IND vs ZIM 4th T20 Match Highlights : भारत आणि झिम्बाब्वे संघांत हरारे स्पोर्ट्स क्लब येथे पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना शनिवारी पार पडला. ज्यामध्ये भारताच्या युवा ब्रिगडने यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर झिम्बाब्वेचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत मालिका जिंकली. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाला १५२ रोखले होते. यानंतर प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना १५.२ षटकांत एकही गडी न गमावता विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे.
IND vs ZIM 4th T20 Highlights : भारतीय क्रिकेटची युवा ब्रिगेड शनिवारी चौथ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेवर १० विकेट्सनी मात करुन मालिका जिंकली.
टीम इंडियाने तुफानी कामगिरी करत चौथ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे. या सामन्यात शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावा केल्या होत्या. यादरम्यान सिकंदर रझाने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. झिम्बाब्वेच्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना खलील अहमदने २ बळी घेतले. शिवम दुबे, तुषारदेश पांडे, अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
https://twitter.com/BCCI/status/1812124092754964884
झिम्बाब्वेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने 15.2 षटकांतच लक्ष्य गाठले. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले. यशस्वीने 53 चेंडूंचा सामना करत नाबाद 93 धावा केल्या. त्याच्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शुभमनने नाबाद 58 धावा केल्या. 39 चेंडूंचा सामना करताना त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. अशा प्रकारे भारताने हा सामना 10 विकेटने जिंकला.
भारताला विजयासाठी 25 धावांची गरज आहे
भारताने 13 षटकात 128 धावा केल्या आहेत. यशस्वीने 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 83 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 41 धावा करून खेळत आहे.
भारताला विजयासाठी 47 धावांची गरज
टीम इंडियाने 10 षटकात कोणतेही नुकसान न करता 106 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल 37 चेंडूत 65 धावा करून खेळत आहे. त्याने 11 चौकार मारले आहेत. शुभमन 23 चेंडूत 37 धावा करून खेळत आहे. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
जैस्वालने अर्धशतक झळकावले
भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने 29 चेंडूत अर्धशतक केले आहे. त्याचे हे त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक आहे. त्याचबरोबर शुबमन गिलही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या 73/0 आहे.
https://twitter.com/Shebas_10dulkar/status/1812109777410941095
पॉवरप्ले संपला असून भारतीय संघाची सलामीची जोडी दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. जैस्वाल आणि गिल यांच्यात 60 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या 61/0 आहे.
https://twitter.com/Shebas_10dulkar/status/1812109777410941095
यशस्वीने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली
यशस्वी जैस्वालने गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली आहे. तो 18 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्यानंतर खेळत आहे. शुभमन 12 धावा करून खेळत आहे. या दोघांमधील अर्धशतक भागीदारी पूर्ण झाली. भारताने अवघ्या 4 षटकात 53 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेचे गोलंदाज बॅकफूटवर आहेत.
मुजारबानीने दुसऱ्या षटकात 12 धावा दिल्या. टीम इंडियाने 2 षटकात एकही विकेट न गमावता 27 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने 15 तर शुबमन गिलने 11 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेने भारतासमोर ठेवले 153 धावांचे लक्ष्य
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या यजमान संघाने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या माधवरे आणि मारुमणी यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 63 धावांची मोठी भागीदारी झाली जी नवव्या षटकात अभिषेकने संपुष्टात आणली.त्याने मारुमणीला रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. तो 32 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर माधवरे 25 धावा करून बाद झाला. संघाला तिसरा धक्का ब्रायन बेनेटच्या रूपाने बसला जो केवळ नऊ धावा करू शकला.
https://twitter.com/BCCI/status/1812101825287348334
यानंतर सिकंदर रझाने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, झिम्बाब्वेचा कोणताही फलंदाज जास्त काळ विकेटवर टिकू शकला नाही. कॅम्पबेल तीन धावा करून बाद झाला. यानंतर संघाला पाचवा धक्का कर्णधार रझा 28 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे या सामन्यात पदार्पण करणाऱ्या तुषार देशपांडेने त्याला बाद केले. रझाच्या रूपाने त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले यश मिळाले. या सामन्यात मायर्सने 12, मदंडेने सात आणि अक्रमने चार (नाबाद) धावा केल्या. भारताकडून खलील अहमदने 2 तर देशपांडे, सुंदर, अभिषेक आणि शिवम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
झिम्बाब्वेला मोठा धक्का, तुषारने सिकंदरला केले बाद
तुषार देशपांडेने टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून दिली. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाला बाद केले. रझा 28 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. आता क्लाईव्ह मदंडे फलंदाजीला आले आहेत. झिम्बाब्वेने 19 षटकांत 5 गडी गमावून 147 धावा केल्या. मेयर्स 12 धावा केल्यानंतर खेळत आहे.
