बांगलादेश येथे पुढील वर्षी होणाऱ्या १९-वर्षांखालील (युवा) विश्वचषक स्पध्रेत भारताला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. २७ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार आहे. २८ जानेवारीला मिरपूर येथील सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.
बांगलादेशातील आठ विविध स्टेडियममध्ये स्पध्रेतील एकूण ४८ सामने खेळविण्यात येणार आहेत. भारताने २०००, २००८ आणि २०१२ मध्ये विश्वचषक उंचावला होता. यंदा त्यांना ‘ड’ गटात स्थान देण्यात आले असून गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि नेपाळ यांचा समावेश आहे. या स्पध्रेचा सलामीचा सामना यजमान बांगलादेश आणि गतविजेत्या दक्षिण आफ्रिका यांच्यात चितगांव येथील जोहर अहमद चौधरी स्टेडियमवर होईल. १६ संघांचा समावेश असलेल्या या स्पध्रेत चार गट पाडण्यात आले आहेत.

Story img Loader