भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात, आपलं पहिलं वहिलं शतक झळकावलं आहे. ५ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने नाबाद १०० धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात विराट कोहली माघारी परतल्यानंतर, जाडेजाने तळातल्या फलंदाजांना सोबतीला घेऊन शतकी खेळी केली. रविंद्र जाडेजाचं शतक झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाचा पहिला डाव घोषित केला.
पहिल्या सत्रात ऋषभ पंत माघारी परतल्यानंतर रविंद्र जाडेजा मैदानात आला. यावेळी खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर जाडेजाने आपल्या नेहमीच्या शैलीत दाणपट्टा चालवण्यास सुरुवात केली. प्रत्येक वेस्ट इंडिज गोलंदाजांचा जाडेजाने समाचार घेतला. या खेळीनंतर सर्वच स्तरातून जाडेजाचं कौतुक करण्यात येतंय.
राजपूत का राजकोट में राज….क्या तलवारबाज़ी
1st Test hundred for Sir Jadeja #IndvWI— Aakash Chopra (@cricketaakash) October 5, 2018
And, here comes the maiden Test for @imjadeja, followed by the declaration by the Indian Captain.#TeamIndia 649/9d
Live – https://t.co/RfrOR7MGDV @Paytm #INDvWI pic.twitter.com/iaanoBmcp4
— BCCI (@BCCI) October 5, 2018