https://twitter.com/Shebas_10dulkar/status/1812101580424200494
झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझाची चमकदार कामगिरी
झिम्बाब्वेने 17 षटकांत 4 गडी गमावून 129 धावा केल्या आहेत. मेयर्स ९ धावा केल्यानंतर खेळत आहे. सिकंदर रझाने 24 चेंडूत 42 धावा केल्या आहेत. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. याबरोबरच त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला आहे. आता ही जोडी फोडण्यासाठी भारतीय गोलंदाज प्रयत्नशील आहेत.
झिम्बाब्वेला चौथा धक्का, कॅम्पबेल धावबाद
झिम्बाब्वेची चौथी विकेट पडली. जोनाथन कॅम्पबेल अवघ्या 3 धावा करून बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने धावबाद केले. आता मेयर्स फलंदाजीला आला आहे. सिकंदर रझा 17 चेंडूत 21 धावा करून खेळत आहे. झिम्बाब्वेने 15 षटकांत 4 गडी गमावून 98 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेला तिसरा धक्का, सुंदरने बेनेटला केले बाद
झिम्बाब्वेची तिसरी विकेट पडली. ब्रायन बेनेट 14 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता जोनाथन कॅम्पबेल फलंदाजीला आला आहे. संघाने 14 षटकांत 3 गडी गमावून 93 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेला दुसरा धक्का बसला, दुबेने घेतली विकेट
झिम्बाब्वेची दुसरी विकेट पडली. वेस्ली 24 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्याने 4 चौकार मारले. झिम्बाब्वेने 10 षटकात 2 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत. आता सिकंदर रझा फलंदाजीला आला आहे.
https://twitter.com/AddictorCricket/status/1812093475896361292
अभिषेकने भारताला मिळवून दिली पहिली विकेट
अभिषेक शर्मा यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. फलंदाजीसोबतच त्याने आता गोलंदाजीतही आपली ताकद दाखवली आहे. अभिषेकने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. मरुमणी 31 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार मारले. झिम्बाब्वेने 9 षटकात 1 गडी गमावून 64 धावा केल्या आहेत. वेस्ली 24 धावा करून खेळत आहे. ब्रायन बेनेट 1 धाव घेतल्यानंतर खेळत आहे.
झिम्बाब्वेच्या सलामी फलंदाजांकडून भारताच्या गोलंदाजांची धुलाई
झिम्बाब्वेचे सलामीचे फलंदाज वेस्ली माधवरे आणि तदिवानशे माधवरे दमदार फलंदाजी करताना दिसत आहेत. या दोघांमध्ये पहिल्या सहा षटकांत 44 धावांची भागीदारी झाली. सहा षटकांनंतर झिम्बाब्वेची धावसंख्या 44/0 आहे.
https://twitter.com/CricWatcher11/status/1812083717289963888
टीम इंडिया विकेटच्या शोधात
झिम्बाब्वेने 4 षटकात एकही बिनबाद 35 धावा केल्या आहेत. वेस्ली आणि मारुमणी यांनी त्याला चांगली सुरुवात करून दिली आहे. मारुमणी 11 तर वेस्ली 17 धावांसह खेळत आहे. भारतीय गोलंदाजांना अद्याप एकही बळी घेता आलेला नाही.
https://twitter.com/MidnightMusinng/status/1812085048172044702
खलीलने पहिल्याच षटकात 4 धावा दिल्या
पहिले षटक भारतासाठी चांगले होते. खलीलने केवळ 4 धावा दिल्या. वेस्ली 6 चेंडूत 4 धावा केल्यानंतर खेळत आहे. मारुमणी यांना अद्याप खाते उघडता आलेले नाही. तुषार देशपांडे भारतासाठी दुसरे षटक टाकणार आहे. तो आपला पदार्पण सामना खेळत आहे.
पत्नीच्या उपस्थितीत तुषारला टीम इंडियाची कॅप मिळाली
टीम इंडियाची कॅप तुषार देशपांडेला देण्यात आली. यावेळी त्यांची पत्नीही उपस्थित होती. तुषारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयपीएलमध्येही त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत : यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.
https://twitter.com/IExpressSports/status/1812075505874534820
झिम्बाब्वे: वेस्ली माधवेरे, तदिवनाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदंडे (यष्टीरक्षक), रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शुबमन गिलने सांगितले की, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. आवेश खानच्या जागी तुषार देशपांडेला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
हरारे स्पोर्ट्स क्लब खेळपट्टी अहवाल
नवीन चेंडू हरारेच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना खूप मदत करतो. अशा स्थितीत फलंदाजांच्या अडचणी वाढतात. तथापि, चेंडू जुना झाल्यानंतर परिस्थिती बदलेल. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 44 T20 सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 24 वेळा विजय मिळवला आहे.
कर्णधारपदाखाली पहिली मालिका जिंकण्यासाठी शुबमन उत्सुक
झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करत पुढील दोन सामने जिंकले आणि आता चौथा टी-२० सामना जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेण्यावर त्यांचे प्रयत्न असतील. भारतीय क्रिकेटची युवा ब्रिगेड शनिवारी चौथ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेविरुद्धची मालिका जिंकून नव्या पर्वाची सुरुवात करू पाहणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करणारा शुबमन गिलही आपल्या नेतृत्वाखाली पहिली मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत : शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, संजू सॅमसन, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई.
झिम्बाब्वे: तदिवनाशे मारुमणी, डिऑन मायर्स, विस्ले माधवेरे, जोनाथन कँबेल, अलेक्झांडर रझा, ब्रायन बेनेट, क्लाइव्ह मदांडे, तेंडाई चतारा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारवा.
भारताकडे आता या फॉरमॅटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा नाहीत, त्यामुळे अभिषेक यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात करण्याचा पर्याय असू शकतो. त्याला आणखी एक चांगली खेळी खेळून आपला दावा पक्का करायचा आहे. या मालिकेतही संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्यासाठी खूप काही पणाला लागले आहे. दुबे आणि सॅमसन यांना उर्वरित दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आपल्या गोलंदाजांच्या, विशेषतः लेगस्पिनर रवी बिश्नोईच्या कामगिरीवर खूश असेल, ज्याची गुगली यजमान फलंदाज खेळू शकत नाहीत. बिश्नोई, आवेश खान आणि वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी सहा विकेट घेतल्या आहेत. आवेशच्या जागी मुकेश कुमारला शेवटच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.
वॉशिंग्टन-अभिषेकच्या कामगिरीवर विशेष लक्ष
सध्या खेळाडू भारतीय संघात स्थान निश्चित करण्याचा्या प्रयत्नात आहेत. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा यांचा समावेश आहे. रवींद्र जडेजाच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, वॉशिंग्टन संघात फिरकी अष्टपैलू म्हणून स्थान मिळवण्याकडे लक्ष देत आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने ४.५ च्या इकॉनॉमी रेटने सहा विकेट घेतल्या. श्रीलंका दौऱ्यासाठी संघ निवडताना त्याच्या नावाचा नक्कीच विचार केला जाईल. एक उपयुक्त फिरकी गोलंदाज असण्यासोबतच तो खालच्या क्रमाचा चांगला फलंदाज देखील आहे. त्याचवेळी अभिषेकने दुसऱ्या टी-२० सामन्यात ४७ चेंडूत शतक झळकावून आपली प्रतिभा दाखवली.
भारताच्या युवा ब्रिगेडचे मालिका विजयाचे ध्येय
झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने दमदार कमबॅक करत पुढील दोन सामने जिंकले. आता चौथा टी-२० सामना जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेण्यावर त्यांचे प्रयत्न असतील. भारतीय क्रिकेटची युवा ब्रिगेड शनिवारी चौथ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेविरुद्धची मालिका जिंकून नव्या पर्वाची सुरुवात करू पाहणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करणारा शुबमन गिलही आपल्या नेतृत्वाखाली पहिली मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल.