West Indies vs India 5th T20I Highlights Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे संपन्न झाला. ही मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत होती. आजच्या निर्णायक पाचव्या सामन्यात वेस्ट इंडीजने टीम इंडियावर आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत ३-२ने मालिका जिंकली. लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर १६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावा केल्या. त्याचवेळी वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने चार विकेट्स घेतल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी२०मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने ही टी२० मालिकाही ३-२ अशी खिशात घातली आहे. लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १८ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिज संघाने पहिले दोन टी२० जिंकले. यानंतर टीम इंडियाने पुनरागमन करत तिसरा आणि चौथा टी२० जिंकला. मात्र, पाचवी टी२० गमावण्याबरोबरच भारतीय संघाने मालिकाही गमावली. निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी वेस्ट इंडिजसाठी १०७ धावांची भागीदारी करून भारताला सामना आणि मालिका जिंकण्यापासून दूर ठेवले. ब्रँडन किंग ५५ चेंडूत ८५ धावा करून नाबाद राहिला.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालची विकेट गमावली होती. त्याला चार चेंडूत पाच धावा करता आल्या. यानंतर शुबमन गिलही तिसऱ्या षटकात नऊ चेंडूत नऊ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये गेला. अकील हुसेनने दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. १७ धावांत दोन गडी गमावल्यानंतर भारतीय डाव तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रोस्टन चेसने स्वतःच्याच चेंडूवर उत्कृष्ट झेल घेत तोडली. त्याच्याच चेंडूवर त्याने तिलकचा झेल घेतला. तिलक १८ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावा करून बाद झाला.
India vs West Indies 5th T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पाचवा टी२० हायलाइट्स अपडेट्स
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे संपन्न झाला. ही मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत होती. आजच्या निर्णायक पाचव्या सामन्यात वेस्ट इंडीजने टीम इंडियावर आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत ३-२ने मालिका जिंकली.
वेस्ट इंडीज १७१-२
तिलक वर्माच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात निकोलस पूरन ३५ चेंडूत ४७ धावा करून हार्दिक पांड्याकरवी झेलबाद झाला. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट आहे. मात्र, वेस्ट इंडीज अजूनही ड्रायव्हिंग सीटवर आहे. ३६ चेंडूत ४२ धावांची गरज आहे.
वेस्ट इंडीज ११९-२
5TH T20I. WICKET! 13.2: Nicholas Pooran 47(35) ct Hardik Pandya b Tilak Varma, West Indies 119/2 https://t.co/YzoQnY7mft #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
खराब हवामानामुळे १२.३ षटकांचा खेळ थांबवण्यात आला. वेस्ट इंडिजने एक विकेट गमावून ११७ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजला मालिका जिंकणे आणि भारताकडून मालिका गमावण्याचा धोका आहे. ब्रँडन किंगने टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. त्याने एका षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचवेळी निकोलस पूरन ४६ धावा करून नाबाद आहे. वेस्ट इंडिजला ४५ चेंडूत ४९ धावांची गरज आहे.
वेस्ट इंडीज ११७-१
सलामीवीर निर्णायक सामन्यात ब्रँडन किंगने दमदार अर्धशतक केले. त्याने निकोलस पूरनला हाताशी घेत ६७ चेंडूत १०५ धावांची शतकी भागीदारी केली. किंग ३८ चेंडूत ५४ धावांवर खेळत असून पूरन ३२ चेंडूत ४६ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे. विंडीजला ४५ चेंडूत ४९ धावांची गरज आहे.
वेस्ट इंडीज ११७-१
१० षटकात वेस्ट इंडीजने एका विकेटच्या मोबदल्यात शतक पूर्ण केले आहे. भारताला विकेट्सची गरज आहे. ५५ चेंडूत ६० धावांची विंडीजला गरज असल्याने जर पुढील दोन षटकात विकेट पडली नाही तर ही मालिका भारत गमावेल.
वेस्ट इंडीज १०६-१
काइल मेयर्स लवकर बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी अर्धशतकी भागीदारी करत वेस्टइंडिजच्या डावाला चांगला आकार दिला. सध्या निकोलस पूरन २० आणि ब्रँडन किंग २९ धावा करून खेळत आहे. भारताकडून केवळ अर्शदीप सिंगला विकेट घेण्यात यश मिळाले. सामना जिंकण्यासाठी भारताला आणखी विकेट्सची गरज आहे.
वेस्ट इंडीज ६१-१
भारताने ठेवलेल्या १६६ धावांचा पाठलाग करताना काइल मेयर्सच्या रुपात वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसला. त्याला यशस्वी जैस्वालकरवी अर्शदीप सिंगने झेलबाद केले. त्याने ५ चेंडूत १० धावा केल्या.
वेस्ट इंडीज १२-१
आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जात आहे. ही मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत हा निर्णायक सामना जिंकणारा संघ टी२० मालिकेवरही कब्जा करेल. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजसमोर ठेवले १६६ धावांचे आव्हान ठेवले.
भारत १६५-९
Innings Break!
— BCCI (@BCCI) August 13, 2023
Suryakumar Yadav scored a cracking 6⃣1⃣ as #TeamIndia posted 1⃣6⃣5⃣/9⃣ on the board in the T20I series decider!
Over to our bowlers now ? ?
Scorecard ▶️ https://t.co/YzoQnY6OpV#WIvIND pic.twitter.com/W8Hkz3iZC9
भारताने फलंदाजीत आज खराब कामगिरी केली. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे ० आणि १३ धावा करून बाद झाले.
भारत १६१-९
भारताची विकेट्स पडण्याची मालिका सुरूच असून आता अर्शदीप सिंग बाद झाला आहे. त्याने ४ चेंडूत ८ धावा केल्या. त्याला रोमॅरियो शेफर्डने पायचीत केले.
भारत १४९-७
5TH T20I. WICKET! 18.4: Arshdeep Singh 8(4) b Romario Shepherd, India 149/7 https://t.co/YzoQnY7mft #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
टीम इंडियाची एकमेव आशा असणारा सूर्यकुमार यादव बाद झाला आहे. मोक्याची क्षणी त्याची विकेट पडल्याने भारतीय संघ संकटात सापडला आहे. त्याने ४५ चेंडूत ६१ धावा केल्या.
भारत १४०-६
5TH T20I. WICKET! 17.5: Suryakumar Yadav 61(45) lbw Jason Holder, India 140/6 https://t.co/YzoQnY7mft #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
पावसामुळे भारताची लय बिघडल्याने टीम इंडियाला मोठे नुकसान झाले. कर्णधार हार्दिक पांड्या मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने १८ चेंडूत १४ धावा केल्या आणि त्याला रोमॅरियो शेफर्डने जेसन होल्डरकरवी झेलबाद केले.
भारत १३०-५
5TH T20I. WICKET! 16.2: Hardik Pandya 14(18) ct Jason Holder b Romario Shepherd, India 130/5 https://t.co/YzoQnY7mft… #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूत टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १५वे अर्धशतक झळकावले. त्याने अल्झारी जोसेफच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. पावसामुळे 16व्या षटकात खेळ थांबवण्यात आला. १६व्या षटकातील पाच चेंडू टाकले होते. पावसामुळे खेळ थांबला तोपर्यंत भारताने १५.५ षटकांत चार गडी गमावून १२१ धावा केल्या होत्या. सध्या सूर्यकुमार यादवने ३९ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या असून कर्णधार हार्दिक पांड्याने १६ चेंडूंत केवळ ८ धावा केल्या आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये ३३ चेंडूत ३४ धावांची भागीदारी झाली आहे.
एका बाजूने विकेट्स पडत असताना सूर्यकुमार यादवने दुसरी बाजूने त्याने आक्रमक फटकेबाजी करत टीम इंडियाचा डाव सावरला. त्याने झुंजार अर्धशतक केले. सध्या तो ३९ चेंडूत ५३ धावांवर खेळत आहे.
भारत १२०-४
FIFTY for Suryakumar Yadav! ? ?
— BCCI (@BCCI) August 13, 2023
His 1⃣5⃣th T20I half-century ??
Follow the match ▶️ https://t.co/YzoQnY6OpV#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/jsTWj95Eff
भारताचे शतक पूर्ण झाले असून अजूनही टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज आहे. सध्या कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दोघेही शानदार फलंदाजी करत आहेत. त्यामुळे आता भारताला धावगती वाढवण्याची गरज आहे.
भारत ११०-४
संजू सॅमसनला आजच्या सामन्यात हरवलेला फॉर्म परत मिळवण्याची सुवर्ण संधी होती. मात्र, त्याने खराब फटका खेळत आपली विकेट स्वस्तात दिली. रोमॅरियो शेफर्डने संजू सॅमसनला १३ धावांवर निकोलस पूरनकरवी झेलबाद केले.
भारत ८७-४
5TH T20I. WICKET! 10.2: Sanju Samson 13(9) ct Nicholas Pooran b Romario Shepherd, India 87/4 https://t.co/YzoQnY7mft #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात चांगली भागीदारी होत असताना अचानक रोस्टन चेसने त्याला स्वतःच्याच चेंडूवर झेलबाद केले. डाव्या साईडला अफलातून डायव्हिंग करत त्याने झेल घेतला. तिलक वर्माने १८ चेंडूत २७ धावा केल्या.
भारत ६६-३
5TH T20I. WICKET! 7.5: Tilak Varma 27(18) ct & b Roston Chase, India 66/3 https://t.co/YzoQnY7mft #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
भारताला तिसऱ्या षटकात १७ धावांवर दुसरा धक्का बसला. अकील हुसेनने शुबमन गिलला एलबीडब्ल्यू केले. त्याने ९ चेंडूंत ९ धावा केल्या. त्याआधी यशस्वी जैस्वाल ५ धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने भारताचा डाव सावरला आहे. टीम इंडियाने अर्धशतक पूर्ण केले.
भारत ६०-२
टीम इंडियाचे कालच्या सामन्यातील दोन्ही स्टार फायनल सामन्यात तंबूत परतले आहेत. सलामीवीर शुबमन गिलला अकील हुसेनने LBW बाद केले. पण, अंपायर्स कॉल रिव्ह्यूमध्ये मिसिंग स्टंप असे दिसत होते. त्यामुळे जर भारताने रिव्ह्यू घेतला असता तर आता शुबमन गिल क्रीजवर खेळत राहिला असता.
भारत २६-२
It was missing the Stumps – Shubman Gill didn't take the review. pic.twitter.com/gNRVTrG8GU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 13, 2023
चौथ्या सामन्यातील भारताचे दोन्ही सलामीवीर अंतिम सामन्यात तंबूत परतले आहे. अकील हुसेनने त्याच्याच गोलंदाजीवर भारताला दुसरा मोठा धक्का दिला. शुबमन गिलला ९ धावांवर त्याने पायचीत केले.
भारत १७-२
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील निर्णायक पाचव्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल ५ धावा करून बाद झाला. त्याला अकील हुसेनने त्याच्याच गोलंदाजीवर बाद केले.
भारत ६-१
5TH T20I. WICKET! 0.5: Yashasvi Jaiswal 5(4) ct & b Akeal Hosein, India 6/1 https://t.co/YzoQnY7mft #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
वेस्ट इंडिज: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ.
भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार.
A look at #TeamIndia's Playing XI for the decider ?
— BCCI (@BCCI) August 13, 2023
Follow the match – https://t.co/YzoQnY7mft#WIvIND pic.twitter.com/2VeXuzEowS
5TH T20I. India XI: S Gill, Y Jaiswal, T Varma, S Yadav, S Samson(wk), H Pandya(c), A Patel, K Yadav, Y Chahal, A Singh, M Kumar. https://t.co/YzoQnY7mft #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल न करता खेळणार असल्याचे हार्दिकने सांगितले. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने प्लेइंग-११मध्ये दोन बदल केले आहेत. रोस्टन चेस आणि अल्झारी जोसेफ प्लेइंग-११मध्ये परतले आहेत.
