अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी नेहमीच संस्मरणीय झाली आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारत मायकेल क्लार्कच्या ऑस्ट्रेलिया संघाला ४-० अशा फरकाने धूळ चारेल, असा दावा हरभजनने केला आहे.
‘‘हा ऑस्ट्रेलियाचा संघ युवा आहे. घरच्या मैदानावरही त्यांचा सातत्याने पराभव झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४-० असे पराभूत करणे सहजशक्य आहे,’’ असे हरभजनने सांगितले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघात परतण्यासाठी हरभजन उत्सुक आहे. ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात भज्जीचा शेष भारत संघात समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader