कसोटी मालिकेत विंडीजवर मात केल्यानंतर, भारताने वन-डे मालिकेतही मोठ्या धडाक्यात विजयी सुरुवात केली आहे. गुवाहटी वन-डे सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विंडीजने दिलेलं 323 धावांचं आव्हान भारताने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर सहज पू्र्ण केलं. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने दोन्ही फलंदाजांच्या खेळाचं कौतुक केलं आहे.
“रोहित आणि विराट एकदा खेळपट्टीवर स्थिरावले झाले की त्यांना बाद करणं कठीण असतं. जम बसल्यानंतर ते मैदानावर फारसा धोका पत्करत नाहीत, परिस्थितीनुरुप खेळण्याकडे त्यांचा कल असतो. रोहित आणि विराट गरजेनुसार मैदानी फटके खेळतात तर संधी मिळाल्यानंतर तोच चेंडू हवेत मारायला मागेपुढे पाहत नाही. अशा फलंदाजांना बाद करणं कठीण होऊन असतं.” रविंद्र जाडेजा पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
अवश्य वाचा – Ind vs WI : रोहित फॉर्मात असताना धावांचा पाठलाग करणं सोपं जातं – विराट कोहली
रविंद्र जाडेजाने गोलंदाजीत आपली कमाल दाखवत 66 धावांमध्ये 2 फलंदाजांना माघारी धाडलं. खेळपट्टी ही फलंदाजांसाठी उपयुक्त होती, चेंडू बॅटवर सहज येत होते, त्यामुळे दोन्ही संघांतील फलंदाजांना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. दुसऱ्या डावात शिखर धवन लवकर माघारी परतला, मात्र यानंतर रोहित आणि विराटच्या भागीदारीमुळे भारताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अवश्य वाचा – Ind vs WI : पहिल्या वन-डे सामन्यात झालेले हे 13 विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?