India vs Zimbabwe T20I Series: टी-२० वर्ल्डकपनंतर लगेचच होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ हरारेला रवाना झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ जून रोजी होणार आहे. मात्र, यादरम्यान बीसीसीआयकडून संघात बदल करण्यात आले आहेत. झिम्बाब्वे मालिकेसाठी भारताने वर्ल्डकप सुरू असतानाच संघ जाहीर केला होता. पण आता या संघात तीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. ज्याचे कर्णधारपद शुबमन गिलकडे देण्यात आले होते. दरम्यान, या मालिकेसाठी टी-२० विश्वचषकातील संघामधील एकूण ५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पण भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्येच अडकला असल्याने भारतात परतलेला नाही. त्यामुळे संघात अचानक बदल करणे भाग पडले आहे.
पहिल्या दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हे खेळाडू संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांची जागा घेतील.वर्ल्डकप संघाबरोबर असलेले हे तीन खेळाडू प्रथम संपूर्ण संघासह भारतात येतील आणि त्यानंतर मालिका खेळण्यासाठी हरारेला रवाना होतील.
? NEWS ?
— BCCI (@BCCI) July 2, 2024
Sai Sudharsan, Jitesh Sharma and Harshit Rana added to India’s squad for first two T20Is against Zimbabwe.
Full Details ? #TeamIndia | #ZIMvINDhttps://t.co/ezEefD23D3
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा.