IND vs ZIM 5th T20 Live Match Updates : हरारे येथील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ४२ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली. भारताच्या या विजयात सर्वात मोठा वाटा संजू सॅमसनचा होता, ज्याने ४५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्यानंतर मुकेश कुमारने चार आणि शिवम दुबेने दोन बळी घेतले. इतर गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने हा सामना ४२ धावांनी जिंकला. डिओन मायर्स आणि मारुमणी यांच्याशिवाय झिम्बाब्वेकडून कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला १८.३ षटकांत १० गडी गमावून केवळ १२५ धावा करता आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल ही सलामीची जोडी आज काही अप्रतिम करू शकली नसली, तरी संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी ६६ धावांची भागीदारी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यजमान झिम्बाब्वे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा वेस्ली मधवेरे शून्यावर बाद झाला. यानंतर सातत्याने झिम्बाब्वे संघाच्या विकेट्स पडतच राहिल्या.

मायर्स आणि मारुमणी पुन्हा प्रभावित केले –

मायर्स या मालिकेत चांगली फलंदाजी करताना दिसला आणि त्याने अर्धशतकही केले. दुसरीकडे, तिसऱ्या सामन्यात प्रत्येक वेळी संधी मिळाल्यावर मारुमणीने मोठी धावसंख्या केली आहे. मालिकेतील पाचव्या सामन्यात मारुमणीने २४ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले तर मायर्सने ३२ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. त्यांच्या ४४ धावांच्या भागीदारीमुळे झिम्बाब्वेच्या विजयाची आशा निर्माण झाली होती.

भारताच्या गोलंदाजांनी दाखवली ताकद –

भारताची पहिली विकेट मुकेश कुमारने घेतली, ज्याने मधवेरेला खातेही उघडू दिले नाही. आपल्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात मुकेशने झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायन बेनेटलाही बाद केले. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक ४ बळी घेतले. शिवम दुबेने २ तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

Live Updates

IND vs ZIM 5th T20 Highlights : भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत४-१ ने विजय मिळवला. भारताने मालिकेतील पहिला सामना गमावला होता. यानंतर सलग चार सामन्यात विजय मिळवला.

15:35 (IST) 14 Jul 2024
IND vs ZIM 5th T20 : चौथ्या सामन्यात शुबमन-यशस्वीने केली होती दमदार फलंदाजी

चौथ्या सामन्यात शुबमन-यशस्वीने केली होती दमदार फलंदाजी

झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने दमदार फलंदाजी करत 10 गडी राखून विजय मिळवला. इतर फलंदाजांना संधी देण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना वरच्या क्रमाने मैदानात उतरवले जाऊ शकते, असे मानले जात आहे. शुबमन आणि यशस्वी यांनी आपली क्षमता दाखवून दिली आहे. शुभमनने या दौऱ्यात सलग अर्धशतकं झळकावली आहेत, तर यशस्वीनेही ९३ धावांची नाबाद खेळी केली आहे. त्याचबरोबर शिवम दुबे, रियान पराग आणि सॅमसन यांना फलंदाजीची फारशी संधी मिळालेली नाही.

15:21 (IST) 14 Jul 2024
IND vs ZIM 5th T20 : झिम्बाब्वे सन्मान वाचवण्यासाठी खेळणार

झिम्बाब्वे सन्मान वाचवण्यासाठी खेळणार

पहिला सामना झिम्बाब्वे संघाने जिंकला होता. यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. अशा परिस्थितीत सिकंदर रझाचा संघ आता सन्मान वाचवण्यासाठी खेळणार आहे.

15:17 (IST) 14 Jul 2024
IND vs ZIM 5th T20 : भारताची युवा ब्रिगेड मालिकेचा शेवट गोड करण्यास उत्सुक

भारताची युवा ब्रिगेड मालिकेचा शेवट गोड करण्यास उत्सुक

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील यंग ब्रिगेडला विजयाने दौऱ्याचा समारोप करायचा आहे.

IND vs ZIM 5th T20 Highlights : पाचव्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला १८.३ षटकांत १० गडी गमावून केवळ १२५ धावा करता आल्या.