आज पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंना छाप पाडण्याची संधी

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम

आठ महिन्यांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने संघबांधणीला प्रारंभ करण्याचे भारताचे लक्ष्य असून बुधवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत युवा खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.

मागील वर्षी संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताला या स्पर्धेची बाद फेरीही गाठण्यात अपयश आले. त्यानंतर अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडला ३-० अशी धूळ चारली. मात्र, आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मधली फळी आणि गोलंदाजीबाबतचे काही प्रश्न भेडसावत असून विंडीजविरुद्ध त्यांची उत्तरे शोधण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल. या मालिकेचे तीनही सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होतील.

राहुलच्या अनुपस्थितीत इशानला संधी

पायाच्या दुखापतीमुळे भारताचा उपकर्णधार के. एल. राहुल विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकणार असून त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्माच्या साथीने डावखुरा इशान किशन सलामीला उतरण्याची दाट शक्यता आहे. भारताकडे महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचाही पर्याय उपलब्ध आहे. मात्र, इशानने मागील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या एका सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात केली होती. त्यामुळे बुधवारी पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऋतुराजपेक्षा त्यालाच प्राधान्य मिळू शकेल. त्याचप्रमाणे मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोन्ही मुंबईकर फलंदाजांना स्थान मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अष्टपैलू वेंकटेश अय्यरही आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडत भारतीय संघातील जागा निश्चित करण्यासाठी उत्सुक असेल.

चहलला बिश्नोईची साथ?

अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळाले नसून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतींमुळे विंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे या मालिकेत अनुभवी लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहल भारतासाठी प्रमुख फिरकीपटूची भूमिका साकारेल. त्याला राजस्थानचा युवा लेग-स्पिनर रवी बिश्नोईची साथ लाभण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’ आणि स्थानिक क्रिकेटमधील ४२ ट्वेन्टी-२० सामन्यांत बिश्नोईने ४९ बळी मिळवले आहेत. तसेच दीपक चहर, शार्दूल ठाकूर आणि हर्षल पटेल वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणे अपेक्षित असून आवेश खानला या मालिकेत पदार्पणाची संधी लाभू शकेल.

दडपण हाताळण्यास विराट सक्षम -रोहित

कोलकाता : भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीला दोन वर्षांपासून धावांसाठी झगडावे लागत आहे. मात्र, याबाबत सतत चर्चा करणे प्रसारमाध्यमांनी थांबवले पाहिजे, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माला वाटते. विराटला लवकरच लय सापडेल याची रोहितला खात्री आहे.

‘‘तुम्ही (प्रसारमाध्यमे) विराटबाबत सतत चर्चा करणे थांबवले पाहिजे. तुम्ही जर शांत राहिलात, तर सर्व काही ठीक होईल. विराट मानसिकदृष्टय़ा कणखर आहे. तो दशकभराहूनही अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे दडपण हाताळण्यात तो सक्षम आहे. त्याला धावा कशा करायच्या हे ठाऊक आहे,’’ असे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित म्हणाला.

तसेच ‘आयपीएल’मधील कामगिरीच्या आधारे खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळत असली, तरी त्यांची राष्ट्रीय संघात वेगळय़ा क्रमांकावर फलंदाजी करण्याची तयारी असणे गरजेचे आहे, असेही रोहितने नमूद केले. ‘‘कोणता खेळाडू ‘आयपीएल’मध्ये कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतो याचा आम्ही विचार करत नाही. आम्ही संघाच्या गरजेनुसार फलंदाजांचा क्रम ठरवतो. आम्ही केवळ भारतीय संघाच्या हिताचा विचार करतो,’’ असे रोहितने सांगितले.

कोहलीची शतकी कसोटी मोहालीत

नवी दिल्ली : श्रीलंकन संघाच्या आगामी भारत दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी जाहीर केले असून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १००वा कसोटी सामना मोहाली येथे खेळवला जाणार आहे.

या दौऱ्याची कसोटी मालिकेने सुरुवात केली जाणार होती. मात्र, श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या विनंतीनंतर ‘बीसीसीआय’ने वेळापत्रकात बदल केला असून या दौऱ्याला तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेने प्रारंभ होणार असून त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. पहिला कसोटी सामना ४ ते ८ मार्च या कालावधीत मोहाली येथे होणार आहे. हा कोहलीच्या कारकीर्दीतील १००वा आणि कर्णधारपद सोडल्यानंतरचा पहिलाच कसोटी सामना असेल. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना १२ ते १६ मार्च या कालावधीत बंगळूरु येथे खेळला जाईल.

तत्पूर्वी तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला लखनऊ (२५ फेब्रुवारी) येथे सुरुवात होणार असून अखेरचे दोन्ही सामने धरमशाला (२६ आणि २७ फेब्रुवारी) येथे खेळवले जातील.

संघ

’ भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, यजुर्वेद्र चहल, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव, हरप्रीत ब्रार.

’ वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), शाय होप, डॅरेन ब्राव्हो, रॉस्टन चेस, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, कायले मेयर्स, जेसन होल्डर, फॅबियन अ‍ॅलन, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, अकील हुसेन, रोमारियो शेपर्ड, ओडीन स्मिथ, हेडन वॉल्श.

’ वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

Story img Loader