन गिल देखील फारसे काही करू शकला नाही. त्याने ११ चेंडूत ६ धावा केल्या. आता टीम इंडियाची मदार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या जोडीवर आहे.
भारत ४३-२
१६० धावांचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली. टी२०त पदार्पण करणारा यशस्वी जैस्वाल अवघी १ धाव करून बाद झाला. त्याला ओबेद मॅककॉयने अल्झारी जोसेफकरवी झेलबाद केले.
भारत ६-१
भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजचे फलंदाज ढेपाळले. वेस्ट इंडीजने २० षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या होत्या. टीम इंडियाला आता मालिका वाचवण्यासाठी १६० धावा करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय फलंदाज या लक्ष्याचा पाठलाग करताना कशी फलंदाजी करतात ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
वेस्ट इंडीज १५९-५
मुकेश कुमारच्या शानदार गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात शिमरॉन हेटमायर बाद झाला. त्याने ८ चेंडूत ९ धावा करून बाद झाला.
वेस्ट इंडीज १२३-५
कुलदीप यादवच्या फिरकीपुढे वेस्ट इंडीजचे फलंदाज ढेपाळले असे म्हटले तर वावग ठरणार नाही. त्याने धोकादायक निकोलस पूरन पाठोपाठ सेट फलंदाज ब्रेंडन किंगला ही तंबूत धाडले. त्याने ४२ चेंडूत ४२ धावा केल्या.
वेस्ट इंडीज १०६-४
वेस्ट इंडीजला मोठा फटका बसला असून मोठा फटका मारण्याच्या नादात निकोलस पूरन बाद झाला. कुलदीप यादवने त्याला यष्टिचीत केले. निकोलस पूरनने १२ चेंडूत २१ धावा केल्या.
वेस्ट इंडीज १०५-३
ब्रेंडन किंग-निकोलस पूरनची तुफान फटकेबाजी सुरु आहे. वेस्ट इंडीजने शंभरी पार केली असून त्यांची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरु आहे. भारताला विकेट्सची गरज आहे.
वेस्ट इंडीज १०५-२
कुलदीप यादवच्या फिरकीने जॉन्सन चार्ल्सची विकेट घेतली. त्याने १४ चेंडूत १२ धावा केल्या. मोठा फटका मारण्याच्या नादात तो पायचीत बाद झाला. अंपायरने त्याला नाबाद दिले होते पण हार्दिक पांड्याने शेवटच्या काही क्षणात डीआरएसचा निर्णय घेतला आणि त्यात तो बाद आहे असे दिसले.
वेस्ट इंडीज ७५-२
प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली. ब्रेंडन किंग आणि काइल मेयर्स ही जोडी समजूतदारपणे खेळत वेस्ट इंडिजने पहिल्या विकेट्ससाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी करत ही भागीदारी तोडली. काइल मेयर्सने २० चेंडूत २२ धावा करत तो अर्शदीप सिंगकरवी झेलबाद झाला.
वेस्ट इंडीज ५५-१
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली असून त्यांचे दोन्ही सलामीवीर हा निर्णय सार्थ ठरवत आहेत. पॉवर प्ले मध्ये एकही विकेट न गमावता त्यांनी चांगली फटकेबाजी केली. भारताला ही भागीदारी तोडण्याची गरज आहे.
वेस्ट इंडीज ३८-०
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने चांगली सुरुवात केली. ब्रेंडन किंग आणि काइल मेयर्स क्रीजवर आहेत. 'पॉवर प्ले'चा पूर्ण फायदा उचलत त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. अजूनही पॉवर प्ले संपायला दोन षटके बाकी आहेत,
वेस्ट इंडीज ३०-०
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर सुरू झाला आहे. वेस्ट इंडीजने सावध सुरुवात केली असून टीम इंडियाला लवकरात त्यांना बाद करण्याची गरज आहे.
वेस्ट इंडीज ९-०
थर्टी यार्ड सर्कल मार्क न केल्याने सामन्याला काही काळ उशीर होत आहे. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानातून पुन्हा ड्रेसिंगरूममध्ये परतले.
भारत: शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.
सामना सुरू होण्यापूर्वी यशस्वी जैस्वालला भारतीय टी२० संघाची कॅप देण्यात आली. आज तो भारतासाठी पहिला टी२० सामना खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यावर यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली आणि पहिल्या डावातच १७१ धावांची शानदार खेळी केली. आता त्याच्याकडून टी२० मध्येही मोठ्या अपेक्षा असतील.
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा संघ बदलाच्या मैदानात उतरला आहे. जखमी जेसन होल्डरच्या जागी रोस्टन चेस हा सामना खेळत आहे. त्याचवेळी भारतीय संघ दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. इशान किशनच्या जागी यशस्वी जैस्वाल आणि रवी बिश्नोईच्या जागी कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.
कर्णधार हार्दिक पांड्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टी२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. पहिल्या दोन सामन्यांमध्ये शुबमन गिलच्या जागी कसोटी मालिकेत अफलातून फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला संधी मिळू शकते. कसोटीबरोबरच त्याने टी२०मध्ये चांगली कामगिरी केली आहे. निर्णायक सामन्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्याकडून संघाला नक्कीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेला कुलदीप यादव तिसऱ्या सामन्यात संघात पुनरागमन करेल. नेटमध्ये सराव करताना कुलदीपला दुखापत झाली आणि अंगठ्याला सूज आल्याने तो दुसरा सामना खेळू शकला नाही. कुलदीप संघात आल्यावर रवी बिश्नोईला बाहेर बसावे लागेल. वेगवान गोलंदाजीत मुकेश कुमारच्या जागी कर्णधार हार्दिक पांड्या उमरान मलिकला आजमावू शकतो.
आजचा सामना मालिकेतील दुसरा सामना जिथे (गयाना) झाला होता तिथेच होणार आहे. त्यामुळे सामन्यतः हवामान हे थोडे ढगाळ असणार आहे. हलक्या पावसाच्या सरी येतील असा वेस्ट इंडीजच्या हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
गयाना येथील याच मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी२० सामना खेळला गेला, जो यजमानांनी दोन गडी राखून जिंकला. फिरकीपटूंना येथे मदत मिळते, कारण या खेळपट्टीवर चेंडू उसळी खूप जास्त घेतो. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करणे येथे थोडे सोपे आहे. हे पाहता नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
टी२०आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात समोरासमोर बोलायचे झाल्यास, दोन्ही संघ आतापर्यंत २७ वेळा भिडले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने १७ सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजने ९ सामने जिंकले आहेत. याशिवाय एका सामन्याचा निकाल नाबाद लागला.
दुसऱ्या टी२० मधील विजयानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने २०१६ नंतर पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी२० मालिका जिंकणार असल्याचे सांगितले होते. आपणास सांगूया की द्विपक्षीय मालिकेत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजने सलग दोन टी२० सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला आहे.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र टीम इंडिया १४५ धावांवर गारद झाली आणि सामना चार फरकाने गमवावा लागला.
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १५२ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजने ८ गडी गमावून १५५ धावा केल्या आणि सात चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. यासह कॅरेबियन संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-०अशी आघाडी घेतली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर सुरू आहे. वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले असून मालिकेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी तिसरा सामना जिंकण्याची त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेत कायम राहण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
India vs West Indies 3rd T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज तिसरी टी २० हायलाइट्स अपडेट्स
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत आठ वेळा टी२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. यादरम्यान टीम इंडियाने सहा मालिका जिंकल्या आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजला केवळ दोन मालिकांमध्ये यश मिळाले. २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचा शेवटचा पराभव झाला होता.