IND vs ZIM 1st T20 Highlights : पहिल्या टी-२० रोमहर्षक सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा १३ धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाच्या ८ फलंदाजांना धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठता आला नाही. झिम्बाब्वेने प्रथम फलंदादजी करताना ११६ धावांचे लक्ष्य दिले होते. पण भारत जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आला, तेव्हा अर्ध्याहून अधिक संघ ५० धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. एकवेळ भारताची धावसंख्या ६ विकेटवर ४७ धावा होती. यानंतर आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरच्या २३ धावांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भागीदारीने टीम इंडियाच्या आशा उंचावल्या. मात्र, झिम्बाब्वेचा संघ वेगळ्याच मूडमध्ये दिसला. कर्णधार सिकंदर रझाने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेत भारतीय संघाला १०२ धावांवर गारद केले.
IND vs ZIM 1st T20 Highlights Cricket Score : हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर आतापर्यंत एकूण ५० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३० वेळा तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने २० वेळा विजय मिळवला आहे.
मुकेश कुमारने येताच भारताला विकेट मिळवून दिल्या आहेत. त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर इनोसंट का याला बाद केले. इनोसंट बोल्ड झाला. अशात झिम्बाब्वेची पहिली विकेट पडली.
Mukesh Kumar strike for Team India in his first ball of the over
— Ahmed Says (@AhmedGT_) July 6, 2024
– Zimbabwe 6/1 in 1.1 Over#INDvsZIM #ZIMvIND pic.twitter.com/iPofE6voWQ
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून चमकदार कामगिरी करणारा पंजाबचा अभिषेक शर्मा आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा आसामचा रियान पराग आणि ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी मिळाली आहे.
Go well Boys !! ???
— Riddler (@riddlerxcric) July 6, 2024
Congratulations .. #INDvsZIM pic.twitter.com/uWBckPhjnu
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार शुभमन गिलने सांगितले की, तीन खेळाडू पदार्पण करतील. अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
1ST T20I. India won the toss and Elected to Field. https://t.co/r08h7yglxm #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 6, 2024