भारत-वेस्ट इंडिज संघ ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. या मालिकेत संघाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. रोहितलाही एका मोठ्या पराक्रमाची सुवर्णसंधी मिळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. कोहलीने आतापर्यंत ३८ डावात २२३५ धावा केल्या आहेत. कोहलीने या संघाविरुद्ध ९ शतके झळकावली आहेत. कोहली कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजविरुद्ध ३९ डावात १५७३ धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने २००९ पासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३३ सामन्यांत १५२३ धावा केल्या आहेत. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध १६२ धावांची इनिंग खेळली होती. त्याने विंडीजविरुद्ध ३ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत रोहितने या मालिकेत ५१ धावा केल्या, तर तो सचिन तेंडुलकरला मागे टाकेल.

हेही वाचा – राफेल फायर है फायर..! सचिन, सेहवागसह क्रिकेटविश्वानं ‘नदाल’ला ठोकला सलाम; पाहा त्यांचे ट्वीट!

याशिवाय ६ फेब्रुवारीला होणारा सामना हा भारताचा १०००वा एकदिवसीय सामना असेल. भारत असा पराक्रम करणारा जगातील पहिला संघ ठरणार आहे. त्यामुळे संघाचा कप्तान म्हणूनही रोहितचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. भारताने पहिला वनडे सामना १९७४ मध्ये खेळला होता. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता.