आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक मालिकेत भारत सर्वोत्तम संघ असल्याचे भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने म्हटले आहे. इंग्लंडच्या मैदानावर उत्तम ताळमेळ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणकेल्यामुळे चॅम्पियन्स करंडक जिंकण्यात भारतीय संघाला मदत झाली असे द्रविडने स्पष्ट केले आहे.
रविवारी पावसाच्या व्यत्ययामुळे २० षटकांचा अंतिम सामना खेळविण्यात आला. यात भारताने इंग्लंडवर पाच धावांनी विजय प्राप्त करत चॅम्पियन्स करंडकावर भारताचे नाव कोरले.
“हा सर्वात्तम संघ आहे. या संघावर कठीण परिस्थितीत दबाव येत नाही. याउलट, संघ दबावात उत्तम कामगिरी करत आहे. अंतिम सामन्यात भारताने १३० धावांचे लक्ष्यही इंग्लंड संघाला गाठू दिले नाही. भारतीय संघाला बळकटी आली आहे.” असे राहुल द्रविडने एका क्रिडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. त्याचबरोबर “सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या भारतीय संघाचा ताळमेळ. गोलंदाजीला पोषक असणारे इंग्लंडमधील स्टेडियम्स असले, तरी सात फलंदाजांचा संघात समावेश होता. त्यापैकी रविंद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी निभावली. यापूर्वी भारतीय संघाने इंग्लंडच्या मैदानावर चॅम्पियन्स मालिकेत अशी किमया केली नव्हती. खरंच संघ उत्कृष्ट खेळला” असेही राहुल द्रविडने म्हटले

Story img Loader