? Toss Update ?#TeamIndia win the toss and elect to bat first in the 5th & final T20I ?
— BCCI (@BCCI) August 13, 2023
Follow the match – https://t.co/YzoQnY7mft#WIvIND pic.twitter.com/GAKj29K2jM
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ रविवारी कॅरेबियन संघाविरुद्ध मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी२० सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी करेल. पाकिस्तानच्या या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आतापर्यंत झिम्बाब्वेला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २० वेळा पराभूत केले आहे. त्याचवेळी, मालिकेतील चौथा सामना जिंकल्यानंतर, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२०फॉर्मेटमध्ये १९वा विजय नोंदवला. संघाने पाचवा टी२०सामना जिंकल्यास या विक्रमाची संयुक्तपणे पाकिस्तानची बरोबरी होईल.
वेदरकॉमने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, शनिवारी फ्लोरिडामध्ये कमाल तापमान ३२अंश सेल्सिअस आणि किमान २८अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. अधूनमधून ढगांसह संपूर्ण सामन्यात पावसाची ५०% शक्यता आहे. त्यामुळे जो कोणी फलंदाजी करेल त्यांना याचा फायदा होईल. कारण सामन्याच्या उत्तराधार्त पावसाची शक्यता आहे.
या मैदानावर झालेल्या १५ सामन्यांपैकी केवळ ३ वेळा दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना सामना जिंकला. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६४ आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डावाची सरासरी केवळ १२३ धावांची आहे. अशा परिस्थितीत या मैदानावर नाणेफेक जिंकल्यानंतर संघ प्रथम फलंदाजी करणे पसंत करतात.
लॉडरहिल फ्लोरिडा येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. मैदानाच्या छोट्या सीमारेषेमुळे या मैदानावर फलंदाजांना लांबलचक शॉट्समधून सहज धावा करता येतात. या मैदानावर जसजसा खेळ पुढे जाईल आणि खेळपट्टी जुनी होईल तसतसे चेंडू थांबून बॅटवर आदळतील आणि फिरकी गोलंदाजाला मदत मिळेल. नाणेफेक जिंकणारा संघ या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो.
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल याने या बदलाबाबत आधीच सांगितले होते. याच कारणामुळे वेस्ट इंडिज संघात बदल करण्यात येत असले तरी सलग दोन पराभवानंतर कॅरेबियन संघावर आता मालिका गमावण्याचे दडपण असणार आहे. या सामन्यातही पॉवेल आपल्या संघात बदल करू शकतो. ओडियम स्मिथच्या जागी अल्झारी जोसेफचा संघात समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यात आवेश खान आणि उमरान मलिक यांना संधी देऊ शकला असता, परंतु ही मालिका निर्णायक आहे आणि या विजयासह हार्दिकला त्याच्या नेतृत्वाखाली एकही टी२० मालिका न गमावण्याचा विक्रम कायम ठेवायचा आहे. दडपणाखाली भारतीय संघाने दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून मालिका जिंकून हार्दिकला संपूर्ण संघाचा आत्मविश्वास उंचावायचा आहे.
भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमात नक्कीच बदल होऊ शकतो. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता, पण चौथ्या टी२०मध्ये तिलक वर्माला ऑर्डर खाली पाठवण्यात आली. आता पुन्हा एकदा पाचव्या सामन्यात सूर्या या ठिकाणी फलंदाजीसाठी येऊ शकतो. याशिवाय भारतीय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
Welcome to the live coverage of the 5TH T20I between India and West Indies. https://t.co/YzoQnY7mft #WIvIND

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज टी२० मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटचे दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. मालिका २-२ अशी बरोबरीत असून आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेचा चॅम्पियन असेल.