वृत्तसंस्था, डरबन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीला मला बरेच अपयश पाहावे लागले. त्यामुळे मी स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न उपस्थित करू लागलो होतो. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव, प्रशिक्षक गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि संघ व्यवस्थापनातील अन्य सदस्यांच्या पाठिंब्यामुळे मला बळ मिळाले. माझा आत्मविश्वास वाढला आणि माझे पुनरागमन सुकर झाले, अशी भावना भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने व्यक्त केली.

nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने ६१ धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात सॅमसनने निर्णायक भूमिका बजावली. त्याने सलामीला येताना ५० चेंडूंत १०७ धावांची तुफानी खेळी केली. याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध हैदराबाद येथे झालेल्या सामन्यातही शतक साकारले होते. त्यामुळे सलग दोन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांत शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा मान सॅमसनला मिळाला. मात्र, या विक्रमी कामगिरीपूर्वी त्याला आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा >>>Sanju Samson : ‘तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो…’, संजू सॅमसनच्या शतकी खेळीनंतर पत्नी चारुलताच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष

‘‘माझ्या कारकीर्दीत मी बरेच अपयश पाहिले आहे. तुम्ही सतत अपयशी ठरता, तेव्हा तुमच्या डोक्यात बरेच विचार येण्यास सुरुवात होते. समाजमाध्यमाची भूमिकाही यात महत्त्वाची ठरते. तुम्हाला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्ही स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न उपस्थित करू लागता. ‘आयपीएल’मध्ये इतकी यशस्वी कामगिरी करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मागे का राहतो, असा प्रश्न मला पडत होता. मात्र, आता बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळल्यानंतर स्वत:च्या क्षमतेबाबत मला खात्री पटली आहे,’’ असे सॅमसनने नमूद केले.

‘‘मी खेळपट्टीवर टिकून राहिलो, तर फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज, त्यांच्याविरुद्ध मोठे फटके मारू शकतो. तसेच संघाला सामने जिंकवून देण्याचीही माझ्यात क्षमता आहे. सुरुवातीला हा विश्वास निर्माण होण्यास वेळ लागला. मात्र, आता मी फार सकारात्मक झालो आहे. कधीतरी अपयश येणारच, पण मेहनत घेत राहिल्यास पुन्हा आपण उभारी घेऊ शकतो, हे मला समजले आहे,’’ असेही सॅमसन म्हणाला.

हेही वाचा >>>Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार

तसेच आपल्या यशात कर्णधार आणि प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे सॅमसन सांगतो. ‘‘तुम्हाला जेव्हा सूर्यकुमारसारखा सतत पाठिंबा देणारा कर्णधार लाभतो, तसेच गंभीर आणि लक्ष्मण सरांसारखे प्रशिक्षक जेव्हा तुमच्यावर विश्वास दाखवतात, तेव्हा तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो. मी अपयशी ठरत असतानाही त्यांनी माझी पाठराखण केली. मला प्रोत्साहन दिले. त्यांनी माझ्याशी ज्या प्रकारे संवाद साधला, तो खूप महत्त्वाचा होता. निराशेच्या गर्तेत अडकलेले असताना त्यातून बाहेर पडणे अवघड असते. गंभीर सर आणि सूर्या यांनी फोन करून मला आधार दिला. माझ्या खेळात काय सुधारणा आवश्यक आहे, हे त्यांनी सांगितले. सूर्या सतत माझ्या संपर्कात होता. जेव्हा कर्णधार तुमच्यावर इतका विश्वास दाखवतो, तेव्हा त्याची परतफेड करणे हे तुमचे काम असते. त्यांच्या पाठिंब्याविना मी पुनरागमन करू शकलो नसतो,’’ असेही सॅमसनने सांगितले.

सलग ११वा विजय…

● सॅमसनच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात शुक्रवारी यजमान दक्षिण आफ्रिकेवर ६१ धावांनी मात केली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा हा सलग ११वा विजय ठरला.

● प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ८ बाद २०२ अशी धावसंख्या उभारली. सॅमसनने ५० चेंडूंत १०७ धावा फटकावताना १० षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी केली.

● मग भारतीय फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेला १७.५ षटकांत १४१ धावांत गुंडाळले. भारतासाठी वरूण चक्रवर्ती (३/२५) आणि रवी बिश्नोई (३/२८) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. यासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

Story img Loader