IND vs ZIM 5th T20 Live Match Updates : हरारे येथील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ४२ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली. भारताच्या या विजयात सर्वात मोठा वाटा संजू सॅमसनचा होता, ज्याने ४५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्यानंतर मुकेश कुमारने चार आणि शिवम दुबेने दोन बळी घेतले. इतर गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने हा सामना ४२ धावांनी जिंकला. डिओन मायर्स आणि मारुमणी यांच्याशिवाय झिम्बाब्वेकडून कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला १८.३ षटकांत १० गडी गमावून केवळ १२५ धावा करता आल्या.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल ही सलामीची जोडी आज काही अप्रतिम करू शकली नसली, तरी संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी ६६ धावांची भागीदारी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यजमान झिम्बाब्वे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा वेस्ली मधवेरे शून्यावर बाद झाला. यानंतर सातत्याने झिम्बाब्वे संघाच्या विकेट्स पडतच राहिल्या.
मायर्स आणि मारुमणी पुन्हा प्रभावित केले –
मायर्स या मालिकेत चांगली फलंदाजी करताना दिसला आणि त्याने अर्धशतकही केले. दुसरीकडे, तिसऱ्या सामन्यात प्रत्येक वेळी संधी मिळाल्यावर मारुमणीने मोठी धावसंख्या केली आहे. मालिकेतील पाचव्या सामन्यात मारुमणीने २४ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले तर मायर्सने ३२ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. त्यांच्या ४४ धावांच्या भागीदारीमुळे झिम्बाब्वेच्या विजयाची आशा निर्माण झाली होती.
भारताच्या गोलंदाजांनी दाखवली ताकद –
भारताची पहिली विकेट मुकेश कुमारने घेतली, ज्याने मधवेरेला खातेही उघडू दिले नाही. आपल्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात मुकेशने झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायन बेनेटलाही बाद केले. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक ४ बळी घेतले. शिवम दुबेने २ तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
IND vs ZIM 5th T20 Highlights : भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत४-१ ने विजय मिळवला. भारताने मालिकेतील पहिला सामना गमावला होता. यानंतर सलग चार सामन्यात विजय मिळवला.
भारताने पाचव्या टी-२० सामनन्यात झिम्बाब्वेचा ४२ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेवर कब्जा केला आहे. भारताने ही मालिका ४-१ अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने १६७ धावा केल्या होत्या. यादरम्यान संजू सॅमसनने अर्धशतक झळकावले. त्याने ४५ चेंडूंचा सामना करत ५८ धावा केल्या. सॅमसनच्या या खेळीत ४ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. रियान परागने २२ धावांची खेळी केली. शिवम दुबेने २६ धावा केल्या. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला केवळ १२५ धावा करता आल्या. झिम्बाब्वेसाठी फराज अक्रमने १३ चेंडूत २७ धावा केल्या. मेयर्सने ३४ धावांची खेळी खेळली. मारुमणी २७ धावा करून बाद झाला.
तुषार देशपांडेने झिम्बाब्वेला दिला आठवा धक्का
झिम्बाब्वेची आठवी विकेट पडली. तुषार देशपांडेने ब्रँडन मावुताला बाद केले. तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. झिम्बाब्वेने 17.5 षटकांत 120 धावा केल्या. त्याला विजयासाठी 48 धावांची गरज आहे.
झिम्बाब्वेला सातवा धक्का, क्लाइव्ह बाद
झिम्बाब्वेची सातवी विकेट गेली. क्लाइव्ह 1 धावा करून बाद झाला. त्याला अभिषेक शर्माने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संघाने 15.1 षटकात 94 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेला सहावा धक्का, दुबेने कॅम्पबेलला बाद केले
टीम इंडियाने झिम्बाब्वेला सहावा धक्का दिला. कॅम्पबेल 4 धावा करून बाद झाला. शिवम दुबेने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संघाने 14.4 षटकात 90 धावा केल्या आहेत. त्याला विजयासाठी 78 धावांची गरज आहे.
कर्णधार रझा धावबाद झाला
87 धावांच्या स्कोअरवर झिम्बाब्वेला पाचवा धक्का बसला. शिवम दुबेने कॅप्टन रझाला धावबाद केले. त्याला केवळ आठ धावा करता आल्या. मदंडे सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आले आहेत. कॅम्पबेल त्याला साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आहे.
झिम्बाब्वेने 14 षटकांत 89 धावा केल्या
झिम्बाब्वेने 14 षटकांत 5 गडी गमावून 89 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी 36 चेंडूत 79 धावांची गरज आहे. क्लाइव्हला अद्याप खाते उघडता आलेले नाही. कॅम्पबेल 4 धावा करून खेळत आहे.
