Ind and Aus Team fined match fee for slow over rate: लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलिया हा आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ ठरला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाबरोबरच ऑस्ट्रेलियाला एक मोठा धक्का बसला आहे. डब्ल्यूटीसी फायनलमधील दोन्ही संघांना आयसीसीने दंड ठोठावाला आहे. याबात आयसीसीने ट्विट करुन माहिती दिली.
या सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप फ्लॉप ठरली. फायनलमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी भारताला संपूर्ण मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला मॅच फीच्या ८० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. टीम इंडिया निर्धारित वेळेपेक्षा 5 षटके मागे होती. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित वेळेपेक्षा ४ षटके मागे होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही याचा फटका बसला आहे. आयसीसीने शुबमन गिलला दंडही ठोठावला आहे. त्याला मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी स्वत:ला बाद देण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्या शुबमन गिललाही दंड केला.
भारताचा सलामीवीर शुबमन गिल अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात केवळ १३ धावा करून बाद झाला. रोहित १५ धावा करून आणि पुजारा १४ धावा करून बाद झाला. कोहलीही १४ धावा करून बाद झाला. श्रीकर भरतने ३१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात गिल १८ धावा करून बाद झाला. पुजारा २७ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाला खातेही उघडता आले नाही. या सामन्याच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलचे बाद होणे वादग्रस्त ठरले. त्याच्या पकडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
हेही वाचा – WTC Final 2023: पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! आयसीसीने ठोठावला दंड, काय आहे कारण? जाणून घ्या
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला. टीम इंडियाच्या पराभवासाठी खराब फलंदाजी कारणीभूत ठरली.