IND vs ZIM Highlights: भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा २५ धावांनी पराभव केला. कर्णधार शुभमन गिलच्या (६६) अर्धशतकी खेळीच्या जोरावर आणि ऋतुराज गायकवाडच्या ४९ धावांसह भारतीय संघाने १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने २० षटकांत ६ गडी गमावून १५९ धावा केल्या. यजमान झिम्बाब्वेकडून डिऑन मायर्सने (नाबाद ६५) अर्धशतक झळकावले. क्लाइव्ह मदांडेने ३७ धावांची खेळी केली. मदांडे आणि मेयर्सने चांगली भागीदारी करत मोठी धावसंख्या उभारत संघाला विजयापर्यंत नेले पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.
भारताकडून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने चमकदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत १५ धावा देऊन तीन विकेट घेतले. तर आवेश खानने २ मोठे विकेट घेतले. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने आता या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथा सामना याच मैदानावर १३ जुलैला होणार आहे.
India vs Zimbabwe 3rd T20 Highlights: भारत वि झिम्बाब्वेमधील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत २-१ ने आघाडी मिळवली.
भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेवर २३ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने २-१ च्या फरकाने आघाडी मिळवली आहे. भारताने दिलेल्या १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ निर्धारित षटकांत १५९ धावाच करू शकला. भारताच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये लागोपाठ घेतलेल्या ३ विकेट्समुळे झिम्बाब्वेचा संघ बॅकफूटवर गेला. झिम्बाब्वेकडून डियॉन मेयर्सने शानदार फटकेबाजी करत ६५ धावा केल्या आणि संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. पण त्याचे हे प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यात अपुरे पडले.
मेयर्स भारताच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर तुफानी फटकेबाजी करत टी-२० मधील आपले पहिले अर्धशतक झळकावले. मेयर्सने ४५ चेंडूत ५५ धावा केल्या. शानदार षटकारासह त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
वॉशिंग्टन सुंदरच्या १७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मदांडे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ रिंकू सिंगकरवी झेलबाद झाला. मेयर्सच्या साथीने मदांडेने चांगली फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. मदांडेने २६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. झिम्बाब्वेला विजयासाठी १८ चेंडूत ६४ धावांची आवश्यकता आहे.
भारतीय संघ सहाव्या विकेटच्या प्रतिक्षेत आहे. मेयर्स आणि मदांडे या झिम्बाब्वेच्या जोडीने भारताच्या गोलंदाजांविरूद्ध चांगली फटकेबाजी करत आहेत. भारताने मोठी धावसंख्या उभारली असून झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्याने ही धावसंख्या गाठणं अवघड असेल.
१० षटकांत झिम्बाब्वेने ५ बाद ६० धावा केल्या आहेत. मैदानावर मेयर्स आणि क्लाईव्ह मदांडेची जोडी कायम आहे. तर भारतीय गोलंदाजांकडूनही चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे.
वॉशिंग्टनने त्याच्या स्पेलमधील पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या. सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कॅम्पबेलचा रियान परागने शानदार झेल टिपला. आजच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये संघाचा भाग नसला तरी सबस्टीट्यूट खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला. त्याने हा शानदार झेल टिपत संघाच्या खात्यात चौथी विकेट मिळवून दिली. यासह ७ षटकांनंतर झिम्बाब्वेची धावसंख्या ५ बाद ३९ धावा आहे.
वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीला येताच भारताला मोठी विकेट मिळवून दिली. सुंदरच्या ७व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझा झेलबाद झाला. सिकंदरने सुंदरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ रिंकू सिंगकरवी झेलबाद झाला.
झिम्बाब्वेने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावत ३७ धावा केल्या आहेत. सध्या मैदानात कर्णधार सिकंदर रझा आणि मेयर्सची जोडी कायम आहे. भारताकडून पॉवरप्लेमध्ये आवेश खानने २ तर खलील अहमदने १ विकेट घेतली आहे.
आवेश खानच्या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर ब्रायन बेनेटला झेलबाद केले. बिश्नोईने एक शानदार डाईव्ह मारत अनपेक्षित झेल टिपला आणि यासह भारताला सलग तिसरी विकेट मिळाली तर आवेश खानच्या खात्यात दुसरी विकेट आली. यासह झिम्बाब्वेने ४ षटकांत ३ बाद ३० धावा केल्या आहेत.
खलील अहमदच्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर मरूमणी शिवम दुबेकरवी झेलबाद झाला. पहिल्या षटकात मरूमणीने चांगली फलंदाजी करत दोन दणदणीत चौकार लगावले होते आणि झिम्बाब्वेला चांगली सुरूवात करून दिली. पण खलीलने त्याच्या पुढच्या षटकात त्याला माघारी धाडले.
आवेश खानच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर भारताला पहिली विकेट मिळाली आहे. पण आवेश खानने येताच मधेवरेला झेलबाद केले. यासह दोन षटकांनंतर झिम्बाब्वेची धावसंख्या १ बाद १५ धावा आहे.
भारताने दिलेल्या १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी झिम्बाब्वेकडून मारूमणी आणि मधेवेरेची जोडी मैदानात उतरली आहे. तर भारताकडून खलील अहमजकडून गोलंदाजीला सुरूवात केली आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३ बाद धावा केल्या आहेत. शुबमन गिलचे शानदार अर्धशतक, यशस्वी जैस्वालच्या झटपट ३६ धावा, तर ऋतुराज गायकवाडच्या ४९ धावांसह भारताने ४ बाद १८२ धावा केल्या. संजू सॅमसनने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत भारताची धावसंख्या १८० पार नेली. यशस्वी आणि गिल या सलामीच्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनीही ६७ धावांची भागीदारी केली. तर अभिषेक शर्माने १० धावांचे योगदान दिले आणि संजू सॅमसन १३ धावा करत नाबाद परतला. यासह भारताने झिम्बाब्वेला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले आहे.
अखेरच्या षटकात ऋतुराज गायकवाड ४६ धावांवर खेळत होता. २०व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका लगावला पण झिम्बाब्वेकडून झेल सुटला आणि त्यांनी दोन धावा केल्या. ४९ धावांवर खेळत असताना चौथ्या चेंडूवर चांगला फटका खेळला खरा पण गायकवाड ४९ धावांवर झेलबाद झाला.
भारताचा कर्णधार शुबमन गिलने शानदार फलंदाजी करत ६६ धावा करत बाद झाला. झिम्बाब्वेचा यशस्वी गोलंदाज मुझरबानीने सामन्याच्या १८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. गिलने ४९ चेंडूत ३ षटकार आणि ७चौकारांसह ६६ धावा केल्या.
सिकंदर रझाने भारताला त्याच्या दोन्ही षटकात दोन धक्के दिले. अभिषेक आणि यशस्वी हे दोन्ही फलंदाज रझाच्या गोलंदाजीवर बाद झाले. पण त्याच्या चौथ्या षटकात गिल आणि ऋतुराजने त्याची चांगलीच धुलाई केली. रझाच्या सामन्यातील १७व्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकारासह भारताने १९ धावा कुटल्या. गिलने एक चौकार आणि षटकार तर गायकवाडने एका षटकारासह भारताला १५० धावांच्या जवळ आणले.
भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत असलेल्या शुबमन गिलने दोन सामन्यातील साधारण कामगिरीनंतर तिसऱ्या टी-२० सामन्यात शानदार अर्धशतक झळकावत पुनरागमन केले आहे. गिलने ३६ चेंडूत ५२ धावा करत चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले.
ऋतुराज गायकवाडच्या दणदणीत षटकारासह भारताने १०० धावांचा पल्ला गाठला आहे. १३ षटकांत भारताने १०० धावांचा पल्ला गाठला आहे. १३व्या षटकात ऋतुराजने चौकार-षटकारांच्या फटकेबाजीसह १९ धावा केल्या. यासह भारताची धावसंख्या २ बाद १०८ धावा इतकी आहे.
सिकंदर रझाने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत त्याच्या स्पेलमधील दुसऱ्याच षटकात भारताला अजून एक धक्का दिला. सामन्यातील ११व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्मा १० धावा करत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह भारताने ११ षटकांत २ बाद ८३ धावा केल्या.
१० षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद ८० धावा आहे. यशस्वी जैस्वाल चांगली फटकेबाजी करत बाद झाला. सध्या मैदानावर शुबमन गिल आणि अभिषेक शर्माची जोडी कायम आहे. सुरूवातीला भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी केल्यानंतर झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं आहे.
यशस्वी जैस्वालच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार सिकंदर रझाच्या नवव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल झेलबाद झाला. यासह भारताने ९ षटकांनंतर १ बाद ७० धावा केल्या आहेत.
भारताने सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसह पॉवरप्लेमध्ये ५५ धावा केल्या आहेत. यशस्वी आणि गिलची जोडी २७-२७ धावा करत मैदानात कायम आहे. पहिल्या तीन षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी करत तब्बल ४१ धावा केल्या.
यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने ४.१ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या आहेत. भारताच्या दोन्ही सलामीवीरांची तुफानी फटकेबाजी सुरू आहे.
शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी अवघ्या ३ षटकांत ४१ धावा केल्या आहेत. यशस्वी २५ धावा तर शुबमन गिल १५ धावांवर खेळत आहे. यशस्वीची चौकार-षटकारांची फटकेबाजी पाहायला मिळत आहे.
सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताकडून फलंदाजीला सुरूवात केली आहे. पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालने १५ धावा केल्या.
तादिवनाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुजरबानी, तेंडाई चतारा.
झिम्बाब्वेविरूद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी टी-२० वर्ल्डकप संघातील खेळाडू परतले आहेत. यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. तर मुकेश कुमारला या सामन्यात विश्रांती दिली आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन:
यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.
भारत विरूद्ध झिम्बाब्वेमधील तिसऱ्या टी-२० सामन्यांची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली आहे. यासह भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिसऱ्या टी-२० साठी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत.
भारत विरुद्ध झिम्बाब्वेमध्ये आतापर्यंत एकूण १० टी-२० सामने खेळले आहेत. भारताने सात सामने जिंकले तर झिम्बाब्वेने तीन सामने जिंकले.
भारत विरूद्ध झिम्बाब्वेमधील पाच सामन्यांची टी-२० मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त पुनरागमन करत १०० धावांनी विजय मिळवला. यासह ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.