झिम्बाब्वेला चौथा झटका, कॅम्पबेल बाद
झिम्बाब्वेला चौथा धक्का बसला. मेयर्स 32 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. शिवम दुबेने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता सिकंदर रझा आणि कॅम्पबेल झिम्बाब्वेसाठी फलंदाजी करत आहेत. झिम्बाब्वेने 13 षटकांत 4 गडी गमावून 86 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेने 10 षटकांत 69 धावा केल्या
झिम्बाब्वेने 10 षटकांत 3 गडी गमावून 69 धावा केल्या. मायर्स 25 धावा करून खेळत आहे. सिकंदर रझा 2 धावा करून खेळत आहे. संघाला विजयासाठी 99 धावांची गरज आहे.
झिम्बाब्वेला तिसरा धक्का, मारुमणी बाद
वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाला महत्त्वाची विकेट दिली. त्यांनी मारुमणीला बाद केले आहे. मारुमणी 24 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे झिम्बाब्वेची तिसरी विकेट पडली.
झिम्बाब्वेची धावसंख्या 50 धावा पार
झिम्बाब्वेची धावसंख्या 50 धावांच्या पुढे गेली आहे. त्याने 7 षटकात 2 गडी गमावून 52 धावा केल्या आहेत. मायर्स 13 धावांवर तर मारुमणी 26 धावांवर खेळत आहे. या दोघांमध्ये 37 धावांची भागीदारी झाली आहे.
झिम्बाब्वेने 5 षटकांत 31 धावा केल्या
झिम्बाब्वेने 5 षटकात 2 गडी गमावून 31 धावा केल्या आहेत. मायर्स झिम्बाब्वेकडून खेळत असून 5 धावा केल्या आहेत. मारुमणी 14 धावा करून खेळत आहे. टीम इंडियाचे गोलंदाज विकेटच्या शोधात आहेत.
झिम्बाब्वेला दुसरा धक्का बसला
झिम्बाब्वेला दुसरा धक्का 15 धावांवर बसला. मुकेश कुमारने ब्रायन बेनेटला शिवम दुबेकरवी झेलबाद केले. त्याला केवळ 10 धावा करता आल्या. मायर्स चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी मारुमणी क्रीजवर हजर आहे.
मुकेश कुमारने झिम्बाब्वेला दिली पहिला धक्का
एका धावेवर झिम्बाब्वेला पहिला धक्का बसला. मुकेश कुमारने माधवेरेला बोल्ड केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. ब्रायन बेनेट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी मारुमणी खेळपट्टीवर उपस्थित आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20मालिकेतील पाचव्या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताने संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीमुळे जोरावर 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली होती. डावाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालने 13 धावा केल्या. वास्तविक, सिकंदर रझाने पहिल्याच चेंडूवर नो बॉल टाकला होता ज्यावर जयस्वालने षटकार मारला होता. यानंतर फ्री हिटचा फायदा घेत त्याने आणखी एक षटकार मारला. मात्र, या षटकातील चौथ्या चेंडूवर रझाने त्याला बाद केले.
https://twitter.com/BCCI/status/1812467299783213188
यानंतर अभिषेक शर्मा फलंदाजीला आला त्याला केवळ 14 धावा करता आल्या. पॉवरप्लेमध्ये भारताने तीन विकेट्स गमावल्या. कर्णधार गिलची बॅटही आज शांत राहिली. त्याला केवळ 13 धावा करता आल्या. यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी पदभार स्वीकारला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 65 धावांची भागीदारी झाली. मावुताने पंधराव्या षटकात परागला आपला बळी बनवले. 22 धावा करून तो बाद झाला. तर संजू सॅमसन ५८ धावांची तुफानी खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्याने 40 चेंडूत आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. यष्टिरक्षक फलंदाजाने आपल्या खेळीदरम्यान एक चौकार आणि चार षटकार मारले. या सामन्यात शिवम दुबेने 26 धावा केल्या. रिंकू 11 धावा करून नाबाद राहिला आणि सुंदर एक धाव घेत नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून मुझाराबानीने दोन तर रझा रिचर्ड आणि मावुता यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
टीम इंडियाने 19 षटकानंतर 5 विकेट गमावून 153 धावा केल्या आहेत. शिवम दुबेने 2 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. तो 12 चेंडूत 26 धावा केल्यानंतर खेळत आहे. रिंकू सिंग 2 धावा करून खेळत आहे.
टीम इंडियाला पाचवा धक्का, संजू सॅमसन आऊट
टीम इंडियाची पाचवी विकेट पडली. संजू सॅमसन 45 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. ब्रँडनने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शिवम दुबे 11 धावा करून खेळत आहे. भारताने 18 षटकांत 5 गडी गमावून 137 धावा केल्या आहेत.
संजू सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. टीम इंडिया संकटात असताना त्याने हे अर्धशतक झळकावले. तो 42 चेंडूत 54 धावा केल्यानंतर खेळत आहे. सॅमसनने 4 षटकार मारले आहेत. शिवम दुबे 10 धावा करून खेळत आहे. भारताने 17 षटकांत 4 गडी गमावून 131 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाला चौथा धक्का, रियान पराग बाद
टीम इंडियाची चौथी विकेट पडली आहे. रियान पराग 24 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. त्याने 1 षटकार मारला. रियानला ब्रँडन मावुताने बाद केले. आता शिवम दुबे फलंदाजीला आला आहे.
टीम इंडियाची धावसंख्या शंभरी पार
सॅमसनने ब्रँडन मावुताच्या षटकात सलग दोन षटकार ठोकले. तो 38 धावा करून खेळत आहे. तर रियान पराग 20 धावा करून खेळत आहे. टीम इंडियाने 13 षटकात 3 विकेट गमावून 101 धावा केल्या आहेत. भारताकडून रियान आणि संजू चांगली फलंदाजी करत आहेत. दोघांमध्ये 48 चेंडूत 61 धावांची भागीरदारी झाली आहे.
टीम इंडियाने 11 षटकात 5 धावा केल्या. त्याने 3 गडी गमावून 80 धावा केल्या आहेत. रियान 17 आणि संजू 21 धावांसह खेळत आहेत. झिम्बाब्वेने लवकर विकेट घेत भारताच्या धावांचा वेग कमी केला आहे.
भारताची 9 षटकानंतर धावसंख्या 3 बाद 64 धावा
17 चेंडूत 17 धावा केल्यानंतर संजू सॅमसन खेळत आहे. रियान पराग 6 धावा करून क्रीजवर आहे. भारताने 9 षटकात 3 गडी गमावून 64 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेसाठी सिकंदर रझा, रिचर्ड नगारवा आणि ब्लेसिंग यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
पॉवरप्लेची पहिली सहा षटके भारतासाठी काही खास नव्हती. पॉवरप्लेमध्ये भारताचे तीन फलंदाज बाद झाले. जैस्वाल 12, अभिषेक 14 आणि गिल 13 धावा करून बाद झाले. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या 44/3 आहे. सध्या संजू सॅमसन आणि रायन पराग क्रीजवर आहेत.
नागरवाने भारताला तिसरा धक्का दिला. त्याने 40 धावांवर कर्णधार शुबमन गिलला झेलबाद केले. त्याला केवळ 13 धावा करता आल्या. रियान पराग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी संजू सॅमसन उपस्थित आहे.
भारताला दुसरा धक्का 38 धावांवर बसला. मुझाराबानीने अभिषेक शर्माला झेलबाद केले. त्याला केवळ 14 धावा करता आल्या. संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी शुबमन गिल क्रीजवर उपस्थित आहे. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या 38/2 आहे.
भारताकडून शुबमन-अभिषेक फलंदाजी करत आहेत
भारताने 2 षटकात 1 गडी गमावून 17 धावा केल्या. अभिषेक शर्मा 5 चेंडूत 3 धावा केल्यानंतर खेळत आहे. शुूबमन गिल 1 धावा करून क्रीजवर आहे. झिम्बाब्वेचे पहिले षटक अलेक्झांडरने टाकले. रिचर्डने दुसऱ्या षटकात 2 धावा दिल्या.
https://twitter.com/cricketimpluse/status/1812445901316935914
झंझावाती सुरुवातीनंतर भारताला धक्का, यशस्वी बाद
टीम इंडियाची झंझावाती सुरुवात झाली. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल सलामीला आले. यादरम्यान यशस्वीने 2 षटकार ठोकले. पण तोही 12 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाला. यशस्वीला सिकंदर रझाने बाद केले.
भारताचा डाव सुरू झाला आहे. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल दमदार फॉर्ममध्ये दिसत आहेत. सिकंदर रझा डावातील पहिले षटक टाकत आहे. या षटकातील पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत यशस्वी जैस्वालने टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली.
भारत-झिम्बाब्वेने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले
टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. रियान पराग आणि मुकेश कुमार प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत. झिम्बाब्वेने चताराला विश्रांती दिली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णदार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत : यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार.