West Indies vs India 4th T20I Highlights Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी२० मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळला गेला. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांनी २० षटकांत आठ गडी गमावून १७८ धावा केल्या. भारताने १७९ धावांचे लक्ष्य सहज गाठले. त्याने १७ षटकांत एका विकेटवर १७९ धावा केल्या. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत आता २-२ अशी बरोबरी झाली आहे. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९३ चेंडूत १६५ धावांची भागीदारी झाली. सलामीवीर शुबमन गिल ४७ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने तीन चौकार आणि पाच षटकार मारले.

वेस्ट इंडिजने २० षटकांत ८ गडी गमावून १७८ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३९ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय (२९ चेंडूत ४५) शाई होपची बॅट चालली नाही. हे दोघे वगळता वेस्ट इंडिजच्या एकाही खेळाडूला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून अर्शदीप सिंगने ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याने शेवटच्या षटकात १७ धावा लुटल्या. कुलदीप यादवने दोन तर युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारतासमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्याने २० षटकांत आठ गडी बाद १७८ धावा केल्या. यजमानांकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक ६१ धावा केल्या. शाई होपने ४५ धावांची खेळी केली. ब्रेंडन किंगने १८, काइल मेयर्सने १७ आणि ओडेन स्मिथने नाबाद १५ धावांचे योगदान दिले. कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांना प्रत्येकी एकच धाव करता आली. रोमारियो शेफर्डने ९ आणि जेसन होल्डरने ३ धावा केल्या. अकील हुसेन ५ धावा करून नाबाद राहिला.

भारताकडून या सामन्यात अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. अर्शदीपने तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर काइल मेयर्स आणि ब्रेंडन किंग तसेच शिमरॉन हेटमायर यांना बाद केले. कुलदीप यादवने निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल या दोन धोकादायक फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवताना मधल्या फळीचा कहर केला. अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमानांनी २० षटकांत आठ गडी गमावून १७८ धावा केल्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी १७९ धावांचे मोठे लक्ष्य गाठावे लागणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता चौथा आणि पाचवा टी२० मालिकेत १-२ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी करा किंवा मरो असा असेल. वेस्ट इंडिजने पहिला टी२० सामना ४ धावांनी आणि दुसरा टी२० सामन्यात २ गडी राखून जिंकला. पण टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत तिसऱ्या टी२०मध्ये वेस्ट इंडिज संघाचा ७ गडी राखून पराभव करत मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.

Live Updates

India vs West Indies 4th T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज चौथा टी२० हायलाइट्स अपडेट्स

23:24 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: भारताचा वेस्ट इंडिजवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. चौथ्या सामन्यात शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

भारत १७९-१

https://twitter.com/BCCI/status/1690421061417078784?s=20

23:16 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: भारताला पहिला धक्का, शुबमन गिल बाद

भारतीय सलामीवीरांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना अक्षरशः धुतले, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. यशस्वी आणि शुबमन यांच्यात १६५ धावांची विक्रमी भागीदारी केली. शुबमन गिलने ४७ चेंडूत ७७ धावा करून तो बाद झाला आहे. अखेर विंडीजच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आले असले मात्र, भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

भारत १६५-१

https://twitter.com/BCCI/status/1690418797881294848?s=20

23:02 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी शानदार खेळी

भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल शानदार फलंदाजी करत आहेत. पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करण्याबरोबरच दोन्ही खेळाडूंनी आपापली अर्धशतकेही पूर्ण केली. या दोन्ही फलंदाजांनी विक्रमी भागीदारी करत अनेक विक्रम मोडले. भारताला ३९ चेंडूत ३८ धावांची गरज असून हातात १० विकेट्स बाकी आहेत.

भारत १४१-०

https://twitter.com/BCCI/status/1690415000802754562?s=20

22:50 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: शुबमन गिल-यशस्वी जैस्वालची अर्धशतके

यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण करत नवा इतिहास रचला आहे. यादरम्यान दोघांनी मिळून १२ चौकार आणि तीन षटकार मारले. यशस्वी आणि शुबमन यांनी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथमच शतकी भागीदारी केली आहे. शुबमन गिल ३२ चेंडूत ५२ धावा करून यशस्वी जैस्वाल ३५ चेंडूत नाबाद ५४ धावा करत आहेत. दोघांनीही आपापली अर्धशतकं केली आहेत.

भारत ११७-०

https://twitter.com/BCCI/status/1690410185947566080?s=20

22:19 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: पहिल्या पॉवरप्ले मध्ये भारताची दमदार सुरुवात

पहिल्या पाच षटकातच टीम इंडियाचे अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान या सलामी अर्धशतकी भागीदारीमध्ये यशस्वी जैस्वालने ३४ धावा केल्या ज्यात ७ चौकारांचा समावेश आहे. तर शुबमन गिलने ३० धावा केल्या ज्यात ३ उत्तुंग षटकारांचा आणि एका चौकाराचा समावेश आहे. दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः विंडीज गोलंदाजांना धुतले.

भारत ६६-०

22:10 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: टीम इंडियाची 'यशस्वी' सुरुवात

वेस्ट इंडीजने ठेवलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. यशस्वी जैस्वालची आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळाली. शुबमन गिलने देखील त्याला चांगली साथ दिली. त्यांनी विंडीजच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल चढवला.

भारत ३७-०

21:46 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: भारतासमोर विंडीजने ठेवले १७९ धावांचे लक्ष्य

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी२० मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमानांनी २० षटकांत आठ गडी गमावून १७८ धावा केल्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी १७९ धावांचे मोठे लक्ष्य गाठावे लागणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1690396579839287296?s=20

21:38 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडीजला आठवा धक्का, शिमरॉन हेटमायर बाद

शिमरॉन हेटमायरने वेस्ट इंडीजची एक बाजू सांभाळून धरत झुंझार अर्धशतक केले. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर विंडीजने १७० चा आकडा पार केला. हेटमायर ३९ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. तिलक वर्माने डायव्हिंग करत शानदार झेल घेतला.

वेस्ट इंडीज १६७-८

https://twitter.com/BCCI/status/1690394532826021888?s=20

21:28 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: शिमरॉन हेटमायरचे झुंझार अर्धशतक

एका बाजूने लागोपाठ विकेट्स पडत असताना डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायरने झुंझार अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने दीडशेपार धावसंख्या केली आहे.

वेस्ट इंडीज १५६-७

21:13 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडीजला सातवा धक्का, जेसन होल्डर बाद

वेस्ट इंडीजची विकेट्स पडण्याची मालिका सुरूच असून आता जेसन होल्डर बाद झाला आहे. त्याला मुकेश कुमारने त्रिफळाचीत केले. त्याने अवघ्या तीन धावा केल्या.

वेस्ट इंडीज १२३-७

https://twitter.com/BCCI/status/1690388378829852672?s=20

21:09 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडीजला सहावा धक्का, रोमॅरियो शेफर्ड बाद

शाई होप पाठोपाठ रोमॅरियो शेफर्ड देखील बाद झाला. त्याला अक्षर पटेलने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. त्याने केवळ ९ धावा केल्या.

वेस्ट इंडीज ११८-६

https://twitter.com/BCCI/status/1690387123642548225?s=20

21:01 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडीजला पाचवा धक्का, शाई होप बाद

एका बाजूने विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूने तंबू ठोकून उभा असणारा भारतीय विजयातील महत्त्वाचा अडथला शाई होप बाद झाला आहे. युजवेंद्र चहलच्या फिरकीसमोर मोठा फटका मारण्याच्या नादात तो अक्षर पटेलकरवी झेलबाद झाला. त्याने २९ चेंडूत ४५ धावा केल्या.

वेस्ट इंडीज १०६-५

https://twitter.com/BCCI/status/1690384516677091328?s=20

20:54 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: होप-हेटमायरने सावरला डाव

लागोपाठ विकेट्स पडल्यानंतर शाई होप आणि शिमरॉन हेटमायरने डाव सावरला. वेस्ट इंडीजने शतक पूर्ण केले असून भारताला विकेट्सची गरज आहे.

वेस्ट इंडीज १०३-४

20:49 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: शाई होपची चौकार-षटकारांची आतिषबाजी

चार विकेट्स गमावल्यानंतर वेस्ट-इंडिजचा डाव सावरला. शाई होप-हेटमायर जोडीने चहलच्या एकाच षटकात १४ धावा कुटल्या.

वेस्ट इंडीज ८८-४

20:34 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडीजला चौथा धक्का, रोव्हमन पॉवेल बाद

कुलदीप यादवच्या फिरकीसमोर कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन निष्प्रभ ठरले. पॉवेल केवळ १ धाव करून शुबमन गिलकरवी स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला.

वेस्ट इंडीज ६०-४

https://twitter.com/BCCI/status/1690378525029834752?s=20

20:29 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडीजला मोठा धक्का, निकोलस पूरन बाद

चांगल्या सुरुवातीनंतर वेस्ट इंडीजला दोन मोठे धक्के बसले. ब्रेंडननंतर निकोलस बाद झाला. या मालिकेत वेगवान फलंदाजी करणारा निकोलस पूरन या सामन्यात अपयशी ठरला. त्याला केवळ एक धाव करता आली. सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.

वेस्ट इंडीज ५५-३

20:25 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडीजला दुसरा धक्का, ब्रेंडन किंग बाद

अर्शदीप सिंगची शानदार गोलंदाजी आणि कुलदीप यादवचा अफलातून झेल यामुळे वेस्ट इंडीजला दुसरा धक्का बसला आहे. ब्रेंडन किंगने १८ धावा केल्या.

वेस्ट इंडीज ५४-२

https://twitter.com/BCCI/status/1690375663004631040?s=20

20:22 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: पॉवर प्ले मध्ये वेस्ट इंडीजचे अर्धशतक पूर्ण

काइल मेयर्सने वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून दिली. त्याने सहा चेंडूंत १७ धावा करून भारतीय गोलंदाजांना दडपणाखाली आणले, पण अर्शदीपने त्याला फार काळ टिकू दिले नाही. त्यानंतर ब्रेंडन किंग-शाई होपची शानदार फलंदाजीने वेस्ट इंडीजचे अर्धशतक पूर्ण झाले आहे.

वेस्ट इंडीज ५४-०

20:12 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडीजला पहिला धक्का, धोकादायक काइल मेयर्स बाद

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथा टी२० सामना सुरु असून त्यात वेस्ट इंडीजला पहिला धक्का बसला आहे. धोकादायक काइल मेयर्सला अर्शदीप सिंगने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. त्याने केवळ १७ धावा केल्या.

वेस्ट इंडीज १९-१

https://twitter.com/BCCI/status/1690372051629199360?s=20

20:07 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडिजची डावाची सुरुवात

वेस्ट इंडिजचा डाव सुरू झाला आहे. ब्रेंडन किंग काइल मेयर्ससोबत सलामीसाठी क्रीझवर आला आहे. वेस्ट इंडिजला मेयर्स आणि किंगकडून स्फोटक सुरुवात अपेक्षित आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली.

वेस्ट इंडीज १४-०

19:44 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: दोन्ही संघांची प्लेईंग ११

भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडेन स्मिथ, अकिल हुसेन, ओबेद मॅककॉय.

https://twitter.com/BCCI/status/1690365715734523904?s=20

https://twitter.com/BCCI/status/1690363950612037632?s=20

19:38 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

वेस्ट इंडीजचा कर्णधार रोव्हामन पॉवेलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने मागील विजयी संघात कुठलाही बदल केला नाही. वेस्ट इंडीजने त्यांच्या संघात तीन बदल केले. जेसन होल्डर, ओडियन स्मिथ आणि शे होप यांना संघात स्थान मिळाले आहे. जॉन्सन चार्ल्सला वगळण्यात आले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1690363597715865600?s=20

19:21 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: फ्लोरिडा येथील मैदानाची सरासरी धावसंख्या किती आहे?

फ्लोरिडामध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६४ धावांची आहे तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या फक्त १२३ धावांची आहे. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या १३ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ११ वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ दोनच सामने जिंकण्यात यश आले आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही कर्णधारांपैकी जोही नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी करू शकतो.

19:20 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: आजच्या सामन्यात पावसाची शक्यता किती आहे? जाणून घ्या...

फ्लोरिडाचे शनिवारी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. तसेच ६७ टक्के आर्द्रता राहण्याची शक्यता आहे. तसेच ताशी १८ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच २० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर टीम इंडियाला ही मालिका पुन्हा जिंकता येणार नाही. पाचवी टी२० जिंकली तरी मालिका २-२ अशी बरोबरीत राहील.

19:19 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: फ्लोरिडामधील खेळपट्टी काय रंग दाखवणार आजच्या सामन्यात? जाणून घ्या...

लॉडरहिल, फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सांगायचे तर, सुरुवातीच्या काळात फलंदाजांना अधिक मदत मिळते. पण जसजसा सामना पुढे सरकत जातो तसतशी खेळपट्ट्या संथ होत जातात. अशा स्थितीत फलंदाजांना नंतर धावा करण्यात अडचणी येतात. खेळपट्टीचा संथपणाही फिरकीपटूंना मदत करतो. त्यामुळे जो कोण नाणेफेक जिंकेल तो आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.

19:15 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: जैस्वाल की किशन, कोणाला मिळणार संधी?

जैस्वालला अनुभव कमी आहे पण तो टी२० मध्ये किती धोकादायक ठरू शकतो हे त्याने आयपीएलमध्ये दाखवून दिले आहे. कसोटीत त्याने पहिल्याच डावात शानदार शतक झळकावले. फ्लोरिडाच्या खेळपट्टीवर मोठे फटके मारणे सोपे आहे. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक त्याला आणखी एक संधी देऊ शकतो.

19:14 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: २०१६ पासून वेस्ट इंडिजने फ्लोरिडामध्ये एकही सामना जिंकलेला नाही

लॉडरहिलच्या या स्टेडियमबद्दल सांगायचे तर, गेल्या काही वर्षांपासून येथे वेस्ट इंडिजची कामगिरी फारशी चांगली नाही. दुसरीकडे, भारतीय संघाने येथे अप्रतिम खेळ केला आहे. वेस्ट इंडिजने शेवटचा २०१६ साली फ्लोरिडा येथील या मैदानावर टी२० सामना जिंकला होता. त्यानंतर संघाला येथे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कॅरेबियन संघाने या मैदानावर एकूण १० सामने खेळले आहेत, ज्यात तीन सामने जिंकताना सहा सामने गमावले आहेत. येथे पावसामुळे सामना वाया गेला.

19:12 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडिज संघात होऊ शकतो बदल

वेस्ट इंडिजबद्दल बोलायचे झाले तर जॉन्सन चार्ल्स सातत्याने अपयशी ठरला आहे. त्याच्या जागी शाई होपची निवड होऊ शकते, जो एक उत्तम फलंदाज आहे आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजच्या एकमेव विजयाचा नायक होता. याशिवाय वेस्ट इंडिज संघात अन्य कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, कॅरेबियन कर्णधार रोव्हमन पॉवेलने भारतीयांना मागे टाकण्यासाठी रणनीतीत बदल केल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत ओशाने थॉमसला संधी दिली जाऊ शकते.

19:10 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: काय सांगते भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील आकडेवारी?

भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये २८ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारताने १८ सामने जिंकले आहेत, ९ गमावले आहेत आणि एक सामना बरोबरीत संपला आहे. उभय संघांमध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर १० टी२० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ५ भारताने जिंकले आहेत तर वेस्ट इंडिजने ५ सामने जिंकले आहेत.

19:08 (IST) 12 Aug 2023
IND vs WI: वेस्ट इंडिजने २०१६ पासून फ्लोरिडामध्ये जिंकलेले नाही

विंडीज संघाने फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या १० टी२० सामन्यांपैकी ६ गमावले आहेत, तर फक्त ३ सामने जिंकले आहेत, एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये भारताला १ धावाने पराभूत केल्यानंतर वेस्ट इंडिजने फ्लोरिडामध्ये त्यांचे शेवटचे सहा टी२० सामने गमावले आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1689492854392172544?s=20

India vs West Indies 4th T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज चौथा टी२० हायलाइट्स अपडेट्स

भारताने शनिवारी (१२ ऑगस्ट) पाच टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.