IND vs ZIM 1st T20 Highlights : पहिल्या टी-२० रोमहर्षक सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा १३ धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाच्या ८ फलंदाजांना धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठता आला नाही. झिम्बाब्वेने प्रथम फलंदादजी करताना ११६ धावांचे लक्ष्य दिले होते. पण भारत जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आला, तेव्हा अर्ध्याहून अधिक संघ ५० धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. एकवेळ भारताची धावसंख्या ६ विकेटवर ४७ धावा होती. यानंतर आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरच्या २३ धावांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भागीदारीने टीम इंडियाच्या आशा उंचावल्या. मात्र, झिम्बाब्वेचा संघ वेगळ्याच मूडमध्ये दिसला. कर्णधार सिकंदर रझाने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेत भारतीय संघाला १०२ धावांवर गारद केले.
IND vs ZIM 1st T20 Highlights Cricket Score : हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर आतापर्यंत एकूण ५० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३० वेळा तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने २० वेळा विजय मिळवला आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने टी-२० विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा १३ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यातील पराभवामुळे टीम इंडिया या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडली आहे. २०२४ मधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचा हा पहिला पराभव होता. यापूर्वी भारताने सर्व मालिका आणि विश्वचषकातील सामने जिंकले होते. आता झिम्बाब्वेने भारताची सलग १२ सामन्यांची विजयी मालिका खंडीत केली आहे.
https://twitter.com/BCCI/status/1809598779533775309
टीम इंडियाला शेवटच्या षटकात झिम्बाब्वेविरुद्ध विजयासाठी ६ चेंडूत १६ धावांची गरज होती. भारताच्या ९ विकेट्सही पडल्या होत्या, पण वॉशिंग्टन सुंदर एका टोकाकडून फलंदाजी करत होता. तेव्हा भारत हा सामना जिंकू शकेल, अशी आशा निर्माण झाली होती. पण वॉशिंग्टनने सर्वांची निराशा केली आणि शेवटच्या षटकात केवळ दोन धावा काढता आल्या. यासह भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या इतिहासातील फक्त दुसरा टी-२० सामना गमावला.
टीम इंडियाला विजयासाठी 18 धावांची गरज
भारताला विजयासाठी 12 चेंडूत 18 धावांची गरज आहे. त्याने 18 षटकांत 9 गडी गमावून 98 धावा केल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर 24 धावा करून खेळत आहे. खलील अहमदला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
भारताला 9वा धक्का, मुकेश बाद
टीम इंडिया ऑलआऊटच्या जवळपास पोहोचली आहे. भारताची नववी विकेट मुकेश कुमारच्या रूपाने पडली. त्याला खातेही उघडता आले नाही. मुकेशची विकेट सिकंदर रझाने मिळवून दिली. टीम इंडियाने 17 षटकांत 9 गडी गमावून 86 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाला आठवा धक्का, आवेश खान बाद
टीम इंडियाला आठवा धक्का बसला आहे. आवेश खान 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. भारताने 16 षटकांत 8 गडी गमावून 84 धावा केल्या आहेत. त्याला विजयासाठी 24 चेंडूत 32 धावांची गरज आहे.
14 षटकानंतर भारताची धावसंख्या 69 धावा
भारताने 14 षटकांत 7 गडी गमावून 69 धावा केल्या आहेत. सुंदर 10 चेंडूत 7 धावा करून खेळत आहे. आवेश खान 5 चेंडूत 6 धावा करून खेळत आहे.
टीम इंडियाला सातवा धक्का, बिश्नोई बाद
टीम इंडियाची सातवी विकेट रवी बिश्नोईच्या रूपाने पडली. 8 चेंडूत 9 धावा करून तो बाद झाला. भारताने 13 षटकांत 7 गडी गमावून 61 धावा केल्या. ही स्पर्धा जवळपास झिम्बाब्वेकडे गेली आहे. येथून जिंकणे भारतासाठी खूप कठीण आहे.
https://twitter.com/beinggtweetyy/status/1809587228282351729
टीम इंडियाची सहावी विकेट पडली. कर्णधार शुबमन गिल 29 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याला सिकंदर रझाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
टीम इंडियाला पाचवा धक्का, ध्रुव जुरेल बाद
भारतीय संघाची पाचवी विकेट पडली. ध्रुव जुरेल 14 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. त्याने चौकार मारला. ध्रुवला लूक जोंगवे यानी बाद केले. भारतीय संघाला येथूव विजय मिळवणे खूप कठीण असेल.
गिल-जुरेलने सावरला टीम इंडियाचा डाव
टीम इंडियाला विजयासाठी 78 चेंडूत 88 धावांची गरज आहे. संघाने 7 षटकात 4 गडी गमावून 28 धावा केल्या आहेत. शुबमन गिल 18 चेंडूत 19 धावा करून खेळत आहे. ध्रुव जुरेलला अद्याप खातेही उघडता आलेले नाही.
https://twitter.com/imDkmeenadausa/status/1809582622449766829
भारताने 6 षटकात 28 धावा केल्या
टीम इंडियाने 6 षटकात 4 गडी गमावून 28 धावा केल्या. शुबमन गिल 18 चेंडूत 19 धावा करून खेळत आहे. ध्रुव जुरेलला अद्याप खातेही उघडता आलेले नाही.
झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी भारतावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. टीम इंडियाची चौथी विकेट रिंकू सिंगच्या रूपाने पडली. रिंकूला खातेही उघडता आले नाही. भारताने 5 षटकात 4 गडी गमावून 22 धावा केल्या आहेत. शुबमन गिल 13 धावा करून खेळत आहे. ध्रुव जुरेलला अद्याप खातेही उघडता आलेले नाही.
https://twitter.com/Ajay_Sharma_04/status/1809577963211685974
रियान पराग दोन धावा करून बाद
पदार्पणाच्या सामन्यात रियान पराग अवघ्या दोन धावा करून बाद झाला. त्याला चताराने बाद केले. रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. शुबमन गिल त्याला साथ देण्यासाठी उपस्थित आहेत.
भारताला दुसरा धक्का बसला
भारताला दुसरा धक्का 15 धावांवर बसला. रुतुराज गायकवाडला मुजारबानीने कायच्या हाती झेलबाद केले. त्याला केवळ सात धावा करता आल्या. रियान पराग चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी शुबमन गिल क्रीजवर उपस्थित आहे.
वेगवान गोलंदाज तेंडाई चतारा तिसऱ्या षटकात गोलंदाजी करायला आला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड धावबाद होण्यापासून वाचला. गायकवाडने शानदार कव्हर ड्राईव्हच्या रूपात पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला. या षटकात एकूण 8 धावा आल्या. गायकवाडने 7 तर शुभमन गिलने 5 धावा केल्या आहेत.
पदार्पणात अभिषेक शर्माचे खाते उघडले नाही
भारताकडून शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी सलामी दिली. झिम्बाब्वेसाठी स्पिनर ब्रायन बेनेट पहिले षटक टाकण्यासाठी आला. अभिषेक शर्मा पदार्पणाच्या सामन्यात शून्य धावांवर बाद झाला आहे.
https://twitter.com/Maxviegas0512/status/1809573171521311012
झिम्बाब्वेने भारताला विजयासाठी 116 धावांचे लक्ष्य दिले होते. यष्टीरक्षक फलंदाज क्लाइव्हने संघासाठी नाबाद 29 धावा केल्या. त्याने 25 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार मारले. वेस्लीने २१ धावांचे योगदान दिले. बेनेट 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मेयर्सनेही 23 धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझा 17 धावा करून बाद झाला.
https://twitter.com/TeamIndia4444/status/1809570666825544125
भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. रवी बिश्नोईने 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 बळी घेतले. त्याने 2 मेडन षटकेही टाकली. वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले. त्याने 4 षटकात 11 धावा दिल्या. मुकेश कुमार आणि आवेश खान यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.
झिम्बाब्वेने 19 षटकांत 103 धावा केल्या
झिम्बाब्वेने 19 षटकांत 9 गडी गमावून 103 धावा केल्या आहेत. चतारा यांना अजूनही खाते उघडता आलेले नाही. क्लाय १७ धावा करून खेळत आहे.
झिम्बाब्वेने 18 षटकानंतर 98 धावा केल्या
झिम्बाब्वेने 18 षटकांत 9 गडी गमावून 98 धावा केल्या आहेत. 14 चेंडूत 12 धावा केल्यानंतर क्लाईव्ह खेळत आहे. चतारा यांना अजूनही खाते उघडता आलेले नाही. त्याने 8 चेंडू खेळले आहेत.
झिम्बाब्वेने 16 षटकानंतर केल्या 90 धावा
झिम्बाब्वेने 16 षटकांत 9 गडी गमावून 90 धावा केल्या. क्लाइव्ह 7 चेंडूत 4 धावा केल्यानंतर खेळत आहे. तेंडाई चतारा यांना अद्याप खाते उघडता आलेले नाही. भारताकडून रवी बिश्नोईने शानदार गोलंदाजी करताना 4 बळी घेतले.
झिम्बाब्वेला 9वा धक्का, ब्लेसिंग शून्यावर आऊट
झिम्बाब्वेची नववी विकेट पडली. ब्लेसिंग मुझाराबानी शून्यावर बाद झाला. त्याला रवी बिश्नोई यांनी बढती दिली. झिम्बाब्वेने 15.3 षटकात 90 धावा केल्या. संघाने 9 विकेट गमावल्या आहेत.
https://twitter.com/CricWatcher11/status/1809564499197706623
झिम्बाब्वेला आठवा धक्का बसला, ल्यूक 1 धावा करून बाद.
झिम्बाब्वेची आठवी विकेट पडली. ल्यूक जोंगवे अवघ्या 1 धावा करून बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने एलबीडब्ल्यू आऊट केले. झिम्बाब्वेने 15.1 षटकात 8 गडी गमावून 90 धावा केल्या.
सुंदरने झिम्बाब्वेला सलग दोन धक्के दिले, मेयर्सनंतर मस्कादझाला बाद
वॉशिंग्टन सुंदरने भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे. त्याने मेयर्सला बाद केले. मेयर्स 22 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. पुढच्याच चेंडूवर सुंदरने वेलिंग्टन मस्कद्झाला बाद केले. मस्कादझाला खातेही उघडता आले नाही. अशाप्रकारे झिम्बाब्वेची सातवी विकेट पडली. संघाने 89 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेला पाचवा धक्का, जोनाथन बाद
टीम इंडियाला लागोपाठ दोन विकेट्स मिळाल्या आहेत. अलेक्झांडरनंतर जोनाथन कॅम्पबेल बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. जोनाथन धावबाद झाला. आता झिम्बाब्वेने 12 षटकांत 5 गडी गमावून 74 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेला मोठा धक्का, सिकंदर रझा बाद
आवेश खानने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा 19 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. त्याने 1 चौकार आणि 1 षटकार मारला. झिम्बाब्वेने 4 गडी गमावून 74 धावा केल्या आहेत.
रवी बिश्नोईने भारताला आणखी एक विकेट मिळवून दिली आहे. त्याने वेस्लीला बाद केले आहे. वेस्ली 22 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. अशात झिम्बाब्वेची तिसरी विकेट पडली. संघाने 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. झिम्बाब्वेने 8 षटकात 3 गडी गमावून 52 धावा केल्या आहेत.
https://twitter.com/Khelnowcricket/status/1809555162458911091
झिम्बाब्वेने 6 षटकांत 40 धावा केल्या
झिम्बाब्वेने 6 षटकांत 2 गडी गमावून 40 धावा केल्या आहेत. कर्णधार सिकंदर रझा अद्याप खाते उघडू शकलेला नाही. वेस्ली 15 चेंडूत 17 धावा केल्यानंतर खेळत आहे. त्याने 3 चौकार मारले आहेत.
झिम्बाब्वेला दुसरा धक्का बसला
झिम्बाब्वेला दुसरा धक्का ४० धावांवर बसला. रवी बिश्नोईने ब्रायन बेनेटला बोल्ड केले. ब्रायन 15 चेंडूत 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार सिकंदर रझा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
पाचवे षटक महागडे ठरले.
पाचवे षटक टीम इंडियाला महागात पडले. या षटकात झिम्बाब्वेने १७ धावा केल्या. वेस्ली 17 धावा करून खेळत आहे. वेनेट 23 धावा करून खेळत आहे. खलील अहमदच्या या षटकात दोघांनी प्रत्येकी दोन चौकार मारले.
झिम्बाब्वेने 5 षटकात 1 गडी गमावून 40 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेकडून बेनेट आणि वेस्ली फलंदाजी करत आहेत. ते दोघेही डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. संघाने 4 षटकात 1 गडी गमावून 23 धावा केल्या आहेत. खलील आणि मुकेश यांनी भारतासाठी 2-2 षटके टाकली आहेत. खलीलने 11 धावा दिल्या आहेत. मुकेशने 1 बळी घेत 12 धावा दिल्या आहेत.
भारतासाठी खलीलने तिसरे षटक टाकले. त्याने फक्त 5 धावा दिल्या. झिम्बाब्वेने 3 षटकात 19 धावा केल्या आहेत. बेनेट 12 धावा करून खेळत आहे. त्याने 8 चेंडूंचा सामना केला आहे. वेस्ली 7 धावा करून खेळत आहे.