West Indies vs India 5th T20I Highlights Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे संपन्न झाला. ही मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत होती. आजच्या निर्णायक पाचव्या सामन्यात वेस्ट इंडीजने टीम इंडियावर आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत ३-२ने मालिका जिंकली. लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर १६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावा केल्या. त्याचवेळी वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने चार विकेट्स घेतल्या.
वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी२०मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने ही टी२० मालिकाही ३-२ अशी खिशात घातली आहे. लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १८ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिज संघाने पहिले दोन टी२० जिंकले. यानंतर टीम इंडियाने पुनरागमन करत तिसरा आणि चौथा टी२० जिंकला. मात्र, पाचवी टी२० गमावण्याबरोबरच भारतीय संघाने मालिकाही गमावली. निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी वेस्ट इंडिजसाठी १०७ धावांची भागीदारी करून भारताला सामना आणि मालिका जिंकण्यापासून दूर ठेवले. ब्रँडन किंग ५५ चेंडूत ८५ धावा करून नाबाद राहिला.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालची विकेट गमावली होती. त्याला चार चेंडूत पाच धावा करता आल्या. यानंतर शुबमन गिलही तिसऱ्या षटकात नऊ चेंडूत नऊ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये गेला. अकील हुसेनने दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. १७ धावांत दोन गडी गमावल्यानंतर भारतीय डाव तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रोस्टन चेसने स्वतःच्याच चेंडूवर उत्कृष्ट झेल घेत तोडली. त्याच्याच चेंडूवर त्याने तिलकचा झेल घेतला. तिलक १८ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावा करून बाद झाला.
India vs West Indies 5th T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पाचवा टी२० हायलाइट्स अपडेट्स
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज टी२० मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटचे २ सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. मालिका २-२ अशी बरोबरीत असून आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेचा चॅम्पियन असेल. हा सामना फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क येथे खेळवला जाईल.
Series Decider ? Super Sunday
— BCCI (@BCCI) August 13, 2023
All to play for in Florida as #TeamIndia takes on West Indies for the 5th & Final T20I ?#WIvIND pic.twitter.com/RpGSxa6EN3
India vs West Indies 5th T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पाचवा टी२० हायलाइट्स अपडेट्स
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज टी२० मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटचे दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. मालिका २-२ अशी बरोबरीत असून आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेचा चॅम्पियन असेल.